शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अजित पवार बारामतीमधून माघार घेणार? कार्यकर्त्यांसमोर दिले सूचक संकेत 
3
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
4
Women's T20 World Cup : कॅप्टन Fatima Sana ची अष्टपैलू खेळी; लंकेविरुद्ध पाकचा 'डंका'
5
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
6
मुलीच्या अपहरणाची तक्रार देणारा बापच निघाला विकृत, वडिलांच्याच अत्याचाराला कंटाळून मुलीने सोडले होते घर
7
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
8
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
9
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
10
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
11
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
12
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
13
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
14
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
15
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
16
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
17
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
18
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
20
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार

मार्गशीर्ष गुरुवारी वैभव लक्ष्मी व्रताबरोबरच करा 'या' चार गोष्टी; देवीची होईल अपार कृपा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 10:19 AM

Margashirsha Guruvar 2023: १४ डिसेंबर रोजी मार्गशीर्षातला पहिला गुरुवार आहे, त्यानिमित्त आपण वैभव लक्ष्मीचे व्रत करूच; त्याला जोड द्या पुढील चार गोष्टींची!

काही लोकांची वृत्ती असते उधळपट्टी करण्याची तर काही लोक अगदीच कंजूष असतात. मात्र व्यवहारी जगात दोन्ही टोकं गाठून चालत नाही, तर मध्य गाठावा लागतो. यासाठी आर्थिक व्यवस्थापन महत्त्वाचे! लक्ष्मी मातेला तीच लोकं प्रिय असतात, जी आपल्या संपत्तीचा यथायोग्य वापर करतात. तर हा वापर नेमका कसा आणि कुठे करायला हवा, तेही जाणून घेऊ. 

पैसा काटकसरीने वापरायला हवा आणि आपल्या इच्छा आकांक्षांच्या पूर्तीसाठीदेखील खर्चायला हवा. त्याचबरोबर पैशांची गुंतवणूक, साठवण हाही आर्थिक नियोजनाचा महत्त्वाचा भाग असतो. जेणेकरून आपल्या पडत्या काळात मदतीसाठी दुसऱ्या कोणाच्या तोंडाकडे बघावे लागणार नाही! त्याचबरोबर सामाजिक जाणीव ठेवून आपल्या उत्पन्नाचा दशांश अर्थात दहावा भाग धार्मिक, सामाजिक, राष्ट्रीय हितासाठी खर्च करावा असे शास्त्र सांगते. यासाठी पुढे दिलेल्या गोष्टी लक्षात ठेवा. 

धार्मिक ठिकणी दान : धर्मकार्यात आर्थिक मदत करावी. कारण तिथे खर्च केलेला पैसा कोणाच्या व्यक्तिगत उन्नतीसाठी नसून अनेक गरजू लोकांच्या जीवनावश्यक गरजा पुरवण्यासाठी वापरला जातो. एरव्ही आपण कोणा एकाला मदत करण्यासाठी पुरे पडू शकू असे नाही, मात्र धर्मकार्यात उचललेला खारीचा वाटा आपल्याला एकाच वेळी अनेकांचे शुभाशीर्वाद मिळवून देतो. 

आजारी लोकांना मदत करा - कोणत्याही व्यक्तीला मदतीची सर्वात जास्त गरज असते ती त्याच्या आजारपणात! एखाद्याला गरज असेल तर यथाशक्ती मदत जरूर करा. असे केल्याने व्यक्तीला आणि त्यांच्या रुग्णाला दिलासा मिळतो आणि नवजीवन मिळते. एखाद्याचा जीव वाचवणे हे परोपकाराचे सर्वात मोठे कार्य मानले जाते. असे मानले जाते की एखाद्या व्यक्तीला आजारपणात मदत केल्याने जे पुण्य प्राप्त होते, ते यश आणि प्रगतीचे नवीन मार्ग उघडते.

गरिबांना मदत करा- गरीब आणि गरजू यातील फरक आधी ओळखा. काही लोक परिस्थितीने गरीब असतात तर काही जण गरीब असल्याचा आव आणतात. काही न करता सगळे काही फुकट मिळाल्याने ते लोक गरिबीत राहणे पसंत करतात. अशा लोकांना केलेली मदत काही उपयोगाची नाही. याउलट खऱ्या गरजवंताला केलेली मदत त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरते. त्यांच्या सदिच्छा तुमच्या वैयक्तिक आयुष्यात कामी येतील. 

सामाजिक कार्यात दान करा- दान करण्याची इच्छा अनेकांना असते, परंतु ते सत्पात्री व्हावे असेही वाटते. काही लोक सामाजिक संस्थांना दान करून मोकळे होतात. परंतु त्या पैशांचे योग्य प्रकारे नियोजन होत आहेत की नाहीत या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे नुसते दान करून उपयोग नाही तर त्याचा पाठपुरावा देखील करायला हवा. सामाजिक संस्थाना मदत जरूर करावी परंतु त्यांचे कार्य तपासून घ्यावे आणि आपणही शक्य तेव्हा प्रत्यक्ष सहभागी व्हावे.  या गोष्टी केवळ दुसऱ्यांना सहाय्यक ठरतात असे नाही तर तुमचे व्यक्तिमत्त्वही खुलवतात. आपोआप प्रसिद्धी, पैसा, यश प्राप्त होते. म्हणून आपले पैसे योग्य ठिकाणी वापरा आणि दुसऱ्यांबरोबर स्वतःचाही उत्कर्ष करून घ्या!