शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मार्गशीर्ष दुर्गाष्टमी: अनघालक्ष्मी व्रत कसे करतात? पाहा, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 14:28 IST

Margashirsha Durgashtami Anagha Laxmi Vrat In Marathi: अनघालक्ष्मी व्रताचे महात्म्य अनन्य साधारण असून, या व्रताचरणाविषयी जाणून घ्या...

Margashirsha Durgashtami Anagha Laxmi Vrat In Marathi: मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे. १४ डिसेंबर २०२४ रोजी दत्त जयंती आहे. मार्गशीर्ष पौर्णिमा सायंकाळी ०४ वाजून ५९ मिनिटांनी सुरू होत असून, १५ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ०२ वाजून ३१ मिनिटांनी समाप्त होत आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो. तत्पूर्वी, ०९ डिसेंबर २०२४ रोजी मार्गशीर्ष दुर्गाष्टमी आहे. यानिमित्ताने अनघालक्ष्मी व्रताची माहिती जाणून घेऊया...

श्री दत्त म्हणजे अघा पापांचा नाश करणारे हे पंचमाश्रमी आहेत. ग्राहस्थाश्रमाचे आचारण त्यांनी केलेले आहे. अत्रिपुत्र दत्त हे अनघा दत्त आहेत व  त्यांची पत्नी अनघा लक्ष्मी रूप आहे. उपासना पद्धती, कृतयुगांत साक्षात दत्त सद्गुरुंनी आपला प्रिय भक्त कार्तवीर्यार्जुनाला स्वत: सांगितली, ह्याचे विवरण दत्त पुराणामध्ये आहे. या युगात या उपासनेचा, व्रताचा प्रचार केल्याने कार्तवीर्य चक्रवर्ति होऊन त्याने एका स्वर्णयुगाचे निर्माण केले. त्रेतायुगांत प्रभु श्रीराम व दशरथ महाराज यांनी हे व्रत आचरण केले. असा पुराणांत उल्लेख केला आहे. द्वापार युगांत हे व्रत थोडे क्षीण झाले. पण भगवान श्रीकृष्णांनी धर्मराजाला उपदेश केला व ह्या व्रताचे आचरण करविले. सर्व भक्तांवर श्री सद्गुरुंच्या कृपादृष्टीमुळे कमी झालेले व्रत पुन: प्रसिद्ध झाले आहे.

श्रीप्रभूंच्या दत्तावताराला ‘स्मर्तृगामी’ (स्मरण करताच भक्तावर कृपा करणारे दैवत) असे म्हटले आहे. याचाच अर्थ खूप तपाचरण, भक्ती करणाऱ्या भक्तावरच ते कृपा करतात असे नव्हे तर संकटाच्या वेळी कोणीही त्यांचे स्मरण करताच ते त्याच्यावर कृपावर्षाव करतात. श्री दत्तगुरूंचे ‘अवधूत’ हे स्वरूप तर आहेच पण त्या व्यतिरिक्तही त्यांची अनेक स्वरूपतत्त्वे आहेत. अनेकानेक स्वरूपात साकारणाऱ्या या लीलामूर्तीला एक गृहस्थस्वरूपही आहे. याच गृहस्थस्वरूपाला अनघस्वामी असे नाव आहे आणि अर्थातच त्यांच्या अर्धांगीला अनघालक्ष्मी असे म्हणतात. व्यासोक्त दत्तपुराणात व भविष्योत्तर पुराणातही या अनघ व अनघालक्ष्मी व्रताचा, पूजेचा संदर्भ आहे. दत्तगुरुंचा प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या चरित्रात अनघालक्ष्मीचे प्रकट झालेले स्वरूप अधिकच व्यापक आहे. श्रीपादश्रीवल्लभ स्वत: म्हणतात की, अनघालक्ष्मीचा ‘अनघ’ हे माझे दत्तस्वरूप आहे. अर्थातच श्रीदत्तमूर्ती ही त्रिगुणात्मक त्रैमूर्ती आहे. तिच्या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू, महेश हे तीनही देव व त्यांच्या शक्ती एकवटलेल्या आहेत. म्हणून महासरस्वती, महालक्ष्मी व महाकाली या तिन्ही तत्त्वांचे मिळून एक आगळे दिव्य मातृस्वरूप आहे व तोच अनघालक्ष्मीचा आविर्भाव आहे. म्हणून अनघालक्ष्मी ही महासरस्वती, महालक्ष्मी व महाकाली या तिघींनी धारण केलेल्या तादात्म्यस्थितीचे प्रतीक आहे. अनघ हे ब्रह्मा विष्णू महेश यांच्या एकत्रीकरणाचे तादात्म्य धारण करून व्यक्त केलेले शक्तिस्वरूप आहे. या शक्तिस्वरूपाचा अनघालक्ष्मी हा आधार आहे. ती एक दिव्यशक्ती आहे.

अनघालक्ष्मी व्रताचे स्वरुप, महत्त्व अन् महात्म्य

मार्गशीर्ष व माघ कृष्ण अष्टमीस, तसेच प्रत्येक महिन्याच्या कृष्णाष्टमीस किंवा शुद्धाष्टमीस "अनघाष्टमी" मानून सकाळी हे व्रत करावे. शक्य नसल्यास सायंकाळी स्नान करुन करावे. व्रताच्या दिवशी उपवास करावा, दिवसभर केवल फलाहार अथवा उपवासाचे पदार्थ खावेत. सायंकाळी आरतीनंतर भोजन करावे. ही अष्टमी 'अघ म्हणजे पाप' नाहीसे करते, त्यामुळे हे व्रत करणाऱ्याने पापनिरसन व दारिद्रनाश होऊन त्याला दैवीसंपत्ती, अष्टैश्र्वर्यलाभ व सर्व सुखप्राप्ती होते. सर्व पुण्य कर्म फळांची प्राप्ती होते. मनोकानापूर्ती व निर्मल कीर्ती लाभ होतो. सर्वत्र कल्याण होऊन, श्रीअनघामाता व श्रीदत्तात्रेयांचा अनुग्रह होतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. 

