शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

माघी श्रीगणेश जयंती: ‘अशी’ करा पूजा, बाप्पा करेल कृपा; पाहा, उत्सव स्वरुप, महात्म्य, मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 14:36 IST

Maghi Shree Ganesh Jayanti 2025: भाद्रपद चतुर्थीप्रमाणे माघ महिन्यातील चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती सार्वजनिक पद्धतीने साजरी करण्याची प्रथा अलीकडे सुरू झाली आहे. माघी गणेश जयंतीचे व्रत, पूजनाची सोपी पद्धत आणि अन्य मान्यता जाणून घ्या...

Maghi Shree Ganesh Jayanti 2025 Puja Vidhi In Marathi: फक्त नाम आठवल्याने, स्मरणाने केवळ चैतन्याची अनुभूती होते असा गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत! १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असलेला गणपती ही वैश्विक देवता आहे. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. विविध कलांच्या अविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत. गणपती बुद्धीची देवता आहे. समरांगणात अग्रस्थानी लढणारा, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोड-धोड आवडीने खाणारा, शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा हा देव आहे. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत. यामुळेच देवत्व असलेला गणपती जवळचा आणि आपल्यातलाच वाटतो. माघ महिन्यातील शुद्ध चतुर्थीला श्रीगणेश जयंती मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी केली जाते. या माघी गणेश जयंती उत्सवाचे महत्त्व, महात्म्य, व्रत पूजाविधीची सोपी पद्धत आणि काही मान्यता यांविषयी जाणून घेऊया...

गणपतीचे एकूण तीन अवतार मानले गेले आहेत. या तीन अवतारांचे तीन जन्मदिवस आपण साजरे करीत असतो. पहिला अवतार वैशाख पौर्णिमेच्या दिवशी ‘पुष्टिपती विनायक जयंती’ म्हणून आपण साजरा करीत असतो. दुसरा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्थीला ‘श्रीगणेश चतुर्थी’ म्हणून पार्थिव गणेश पूजन करून आपण साजरा करीत असतो. तिसरा अवतार हा माघ शुक्ल चतुर्थीला ‘श्रीगणेश जयंती’ म्हणून आपण साजरा करीत असतो. माघ महिन्यातील पूजावयाची मूर्ती ही मातीची किंवा धातूचीही चालते. भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला जशी घरोघरी मातीची गणेशमूर्तीची पूजा केली जाते तशी माघातील गणेश जयंतीला प्रत्येक घरी पूजा केली जात नाही किंवा तशी परंपरा किंवा प्रथाही नाही. गणेशमूर्तीची नेमकी किती दिवस पूजा करून मूर्तीचे विसर्जन करावयाचे तेही कोणत्याही मान्यवर धर्मशास्त्रग्रंथात सांगितलेले नाही. काही ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरे केले जातात. काही कुटुंबात गणेशजयंतीला परंपरेप्रमाणे व्रत केले जाते.

माघी श्रीगणेश जन्मोत्सव: गणेश चतुर्थी अन् गणेश जयंती यात फरक काय? पुराण कथा दूर करेल संभ्रम

माघी श्रीगणेश जयंती व्रतपूजन कसे करावे?

०१ फेब्रुवारी २०२५ रोजी माघ शुद्ध चतुर्थी आहे. या दिवशी सकाळी ११ वाजून ३८ मिनिटांनी चतुर्थी तिथी लागत आहे. त्यामुळे माघी श्रीगणेश जयंती व्रतपूजन त्यानंतर करावे. गणेश पूजनाचा संकल्प करावा. चौरंगावर गणपतीची मूर्ती स्थापित करून शुद्ध पाण्याने अभिषेक करावा. गणपतीसह महादेव, गौरी, नंदी, कार्तिकेयसह शिव कुटुंबाची पूजा विधिपूर्वक करावी. गणपतीला प्रिय असलेली जास्वंदीची फुले, लाल फुले, दुर्वा वाहाव्यात. गणपती अथर्वशीषाचा पाठ करून नैवेद्य दाखवावा. आरती करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. गणपतीचा जप, नामस्मरण करावे. तसेच आपले कुळधर्म, कुळाचार याप्रमाणे अन्य विधी करावेत. माघी गणेशोत्सवात गणपतीला तीळाच्या लाडवांचा नैवैद्य दाखविण्याची प्रथा आहे. माघी गणेश जयंती ही तीलकुंद चतुर्थी म्हणूनही ओळखली जाते. अग्निपुराणमध्ये मोक्ष प्राप्तीसाठी तीलकुंद चतुर्थी व्रताचे महत्त्व सांगण्यात आले आहे. तसेच माघ शुद्ध विनायक चतुर्थीला वरद चतुर्थी असेही म्हटले जाते. 

श्रीगणेश जयंती काही पुराणातील मान्यता

श्री गणपतीचे, विनायकाचे चरित्र अनेकदृष्टीने मोठे आदर्श असे आहे. माघी चतुर्थी म्हणजे श्रीगणेश जयंती. विनायक चतुर्थी. गणपतीचे दोन प्रमुख अवतार आहेत. एक शिव -पार्वतीचा पुत्र गजानन आणि दुसरा कश्यप आणि अदिती यांचा मुलगा विनायक. महोत्कट विनायक या विनायकाने अगदी बालपणापासूनच पराक्रमाची पताका जगभर नांदत ठेवली. त्याच्या पाठीशी कोणत्याही प्रकारचे बळ नसतांना केवळ स्वकर्तृत्वावर त्याने देवतांनाही संकटमुक्त केले. ऋषी, साधू, मुनिजन अशांना निर्वेधपणे जगता येईल, अशी अनुकूल परिस्थिती उपलब्ध करून दिली. हे त्याचे उपकार स्मरण्यासाठी आपण गेली शतकानुशतके त्याचा हा जन्मोत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करतो. तो साजरा करीत असतानाच त्याच्या चरित्रापासून ‘सुखकर्ता दु:खहर्ता’ होण्याची प्रेरणा प्रत्येकाने घेतली पाहिजे, असे सांगितले जाते. 

माघी गणेशोत्सवाची परंपरा

भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. आधुनिक काळात अनेक ठिकाणी भाद्रपद चतुर्थीप्रमाणे माघ महिन्यातील चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती सार्वजनिक पद्धतीने साजरी करण्याची प्रथा अलीकडे सुरू झाली आहे. पूर्वी हा उत्सव केवळ मंदिरांपुरता मर्यादित होता. आता हा उत्सव सार्वजनिक गणेशोत्सवाच्या स्वरूपात साजरा होऊ लागला आहे. ठाण्याला सार्वजनिक माघी गणेशोत्सवाची स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची परंपरा आहे. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने १९३१ साली नौपाडा माघी गणेशोत्सव मंडळाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती. साधारणपणे १२० ते १२२ सार्वजनिक तसेच ५०० ते ६०० घरगुती माघी गणपतींची स्थापना करण्यात येते. 

|| गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ||

टॅग्स :Maghi Ganesh Jayantiमाघी गणेश जयंतीvinayak chaturthiविनायक चतुर्थीPuja Vidhiपूजा विधीspiritualअध्यात्मिकganpatiगणपती 2024Ganpati Festivalगणेश चतुर्थी २०२४Ganesh Festival Ritualsगणेशोत्सव विधी