शाकाहार आणि मांसाहार असे लोकांमध्ये दोन गट होतेच, त्या आणखी एका गटाची भर पडली आहे, ती 'व्हेगन' नावाच्या आहारपद्धतीची! व्हेगन अर्थात अशी आहारपद्धती, जी दूध आणि दूग्धजन्य पदार्थांनाही व्यज्र्य मानते आणि केवळ शाकाहाराचा पुरस्कार करते. परंतु निसर्ग नियम अथवा शरीर नियम काय सांगतो, याबाबत एक माहिती वाचनात आली. त्यात पशुपक्ष्यांशी मानवदेहाची तुलना स्पष्ट केली असून, मानव निसर्गत: शाकाहारीच होता, असे ठासून म्हटले आहे. ते मुद्दे कोणते, ते पाहुया!
परमेश्वराने सृष्टीत शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन प्रकारचे प्राणी निर्माण केले आहेत. त्यात मानव प्राणी शाकाहारीच बनवला आहे. शरीर रचनेकडे पाहिले, तर शाकाहारी व मांसाहारी प्राण्यांच्या शरीररचनेत फार मोठा भेद दिसून येतो.>> शाकाहारी प्राणी पाण्यावर ओठ टेकून पाणी पितात. मांसाहारी प्राणी जीभ बाहेर काढून चाखत पाणी पितात.>> शाकाहारी प्राण्यांचे दात चपटे असतात, पण मांसाहारी प्राण्याचे सर्व दात अणकुचीदार असतात व त्यात फटी असतात.>> मांसाहारी प्राण्यांची नखे अणकुचीदार असतात व तीक्ष्ण असतात. शाकाहारी प्राण्यानची नखे चपटी असतात व अणकुचीदार नसतात.
वरील वस्तुस्थितीचा विचार केला असता, मानव प्राणी निसर्गत: शाकाहारी आहे, मांसाहारी नाही, याची खात्री पटते.