शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अजित पवार बारामतीमधून माघार घेणार? कार्यकर्त्यांसमोर दिले सूचक संकेत 
3
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
4
Women's T20 World Cup : कॅप्टन Fatima Sana ची अष्टपैलू खेळी; लंकेविरुद्ध पाकचा 'डंका'
5
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
6
मुलीच्या अपहरणाची तक्रार देणारा बापच निघाला विकृत, वडिलांच्याच अत्याचाराला कंटाळून मुलीने सोडले होते घर
7
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
8
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
9
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
10
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
11
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
12
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
13
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
14
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
15
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
16
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
17
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
18
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
20
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार

Margashirsha Guruvar 2023: महालक्ष्मी व्रत करताना 'या' बारा नियमांचे पालन होणेही महत्त्वाचे!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 11:34 AM

Margashirsha Guruvar 2023: आज मार्गशीर्षातला पहिला गुरुवार, त्यानिमित्ताने महालक्ष्मी व्रत करताना दिलेल्या १२ नियमांचेही पालन करा आणि लक्ष्मीकृपा प्राप्त करा!

बाकी कोणतेही सोंग घेता येईल, परंतु पैशाचे सोंग आणता येत नाही. जेव्हा आर्थिक परिस्थिती बिकट असते, तेव्हा सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात. हे मार्ग खुले व्हावेत आणि लक्ष्मी मातेची कृपादृष्टी व्हावी, यासाठी सोपे उपाय करून पहा.

>> रोजच्या देवपूजेच शंखाला स्नान घालून त्याची नियमित पूजा करा. कारण, शंख हे लक्ष्मीचे आवडते स्थान आहे. 

>>लक्ष्मीमातेच्या गळ्यात कवड्यांची माळ आपण सर्वांनी पाहिली असेल. म्हणून देवपूजेत कवड्यांची माळ अथवा कवड्या ठेवून त्यांची पूजा करावी. त्यामुळे धन वृद्धी होते.

>>लक्ष्मी माता कमळात विराजमान असते. ते तिचे आवडते स्थान आहे. दर शुक्रवारी शक्य असल्यास पांढरे, गुलाबी कमळ अर्पण करावे.

>>महिन्यातून एकदा एखाद्या शुभ तिथीच्या निमित्ताने देवीला केशरी रंगाचा साखर भात किंवा पांढऱ्या रंगाचे मिष्टान्न अर्पण करावे. यात खोबरे साखर, दही साखर किंवा खडीसाखरदेखील चालू शकेल.

>>एखाद्या शुक्रवारी देवीला श्रीफळ अर्पण करावे. श्रीफळ हे समृद्धीचे द्योतक आहे.

>>तुमच्या दारात प्राजक्ताचे झाड असेल तर उत्तम! देवीला प्राजक्ताची फुले आवडतात. तुमच्या आजूबाजूच्या परिसरात प्राजक्ताचे झाड असेल, तर सकाळच्या प्रहरी निवडक फुले वेचून देवीला फुलांनी सुशोभित करावे.

>>वैजयंती फुलदेखील लक्ष्मी आणि विष्णूंना प्रिय असते. भक्तीभावाने हे फुल अर्पण केले असता, देवीची कृपादृष्टी लाभते. 

>>केळ्याची बाग जिथे असते, तिथे आर्थिक चणचण भासत नाही. परंतु, प्रत्येकाच्या नशिबात हे सुख नसते. अशा वेळेस जिथे केळ्याचे झाड असते, तिथे सेवा म्हणून पेलाभर पाणी अर्पण करावे. तसेच शक्य असल्यास देवीला केळ्याचा नैवेद्य दाखवून तो प्रसाद सर्वांना वाटावा.

>>ज्या घरात तुळशी वृंदावन किंवा तुळशीचे रोपटे असते आणि रोज सायंकाळी तुळशीपाशी दिवा लावला जातो, त्या घरावर लक्ष्मीची कृपादृष्टी सदैव राहते. 

>>रोज सायंकाळी दिवेलागण झाल्यावर लक्ष्मी घरी येते अशी आपली भावना असते, म्हणून तिच्या स्वागतासाठी रोज आपले अंगण अथवा दाराचा उंबरठा स्वच्छ करून तो रांगोळी काढून सुशोभित करावा. ते स्वागत पाहून देवी प्रसन्न होते.

>>अस्ताव्यस्त, पसरलेले घर आपल्याला आवडत नाही, तर देवीला तरी कसे आवडणार? म्हणून घर कायम स्वच्छ, आवरलेले आणि नीटनेटके असाव़े  अशा घरात देवी मुक्तहस्ते आशीर्वाद देते.

>>जी व्यक्ती आपल्या कुटुंबातील तसेच समाजातील सर्व स्त्रियांचा आदर करते, त्या व्यक्तीवर देवीचा विशेष वरदहस्त असतो. 

टॅग्स :Puja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३