वारकरी संप्रदायामध्ये संत एकनाथ महाराजांचे स्थान अतिशय अलौकीक असेच आहे. संत एकनाथांनी रचियेले एकनाथी भागवत आणि ज्ञानेश्वरीचे हस्तलिखित संपूर्ण वारकरी संप्रदायासाठी अलौकीक आणि महत्वपूर्ण असा ‘ठेवा’ आहे .वारकरी संप्रदायामध्ये नाथ षष्ठीला अनन्य साधारण महत्व असून महाराष्ट्राच्या कानाकोपºयातील आणि देशाच्या विविध राज्यातील अनेक आश्रमाचे मठाधिपती, संस्थानचे पदाधिकारी, भाविक आणि वारकरी मोठ्यासंख्येने पैठण येथील दाखल होतात. दरवर्षी या उत्सवात सहभागी होणाºया भजनी दिंडी आणि वारकºयांची संख्या आपलाच उच्चांक दरवर्षी मोडीत काढत आहे. वारकºयांचे दैवत असलेल्या संत एकनाथांच्या पादुका आणि विजयी पांडुरंग भगवानाचे दर्शन घेण्यासाठी तल्लीन झालेले असतात. मुखी संत एकनाथांचा जयघोष, मनात संत एकनाथांचे विचार साठवित, या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थिती दर्शवितात.
एकनाथांनी ज्ञानेश्वरीचे केले पुनर्रलिखान!
संत एकनाथ महाराजांनी शके १५२१ फाल्गुन वद्य षष्ठीला गोदावरीमध्ये जल समाधी घेतली होती. तत्पूर्वी त्यांना भाविकांनी परत कधी येणार, असा प्रश्न विचारला असता, संत एकनाथांनी ‘जै धर्माची वाटा मोडे/ अधर्माची शीग चढे//तै आम्हा येणे पडे/ संसार स्थिती//नाना मते पाखंड/ कर्मठायी अति बंड/तयाचे ठेचावे तोंड/हरिभजने// हा अभंग रचियला. तसेच अदैत जगत, कोणत्याही भेदाला थारा न देता, जगाला एकनाथी भागवत दिले. आणि ज्ञानेश्वरीचे पुनर्रलिखान केले.
- अनिल तुळशीराम गवईतिरूपती नगर, खामगाव.