प्रवास सुखकर, निर्विघ्नपणे, सुरक्षितपणे होण्यासाठी विश्वास असल्यास खालील मंत्र, श्लोक, स्तोत्र यांचा जप, पाठ करावा. रस्ता शिस्तीचे सगळे नियम पाळायचे आहेतच. इतर आवश्यक ती काळजीही घ्यायची. पण मोठ्या प्रवासात जाताना मनात एक भीती असते. हल्ली तर तुम्ही नुसते रस्त्याच्या कडे चालत असाल तरी कोण तुम्हाला येऊन धडकेल याचाही काही नेम राहिलेला नाही. त्यामुळे ईश्वरी कवच आपल्या भोवती हवंच अशी अनेकांच्या मनात एक सुप्त इच्छा असते. त्यांनी पुढील मंत्र म्हणावा.
सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः।लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो विनायकः।।धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः।द्वादशैतानि नामानि यः पठेच्छृणुयादपि।।विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा।संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते।।
तसेच, रामचरितमानस मधील एक चौपाई आहे .कुठल्याही वाहनावर बसताना अगोदर ती चौपाई म्हणावी . अपघात होत नाही असाही अनेकांचा अनुभव आहे. प्रत्यक्ष हनुमान कवच बनून आपले रक्षण करतात, अशी श्रद्धा आहे.
चलत विमान कोलाहल होई lजय रघुवीर कहत सब कोई ll॥ॐ श्री त्रिविक्रमाय नमः॥
हे मंत्र म्हणता येतील. त्याबरोबरच अन्य स्तोत्र जर पाठ असतील आणि ती म्हटली तरी चालेल. ती स्तोत्र पुढीलप्रमाणे- हनुमान चालिसा, दुर्गा कवच, शाबरी कवच, नवनाराणाचा मंत्र, गायत्रीमंत्र, कुलदेवतेचे नामस्मरण, गुरुचे नामस्मरण, दत्तअष्टक, कालभैरवाष्टक, रामरक्षास्तोत्र याचे पठण करावे.
शमी शमयते पापं शमी लोहित कंटका धरित्र अर्जुन प्रणानाम रामस्य प्रिय वादिनी.
सोलापूर येथील पूज्य गुरुदेव श्रीनिवासजी काटकर यांनी हा मंत्र प्रगट केला असून त्यांनी प्रकाशित केलेल्या युवाप्रबोध या पुस्तिकेत आहे. ती पुस्तिका जवळपास २५ वर्षांपूर्वी प्रकाशित झाली आहे व ५ आवृत्या देखील झाल्या होत्या.