'तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिलेत!' असे म्हणत दटावणाऱ्या मंडळींकडून अनियमित आणि वारंवार पडणाऱ्या पावसाने हा हक्कच जणू काढून घेतलाय. गमतीचा भाग सोडा, परंतु खरोखरच चार पावसाळे जास्त पाहिलेली, वयाने ज्येष्ठ असलेली व्यक्ती अनुभवाने आणि विचारानेसुद्धा तेवढीच समृद्ध असते का हो? नाही, तसा दावा करणे चुकीचे ठरेल. कारण तसे असते तर १०४ वर्षांचे चांगदेव १६ वर्षांच्या ज्ञानेश्वर माउलींसमोर नतमस्तक झाले नसते. म्हणजेच वयाने शहाणपण येतेच असे नाही, तर शहाणपण अनुभवाने येते. मग ते विचारातून प्रगट होते. दुसऱ्यांना समजून घेण्याची क्षमता ज्याच्याकडे जास्त, ती व्यक्ती सर्वात जास्त अनुभवी, अशी आपण ढोबळ व्याख्या करू शकतो. जगाची भ्रमंती केली म्हणून कोणी विचाराने समृद्ध होत नसतो, जग फिरूनही लोकांचा दुस्वास करणारी कोत्या मनाची मंडळी पाहिली, की त्यांच्या मोठेपणाचा मुखवटा गळून पडतो. मग अनुभवी म्हणावे तरी कोणाला? कोणाचे शब्द प्रमाण मानावेत? कोणाचे मार्गदर्शन घ्यावे? कोणाकडून आयुष्य समजून घ्यावे? या प्रश्नांची उकल कवी बा. भ. बोरकर यांनी आपल्या कवितेतून केली आहे.
मीपण ज्यांचे पक्व फळापरीसहजपणाने गळले होजीवन त्यांना कळले हो
जळापरी मन निर्मळ ज्यांचे,गेले तेथे मिळले होचराचरांचे होउनि जीवनस्नेहासम पाजळले होजीवन त्यांना कळले हो
सिंधूसम हृदयांत जयांच्यारस सगळे आकळले होआपत्काली अन् दीनांवरघन होउनि जे वळले होजीवन त्यांना कळले हो दूरित जयांच्या दर्शनमात्रेमोहित होऊन जळले होपुण्य जयांच्या उजवाडानेफुलले अन् परिमळले होजीवन त्यांना कळले हो
आत्मदळाने नक्षत्रांचे वैभवज्यांनी तुळिले होसायासाविण ब्रह्म सनातनउरींच ज्यां आढळले होजीवन त्यांना कळले हो