मराठी महिन्यातील प्रत्येक महिन्यात पौर्णिमा येते. उत्तर भारतासह अनेक भागांमध्ये पौर्णिमेला नवीन महिन्याची सुरुवात केली जाते. भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये पौर्णिमेचे अनन्य साधारण असे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. या दिवशी करण्यात आलेली धार्मिक कार्ये, नामस्मरण, पूजन, नदी स्नान यांचे शुभलाभ प्राप्त होऊ शकतात, असे सांगितले जाते. माघ महिन्यातील पौर्णिमेला लक्ष्मी पूजन केल्यास देवीचे शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतात, अशी मान्यता आहे. कधी आहे माघ पौर्णिमा, कसे करावे लक्ष्मी पूजन? जाणून घेऊया... (Magha Purnima 2022 Date and Time)
माघ पौर्णिमेला स्नान आणि दान करण्याला वेगळे महत्त्व आहे. या माघ महिन्यात उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे गंगास्नान करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. गंगा आणि त्रिवेणी संगमावरील स्नानाने पुण्य प्राप्त होते, अशी मान्यता आहे. तसेच या दिवशी केलेल्या लक्ष्मी पूजनामुळेही शुभ लाभ मिळू शकतो, असे सांगितले जाते. (Magha Purnima 2022 Shubh Yog Muhurat)
माघ पौर्णिमा: १६ फेब्रुवारी २०२२
माघ पौर्णिमा प्रारंभ: १५ फेब्रुवारी २०२२ रोजी रात्रौ ०९ वाजून ४२ मिनिटे.
माघ पौर्णिमा समाप्ती: १६ फेब्रुवारी २०२२ रोजी मध्यरात्रौ ०१ वाजून २५ मिनिटे.
भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे माघ पौर्णिमा १६ फेब्रुवारी २०२२ रोजी साजरी करावी, असे सांगितले जात आहे. तसेच या दिवशी मंगल तसेच शुभ कार्य करता येऊ शकतात. याशिवाय या दिवशी दान कार्य, व्रतपूजन करणे लाभदायक मानले गेले आहे. माघ पौर्णिमेला शोभन योग असून, विजय मुहूर्त आहे. हे दोन्ही योग शुभ मानले गेले आहेत.
असे करा लक्ष्मीपूजन
माघ पौर्णिमेला व्रताचरण आणि सत्यनारायण कथा पठण किंवा ऐकणे शुभलाभदायक मानले गेले आहेत. हे शक्य नसेल तर या दिवशी प्रदोष काळात वा तिन्ही सांजेला धन आणि वैभवाची देवी लक्ष्मी मातेची मनोभावे तसेच यथाशक्ती पूजन करावे, असे सांगितले जात आहे. लक्ष्मी देवीला प्रिय असलेल्या वस्तू अर्पण कराव्यात. लक्ष्मी देवीचे मंत्र, श्लोक आणि स्तोत्र यांचे पठण वा श्रवण करावे. असे केल्याने लक्ष्मी देवीचे कृपाशिर्वाद प्राप्त होऊ शकतात. धनलाभाचे योग जुळून येऊन घरात सुख, समृद्धी, आनंद द्विगुणित होऊ शकतो. वैभव, चैतन्य प्राप्त होऊ शकते, अशी मान्यता आहे. तसेच शक्य असल्यास श्रीविष्णूंचे पूजन, नामस्मरण करावे, असे सांगितले जाते. (Magha Purnima 2022 Vrat Puja of Lakshmi Devi)
चंद्रपूजनाचे विशेष महत्त्व
पौर्णिमेला चंद्रपूजनाचेही विशेष महत्त्व सांगितले गेले आहे. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत चंद्र कमकुवत असेल, तर त्यांनी पौर्णिमेला चंद्रपूजन करावे. पांढऱ्या वस्त्रांचे दान करावे. चंद्राच्या मंत्राचा जप करावा. असे केल्याने चंद्र मजबूत होण्यास मदत मिळून चंद्राच्या प्रतिकूल परिणामाचा प्रभाव कमी होण्यास मदत मिळू शकते, असे सांगितले जाते.