साहित्य:१/२ किलो तिळ१/२ किलो चिकीचा गूळ१ ते दिड वाटी शेंगदाण्याचा भरडसर कूट१ वाटी किसून भाजलेले सुके खोबरे१/२ वाटी चण्याचं डाळं१ चमचा वेलची पूड१ ते २ चमचे तूपमोदक बनवण्याचा साचा
कृती:१) १/२ किलो तिळ व्यवस्थित भाजून घ्यावेत. पातेल्यात चिकीचा गूळ घ्यावा. थोडे तूप घालावे. गूळाचा गोळीबंद पाक करावा. सतत ढवळत राहावे, गूळ पूर्ण पातळ झाला कि थोड्या वेळाने तो फेसाळतो.पाक गोळीबंद झाला आहे कि नाही हे पाहण्यासाठी गूळाचा पाक फेसाळला कि गॅस बारीक करावा. एका वाटीत गार पाणी घ्यावे. त्यात एक थेंब पाक घालावा. बोटाने तो पाक हातात घेऊन त्याची गोळी करावी आणि वाटीतल्या पाण्यात तो गोळा खडा मारल्यासारखा टाकावा. जर वाटीचा "टण्णं" असा आवाज आला तर पाक तयार आहे असे समजावे.२) पाक गोळीबंद झाला कि त्यात भाजलेले तिळ, दाण्याचा कूट, भाजलेले सुके खोबरे, चण्याचे डाळं, वेलची पूड घालून निट ढवळावे, आणि गरम असतानाच सारण ताटात काढून घ्यावे. मोदकाच्या साच्याला तुपाचे बोट लावावे आणि त्यात सारण भरावे. सारण व्यवस्थित भरून आकार दिला की साचा उघडावा, मोदक अलगद बाहेर येतील.
तिळगुळाचे लाडू आपण करतोच, मोदकाचा आकार देऊन त्याचेच मोदक केले की बाप्पा खुश आणि घरची बच्चे कंपनी पण खुश!