शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

Maghi Ganeshotsav 2023: गणपती बाप्पा लंबोदर झाला तो 'या' कारणामुळे; पुढच्या वेळी त्याला नावं ठेवताना नक्की विचार करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 7:37 AM

Maghi Ganeshotsav 2023: आज माघी गणेश चतुर्थी, आपण बाप्पाची प्रार्थना करूच, मात्र त्यानिमित्ताने या गोष्टीकडेही लक्ष द्या!

हिंदू धर्मातील सगळे देव तंदुरुस्त असताना, एकटा गणपती बाप्पा तुंदिल तनू का? हा प्रश्न अनेकांना पडतो. त्यामागचे एक पौराणिक कथा आहे. रक्तबीज नावाचा असुर, ज्याचे रक्त सांडले तरी त्यातून नवीन राक्षस निर्माण होईल असे त्याला वरदान होते. म्हणून बाप्पाने त्याला पूर्ण गिळंकृत केला. त्यामुळे बाप्पाचे पोट फुगले आणि तो लंबोदर झाला. आणि त्याचे पोट फुगण्यामागे दुसरे कारण म्हणजे, आपण सगळे रोज त्याच्याकडे करत असलेली प्रार्थना...!

मोरया मोरया मी बाळ तान्हे, तुझीच सेवा करू काय जाणे,अन्याय माझे कोट्यानु कोटी, मोरेश्वरा बा तू घाल पोटी!

आपल्याला एखादे काम करून घ्यायचे असेल, तर आपण आपल्या लाडक्या व्यक्तीला गळ घालतो. गणपती बाप्पा हे तर सर्वांचेच लाडके दैवत! मग सुख असो, दु:ख असो, तक्रार असो नाहीतर अपराध असो, आपण आपले गाऱ्हाणे त्यालाच जाऊन सांगतो. तोही बिचारा सुपाएवढे कान पसरून भक्तांचे सगळे बोलणे निमुटपणे ऐकून घेतो. एवढा ताण सहन करूनही त्याचा चेहरा कधीच तणावग्रस्त दिसत नाही. याचे कारण, सूप ज्याप्रमाणे धान्य पाखडताना फोलकटे फेकून देते आणि चांगले धान्य जवळ ठेवते, तसेच बाप्पासुद्धा बरे-वाईट सगळे ऐकून घेतो आणि चांगल्या गोष्टी जवळ ठेवून वाईट गोष्टी डोक्यातून काढून टाकतो. पण तो एक `गुड लिसनर' अर्थात `उत्तम श्रोता' असल्यामुळे आपण सगळे काही त्यालाच जाऊन सांगतो. इथवर ठीक आहे. 

परंतु, आपली चूक कबुल करताना आपण त्याला घातलेली अट महाभयंकर आहे, `देवा, तू आमचा पालक आहेस. आम्ही तुझे बालक आहोत. आई जशी आपल्या मुलांच्या चुका पदरात घेते, तसे तू देखील आमचे कोट्यानु कोटी अन्याय पोटात घे.' बाप्पा तथास्तु म्हणतो आणि सगळ्या गोष्टी पोटात दडवून ठेवतो. 

बाप्पा, हा बुद्धीचा दाता आहेच, परंतु तो गणाधिपती बरोबरच गुणाधिपतीदेखील आहे. आपण स्वत:ला बाप्पाचे भक्त म्हणवून घेतो, मग आपल्यालाही बाप्पाचे गुण अंगिकारले पाहिजेत. समर्थ रामदास स्वामी सांगतात, `राम म्हणता राम होईजे...' आपण ज्या दैवताची उपासना करतो, त्याचे गुण आपण आपल्या अंगी बाणले पाहिजेत. केवळ बाप्पाला मोदक आवडतात, म्हणून आपणही चवीने मोदक खायचे, हा एकमेव गुण घ्यायचा नाही. तर, बाप्पासारखे आपल्यालाही उत्तम वक्ता, उत्तम श्रोता, उत्तम लढवय्या आणि जिज्ञासू विद्यार्थी होता आले पाहिजे. 

आपल्याला कोणी काही सांगत असेल, तर ते शांतपणे ऐकून घेता आले पाहिजे. ऐकलेल्या गोष्टी डोक्यात न साठवता, पोटात साठवल्या पाहिजेत. अर्थात त्या गुपित ठेवता आल्या पाहिजेत. देवाचे सूपासारखे कान त्याचे डोक शांत ठेवतात, तसे आपणही आपल्या कानांनी ऐकलेल्या गोष्टींवर फार विचार करत न बसता, अनावश्यक गोष्टी डोक्यातून डिलीट करून चित्त स्थिर ठेवले पाहिजे. बाप्पाचे बारीक डोळे, दूरदृष्टीचे सूचक आहेत. आपल्यालाही दैनंदिन जीवनात आगामी संधी, संकटे यांचा अंदाज घेता आला पाहिजे. बाप्पाला आपल्या सोंडेने चांगल्या-वाईट गोष्टी हुंगूनही ओळखता येतात. त्याप्रमाणे आपल्यालाही परिस्थितीचा ओळखता आली पाहिजे. तो मंगलमूर्ती आहे. त्याला पाहून इतरांना जसा आनंद होतो, तसा आपल्याला पाहून लोकांना आनंद वाटला पाहिजे. आपले अनंत अपराध पोटात घेऊन बाप्पा तुंदिलतनू झाला, तरी युद्धात त्याला कोणीही हरवू शकले नाही. कारण, त्याने कधी युक्तीने तर कधी शक्तीने शत्रूचा पराभव केला. त्याच्याप्रमाणे आपणही शत्रूसमोर केवळ शक्तीप्रदर्शन न करता, स्थलकालानुरूप लढाई जिंकली पाहिजे. त्यासाठी बाप्पा जसा पाशांकुशधारी आहे, तसा आपल्यालाही हाताशी मिळेल त्या साधनाचा प्रसंगी शस्त्राप्रमाणे वापर करून आपला आणि इतरांचा बचाव करता आला पाहिजे. उंदरासारख्या कुरतडणाऱ्या काळ्या कभिन्न वृत्तीवर स्वार होता आले पाहिजे. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन नेतृत्त्व निभावता आले पाहिजे. 

या सगळ्या गोष्टी आत्मसात करता आल्या, तरच आपण बाप्पाचे भक्त म्हणवून घेऊ शकू . मग बाप्पाही न सांगता आपले अनंत अपराध पोटात घेईल आणि मोबदल्यात मोदकाचा गोड गोड प्रसाद देईल. 

गणपती बाप्पा मोऽऽऽरया!

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवganpatiगणपती