शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

महाशिवरात्री: व्रत करणे शक्य नाही? काळजी करू नका; ‘अशी’ करा महादेवांची ‘शिव मानस पूजा’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2024 3:43 PM

Mahashivratri 2024: मानसपूजा म्हणजे काय? ती कशी करावी? जाणून घ्या, शिवमानसपूजा स्तोत्र...

Mahashivratri 2024: महाशिवरात्रीचे व्रत कोणालाही करता येते. महाशिवरात्रीचे व्रत कसे करावे, याविषयी तपशीलवार विवेचन विविध ग्रंथांतून आढळते. उपवास, पूजा व जागरण ही या व्रताची तीन प्रमुख अंगे आहेत. प्रत्येक प्रांतानुसार त्या-त्या ठिकाणी असणाऱ्या पद्धतीनुसार महाशिवरात्र साजरी केली जाते. मराठी वर्षांत महाशिवरात्रीला अनन्य साधारण महत्त्व आहे. या दिवशी लाखो शिवभक्त मंदिरात जाऊन शिवाचे दर्शन घेतात. माघ वद्य चतुर्दशी या तिथीला महाशिवरात्र हे शिवाचे व्रत करतात. यंदा ०८ मार्च २०२४ रोजी महाशिवरात्री आहे.

आजच्या धकाधकीच्या आणि बिझी शेड्युलमुळे अनेकांना इच्छा असूनही महाशिवरात्रीचे व्रत करणे शक्य होत नाही. अनेकांच्या मनात महाशिवरात्रीचे व्रत करावे, मंदिरात जाऊन दर्शन घ्यावेत, शिवाचे शुभाशिर्वाद घ्यावे, यथाशक्ती पूजन करावे, असे कायम येत असते. मात्र, अनेक व्यवधानांमुळे ते शक्य होतेच असे नाही. धावपळीच्या जीवनात परमार्थ, पूजापाठ करायला अनेकांना वेळ मिळत नाही. अशावेळेस मानस पूजा हा मार्ग सर्वोत्तम पर्याय आहे. कुठल्याही तीर्थ क्षेत्रात जाऊन आपण त्या देवाची मानस पूजा करू शकतो, हा मानसपूजेचा फायदा आहे. यावर एक उपाय म्हणजे घरच्या घरी अगदी काही मिनिटांत होऊ शकणारी शिव मानस पूजा.

मानस पूजा म्हणजे काय?

मानस पूजा म्हणजे मनातल्या मनात केलेली पूजा. अशा मानस पूजेसाठी मूर्ती, प्रतिमा, चित्र पाहिजे असे नाही. आपल्या इष्ट देवताचे स्वरुप आपल्या मन:पटलावर आणून त्याची मानसिक अर्चना करणे, म्हणजे मानसपूजा. अशी पूजा करणे सोपे नाही. त्यात नुसती शब्दांचे उच्चारण करायची नसते, तर मनाची पूर्ण एकाग्रता साधून पूजा करावी, असे सांगितले जाते. 

मानस पूजा कशी करावी?

आपण जेव्हा मूर्तीची पूजा करतो, तेव्हा षोडोपचारे पूजा करतो, म्हणजे आसन, अर्ध्य, पुष्प, गंध, धूप, दिप असे सोळा उपचार पूजा करताना वापरतो. मानसपूजेत खऱ्या वस्तू न वापरता प्रतीके वापरली जातात.  आदि शंकराचार्य यांचे ‘शिव मानस पूजा’ स्तोत्र प्रसिद्ध आहे. त्यात भगवान शंकराची मानस पूजा केली आहे. 