नित्यकर्म झाल्यानंतर देवासमोर अथवा शुद्ध स्थानी चौरंग अथवा पाटावर वस्त्र घालून, त्याभोवती रांगोळी काढावी. त्यावर मध्यभागी एकमूठ तांदूळ घालून पूर्वेपासून आठ दिशेस एक एक मूठ तांदूळ घालावे, त्यानंतर मध्यभागी शुद्ध पाण्याने भरलेला कलश ठेऊन, त्याला पाच हळदी, कुंकवाची बोटे ओढावीत. त्यामध्ये गंध, अक्षता, फूल, सुपारी-नाणे व आंब्याचा डहाळा घालावा, तांदळाने भरलेले ताम्हाण ठेऊन त्यात अनघदत्तमूर्ती ठेवावी, या दत्तपीठाच्या डावीकडे (आपल्या उजव्या हातास) चौरंगावर एकमूठ तांदूळ घालून त्यावर गणपतीची सुपारी, समोर पाच विडे (२ पाने, १ नाणे, १ सुपारी म्हणजे एक विडा) केळे, फळ इ. मांडावे तसेच गूळसाखर व २ नारळ ठेवावे. 

श्रीअनघदत्तात्रेयांच्या मूर्तीजवळ लालदोरा (व्रतसुत्र) ठेवावा. व्रतसमाप्तीनंतर तो पुरुषांनी उजव्या मनगटात तर स्त्रियांनी डाव्या मनगटात बांधावा. आपल्या सगेसोयर्यांनाही व्रतसूत्र द्यावयाचे असल्यास तितके दोरे ठेवावेत, व्रत झाल्यानंतर स्वीकारणार्यांनी हे व्रतसूत्र प्रसाद म्हणून अन्यथा स्वतःस व्रतासंभ करण्यास अनुमती व परंपरा स्वरुपात व्रतसूत्र स्वीकारावे व स्वतःच्या घरी हे व्रत आरंभावे व इतरांनाही आपल्या व्रताचे सूत्र द्यावे. पुढील अनघाष्टमी पूजेवेळी पहिल्यापूजेचे सूत्र काढून निर्माल्यात विसर्जित करावे.

यानंतर शास्त्रविधानानुसार मध्यभागी ताम्हणातील मूर्तीवर श्री अनघादत्ताचे आवाहन करावे.अष्टसिद्धीस्वरुप अणिमादि अष्टदत्तपुत्रांचे आवाहन करावे. यानंतर श्रीअनघासहित श्रीअनघदत्ताय नमः ॥ या मंत्राने श्रीअनघादत्त, अणिमादि दत्तपुत्र व व्रतसूत्र यांचे पूजन करावे. श्रीदत्तदेवासं तु़लसीपत्राने व श्री अनघामातेस कुंकवाने शतनामार्चन करावे. कुळाचार, कुळधर्म, परंपरा यांनुसार पुढील पूजन करावे. धूप-दीप-नैवेद्य अर्पण करावा. आरती करावी. मनोभावे नमस्कार करून प्रसाद ग्रहण करावा.

ॐ श्री अनघा लक्ष्मी दत्तात्रेयाय नमः

।।अथ श्री अनघाकवचाष्टकम्।।शिरो मे अनघा पातु,भालं मे दत्तभामिनी।भ्रूमध्यं योगिनी पातु,नेत्रे पातु सुदर्शिनी   ।।१।।

नासारंध्रद्वये पातु,योगिशी भक्तवत्सला।।मुखं में मधुवाक्पातु,दत्तचित्तविहारिणी   ।।२।।

त्रिकंठी पातु मे कंठं,वाचं वाचस्पतिप्रिया।स्कंधौ मे त्रिगुणा पातु,भुजौ कमलधारिणी  ।।३।।

करौ सेवारता पातु,ह्यदयं मंदहासिनी।उदरं अन्नदा पातु,स्वयंजा नाभिमंडलम्  ।।४।।

कमनिया कटि पातु,गुह्यं गुह्येश्वरी सदा।ऊरु मे पातु जंभघ्नी,जानुनी रेणुकेष्टदा     ।।५।।

पादौ पादस्थिता पातु,पुत्रदा वै खिलं वपु:।वामगा पातु वामांगं,दक्षांग गुरुगामिनी    ।।६।।

गृहं मे दत्तगृहिणी बाह्ये,सर्वात्मिकाSवतु।                                      त्रिकाले सर्वदा रक्षेत्,पतिशुश्रुणोत्सुका     ।।७।।

जाया मे दत्तवामांगी,अष्टपुत्रा सुतोS वतु।गोत्रमत्रि स्नुषा रक्षेद्,अनघा भक्त रक्षणी   ।।८।।

य: पठेद अनघाकवचं नित्यं भक्तियुतो नर:।तस्मै भवति अनघांबा वरदा सर्व भाग्यदा    ।।इति अनघाकवचाष्टकम्  ।। 

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||

|| दत्त दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, नृसिंह सरस्वती दिगंबरा ||

|| श्री गुरुदेव दत्त ||

टॅग्स :datta jayantiदत्त जयंतीshree datta guruदत्तगुरुspiritualअध्यात्मिक