शहरं
Join us  
Trending Stories
1
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
2
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
3
“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला
4
भारतीय संशोधकांनी लावलेल्या शोधाचा चीनने घेतला लाभ, अमेरिका, रशियाही अवाक्, भारताने संधी दवडली  
5
महापालिका निवडणुकीस BJP सज्ज, कार्यकर्त्यांना नवे बळ; संघटनबांधणी मजबूत, पक्षशक्ती भक्कम
6
मुकेश अंबानींची रोजची कमाई किती? आकडा वाचून बसेल धक्का; दर तासाला कुठून येतात कोट्यवधी रुपये
7
धक्कादायक! उत्तर प्रदेशातील 'ब्लू ड्रम'नंतर आता उत्तराखंडमध्ये पत्नीने पेट्रोल ओतून पतीला जाळले
8
“उद्धव ठाकरे महाराष्ट्र सैनिकांची माफी मागणार का?”; युती चर्चांवर मनसे नेत्याचा थेट सवाल
9
ट्रम्प टॅरिफचा पहिला धक्का! 'ही' दिग्गज कंपनी ८०० हून अधिक कर्मचाऱ्यांना काढणार
10
सर्वोच्च न्यायालयाचा अपमान, निशिकांत दुबे अडचणीत; कारवाई होणार? भाजपने हात झटकले...
11
झांबियामध्ये १९ कोटी रुपये अन् ४ कोटींचे सोने घेऊन जाताना भारतीयाला पकडले; दुबईला जाण्याच्या तयारीत होता
12
घरगुती मीटरवर इलेक्ट्रीक कार चार्ज केली; केला २५००० चा दंड, कार मालक रडकुंडीला आला...
13
IPL 2025 : सतरावं वरीस मोक्याचं! युवा क्रिकेटरच्या 'विरार टू चेन्नई व्हाया मुंबई' प्रवासाची गोष्ट
14
मुकेश अंबानींच्या रिलायन्सपासून ते टाटा ग्रुपपर्यंत, या १० कंपन्यांनी फक्त ३ दिवसांत कमावला मोठा नफा
15
वैजापूरमध्ये पहाटे थरार! चोरीच्या प्रयत्नात बँक जळून खाक...खातेदारांच्या पैशांचे काय होणार?
16
वैभव सूर्यवंशीच्या धडाकेबाज खेळाने गुगलचे सीईओही भारावले, सुंदर पिचाई कौतुक करत म्हणाले, "वयाच्या १४ व्या वर्षी…’’  
17
पंचग्रही योगात नववर्षाचे पहिले पंचक: ५ दिवस प्रतिकूल, अशुभ; ५ कामे टाळा, नेमके काय करू नये?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ४ राशींना बक्कळ लाभ, ४ राशींना मध्यम फलदायी; बचतीत फायदा, यश-प्रगती!
19
पुण्यात कुटुंबासोबत फिरायला गेलेल्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू, वॉटर पार्कमध्ये झिपलायनिंग करताना...
20
भीषण अपघात! लग्नावरून परतणाऱ्या तरुणांची कार गॅस टँकरला धडकली, २ जणांचा मृत्यू ,एक जखमी

Makarsankranti 2022 : नवजात बालकांपासून पाच वर्षांच्या मुलांपर्यंत संक्रांतीच्या काळात बोरन्हाण कसे करावे जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 16:51 IST

पहिली मकर संक्रांत म्हणून नवविवाहितांचे जसे कोडकौतुक केले जाते, तसेच बोरन्हाण घालून तान्ह्या बाळांचाही सोहळा साजरा केला जातो. मकरसंक्रांतीपासून रथ सप्तमीपर्यंत आपल्या सवडीने केव्हाही बाळांचे बोरन्हाण करता येते.

बोरन्हाण हा एक शिशुसंस्कार आहे. आईच्या गर्भातून बाहेर आल्यावर या सृष्टीशी, ऋतुमानाशी जुळवून घेत साजरा केला जाणारा हा सोहळा आहे. यात संस्कारांबरोबर शिशूच्या आरोग्यासाठी उपयुक्त आणि आवडीच्या गोष्टींचा समावेश केला जातो. अगदीच तान्ह्या बाळाला या गोष्टी अनुभवणे अशक्य आहे, म्हणून पाच वर्षांपर्यंत मुलांचे बोरन्हाण केले जाते. नकळत्या वयापासून कळत्या वयापर्यंत मुलांच्या आठवणी तयार होत जातात आणि कळत नकळत संस्कृतीशी, परंपरेशी, निसर्गाशी त्यांचीही नाळ जोडली जाते.

बोरन्हाण घालताना बाळाला लागणार नाहीत अशा बेताने वजनाने हलक्या पण आकर्षक, तरी आरोग्यवर्धक गोष्टींनी बोरन्हाण घातले जाते. त्यात चुरमुरे, लाह्या, हलव्याचे दाणे, छोटी बोरं, चिंचा, गाजराचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, तसेच रंगीबेरंगी गोळ्या, चॉकलेट, बिस्कीट अशा गोष्टींचाही समावेश केला जातो. या सोहळ्यात सहभागी झालेल्या इतर मुलांनी तो खाऊ वेचून घरी न्यायचा असतो. यानिमित्ताने इतर मुलांनाही या गोष्टी आठवणीत राहतात आणि उत्सवमूर्ती बाळाला किंवा लहान मुलाला या खेळाची गंमत वाटते.

बोरन्हाण घालताना लहानग्या उत्सवमूर्ती साज नेहमीपेक्षा वेगळा असतो. बाळाला काळ्या रंगाचे झबले किंवा सदरा घातला जातो. मुलींना काळ्या रंगाचे खणाचे परकर पोलके किंवा फ्रॉक घातला जातो. काळा रंग उष्णता शोषून घेतो. हिवाळ्यात शरीर उबदार राहावे, म्हणून आपण काळे कपडे वापरतो. त्याप्रमाणे बाळाला काळ्या कपड्यांवर उठून दिसतील असे हलव्याचे पांढरे शुभ्र दागिने घातले जातात. मुलांना बासरी, मुकुट, हार, तर मुलींना माळ, पैंजण, वाकी, बांगड्या इत्यादी हलव्याचे दागिने केले जातात. या श्रुंगारामुळे बालमूर्ती अधिकच शोभून दिसते.

या सोहळ्यासाठी आपल्या मुलांना घेऊन आलेल्या लेकुरवाळ्यांचाही हळद कुंकू लावून सन्मान केला जातो. तीळगुळ देऊन आदरातिथ्य केले जाते. गप्पा, गोष्टी, गाणी, नाच यांमुळे छोटासा घरगुती समारंभही उत्साहात, आनंदात पार पडतो. या आठवणी आयुष्यभराच्या असतात.

ज्याप्रमाणे आपण आपले बालपणीचे पहिल्या संक्रांतीचे फोटो पाहून सुखावतो, त्याचप्रमाणे या आठवणींचे हस्तांतर पुढच्या पिढीकडे व्हावे, यासाठी अशा सोहळ्यांची आखणी केलेली आहे. यात कमी अधिक झाल्यास काहीच वावगे ठरत नाही. यथाशक्ती हा सोहळा पार पडावा आणि घरात घडीभर आनंदाचा शिडकावा व्हावा, हीच या सोहळ्याची गंमत!

टॅग्स :Makar Sankrantiमकर संक्रांती