शिव मानस पूजा स्तोत्र 

रत्नै: कल्पितमासनं हिम-जलै: स्नानं च दिव्याम्बरंनाना-रत्न-विभूषितं मृगमदामोदांकितं चन्दनं ।जाती-चम्पक-बिल्व-पत्र-रचितं पुष्पं च धूपं तथा,दीपं देव दयानिधे पशुपते हृत-कल्पितं गृह्यताम् ||१||

सौवर्णे नव-रत्न-खंड-रचिते पात्रे घृतं पायसं,भक्ष्यं पञ्च-विधं पयो-दधि-युतं रम्भाफलं पानकं ।शाकानामयुतं जलं रुचिकरं कर्पूर-खंडोज्ज्वलं ,ताम्बूलं मनसा मया विरचितं भक्त्या प्रभो स्वीकुरु ! ||२||

छत्रं चामरयो:युगं व्यजनकं चादर्शकं निर्मलं ,वीणा-भेरि-मृदंग-काहलकला गीतं च नृत्यं तथा ।साष्ट-अंगं प्रणति: स्तुति: बहुविधा ह्येतत्समस्तं मया,संकल्पेन समर्पितं तव विभो पूजां गृहाण प्रभो ! ||३||

आत्मा त्वं गिरिजा मति: सहचरा: प्राणा: शरीरं गृहं ,पूजा ते विषयोपभोग-रचना निद्रा समाधि-स्थिति: ।संचार: पदयो: प्रदक्षिणविधि: स्तोत्रानि सर्वागिरो ,यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शम्भो तवाराधनं  ||४||

कर-चरण-कृतं वाक्कायजं कर्मजं वा,श्रवण-नयनजं वा मानसं वापराधं ।विहितमविहितं वा सर्वमेतत्-क्षमस्व ,जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शम्भो ! ||५ ||

संस्कृतमध्ये म्हणणे शक्य नाही? मराठीत शिव मानस पूजा म्हणा

श्रीशंकर शिवप्रभो बसावे रत्नखचित मानससिंहासनीमनोमनी स्नानार्थ आणले हिमगिरीचे सुखशीतल पाणीदिव्य वस्त्र मग वेढून घ्यावे संध्यारंगासम झळझळतेकस्तुरीचंदन तुला लावतो सुगंधात त्या विश्व नाहतेपापनाशनी धूप जाळुनी राशी रचली बिल्वदलांचीकितीक सुंदर अर्धोन्मीलित फुले जाईची अन चाफ्याचीस्वामी मंगलदीप लावतो दीपोत्सव होऊ दे अंतरीनमननमन तुज पार्वतीपते मानसपूजा ही स्वीकारी ||१||

सुवर्णपात्रही मनी कल्पिले रत्नांची त्यावरती दाटीदह्यादुधातील पंच पाककृती खीर तूप सारे तुजसाठीरसाळ भाज्या मधूर पाणी गोड फळे स्वामी सेवावीभोजनोत्तरी विडा कर्पुरी भक्षुनिया मुखशुद्धी व्हावीमानसीच्या विश्रामगृही प्रभू आता तव होऊ दे आगमन ||२||

मस्तकी धरतो छत्र सुलक्षण चवरीने तुज वारा घालीनस्फटिकासम चौफेर आरसे तुझे रूप हृदयाशी धरतीस्वर वीणेचे ताल मृदंगी गीतनृत्य भुवनातून भरतीपुन:पुन: तुज नमितो येथे स्तवनांनी लववितो वैखरीनमननमन तुज पार्वतीपते मानसपूजा ही स्वीकारी ||३||

तू आत्मा मम , बुद्धीरुपाने देवी उमा अंतरी विराजेप्राण तुझे सहचर शिवनाथा शरीर घर हे तुझेच साजेविषयभोग मी घेतो जे जे तुझी शंकरा पूजा ती तीनिद्रा जी भरते नयनांतून सहजसुखाची समाधिस्थितीपायांना जी घडे भ्रमंती तुझी कृपाळा ती प्रदक्षिणावाचेला स्फुरते जी भाषा तुझे स्तवन हे हे दयाघनाया देहातून या मनामध्ये तुझीच लीला तुझीच सत्ता ||४||

मी जे कर्म करावे ते ते तव आराधन हो प्रभुनाथाया हातांनी , या चरणांनी , या वाणीने , या कर्णांनीया कायेने अनुचित कर्मे जी आचरिली पूर्ण जीवनीहे करुणाकर ! महादेव हे ! अपराधांना प्रभू क्षमा करीनमननमन तुज पार्वतीपते मानसपूजा ही स्वीकारी ||५ ||

||ॐ नमः शिवाय||

|| हर हर महादेव ||

 

टॅग्स :Mahashivratriमहाशिवरात्रीPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३spiritualअध्यात्मिक