शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोठी घडामोड! प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांनी निर्णय बदलला, सिंदखेड राजामध्ये शिंदेंच्या उमेदवाराला पाठिंबा दिला
2
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
4
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
5
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
6
लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
7
राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले...
8
Maharashtra Election 2024 Live Updates: मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी अजित पवार गटाचा मोठा निर्णय, खेळी फिरणार?
9
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
10
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
11
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
12
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
13
Mamaearth Shares: कंपनीचा शेअर आपटला; २० टक्क्यांची घसरण, IPO प्राईजच्याही खाली आला भाव
14
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
15
IND vs AUS टेस्टआधी आणखी एक ट्विस्ट; स्पेशल कॉलनंतर पुजारा 'फ्लाइट मोड'वर
16
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
17
शाळांच्या सुट्टीबद्दल शिक्षण आयुक्तालय आणि महापालिकेचा परस्परविरोधी निर्णय
18
'मुन्नाभाई MBBS'मधला स्वामी आता दिसतो खूपच वेगळा, लेटेस्ट फोटो पाहून चाहते झाले अवाक्
19
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
20
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!

Margashirsha Guruvar 2023: महालक्ष्मीच्या पूजेनिमित्त गुरुवारी सवाष्ण जेवू घालून तिची ओटी भरा; शुभाशीर्वाद फळतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 9:02 AM

Margashirsha Guruvar 2023: आपण केलेल्या उपासनेने तृप्त होऊन भगवंत कोणत्या रूपात येऊन आशीर्वाद देऊन जातील सांगता येत नाही, त्यासाठी हे शास्त्रसंकेत पाळावेत. 

आज मार्गशीर्षातला दुसरा गुरुवार. त्यानिमित्ताने आपणही महालक्ष्मीचे व्रत करत असाल तर या व्रताचे फळ मिळावे आणि देवीचा आशीर्वाद मिळावा म्हणून सवाष्ण जेवू घाला असे शास्त्र सांगते. 

लक्ष्मी प्रसन्न व्हावी असे वाटत असेल तर गृहलक्ष्मी तृप्त असायला हवी, हा संसाराचा मूलमंत्र आहे. मात्र कामाच्या धबडग्यात गुंतून गेलेली 'ती' ना स्वतःकडे लक्ष देत ना कोणाचे तिच्याकडे लक्ष जात. अलीकडे आपण 'जागतिक महिला दिन' साजरा करायला लागलो, मात्र भारतीय संस्कृतीने घराघरातल्या 'ती'ची आठवण ठेवत व्रत वैकल्याच्या निमित्ताने पूर्वापार तिचा सन्मान केला आहे. कसा ते पाहू!

हॉटेलमध्ये जेवायला जाणे आताच्या काळात नाविन्यपूर्ण राहिले नाही. उठसूट जंक फूड खाणारे लोक क्वचितच घरी जेवत असतील. मात्र रोज संसार, नोकरी, मुलांच्या शाळा, अभ्यास, नवऱ्याचा डबा, घरच्यांचे जेवण, नाश्ता यात गुंतलेली गृहिणी नवऱ्याने 'बाहेर जेवायला जाऊया का?'विचारल्यावर आनंदून जाते. कारण सकाळ, दुपार, संध्याकाळ 'रांधा वाढा उष्टी काढा' करून ती दमून जाते, कंटाळून जाते. आजही ७० टक्के घरात हेच चित्र आपल्याला दिसेल. 'द ग्रेट इंडियन किचन' या मल्याळम चित्रपटातून या गोष्टीची जाणीव करून दिली आहे. त्यामुळे हॉटेलमध्ये जाऊन आयते गरमागरम जेवणे आणि त्यानंतर पसारा आवरावा न लागणे यातच तिला कोण एक आनंद असतो!

मात्र पूर्वी हॉटेलमध्ये जेवणे असभ्यपणाचे लक्षण मानले जाई. घरातले पुरुष हॉटेलात जात नसत तर स्त्रियांचे जाणे दूरच! सगळ्यांना गरमागरम जेवण वाढणारी, दुसऱ्यांच्या आवडी निवडी जपणारी ती आयते जेवण मिळण्यापासून वंचित राही. अशा अन्नपूर्णेलाही पहिल्या पंगतीचा मान मिळावा म्हणून धर्मशास्त्राने सण उत्सवाच्या निमित्ताने सवाष्ण जेवू घालण्याची प्रथा सुरु केली असावी. 

सण उत्सवाच्या निमित्ताने आप्तेष्टांच्या घरी बोलावल्यावर जेवायला जायचे, पाटावर आयते बसायचे, यथेच्च जेवायचे आणि तृप्ततेची ढेकर द्यायची, हा आनंद कोणत्याही संसारी स्त्रीसाठी शब्दातीत असतो. तसेही रोज रोज आपल्याच हातचे जेवून तिला कंटाळा येतो, म्हणून या निमित्ताने झालेली चवबदल तिला रुचते! हॉटेलमध्ये एखादी पोळी, रोटी, नान एक्ट्रा घेतली तरी तिचे वरचे पैसे मोजावे लागतात, याउलट जेवायला मानाने बोलावल्यावर अगत्याने, प्रेमाने, आपुलकीने पोळीचा, भाताचा, गोडाचा आग्रह केला जातो. त्या पाहुणचाराने ती सुखावते आणि मनापासून आशीर्वाद देते. या सदिच्छा ज्याला आजच्या काळात आपण 'पॉझिटिव्ह वाइब्स'' म्हणतो, त्या संबंधित वास्तूला लाभदायी ठरतात. तृप्त झालेला आत्माच या सदिच्छा देऊ शकतो.

म्हणून आपल्या संस्कृतीत अन्नदानाला महत्त्व दिले आहे. भुकेल्या माणसाला अन्न आणि पैसे यातून काय निवडणार विचारले, तर तो अन्न निवडेल. कारण पैसे कधीही कमवता येतात, मात्र दोन वेळेची भूक शमवता येत नाही. 

गृहिणीला स्वगृही जेवण मिळतेच. पण अशा पद्धतीने केलेला तिचा आदरसत्कार तिला नवीन ऊर्जा, उत्साह आणि प्रसन्नता देतो. म्हणून सण उत्सवाला तिला जेवू घालणे हे तिचे माहेरपण करण्यासारखेच असते. 

धर्मशास्त्राने प्रत्येक समाज घटकाचा दूरदृष्टीने केलेला विचार पाहता आपल्या संस्कृतीबद्दल असलेला अभिमान दुणावतो. म्हणून आपणही ही उद्दात्त संस्कृती पुढच्या पिढीकडे हस्तांतरित केली पाहिजे. आणि आदर्श जीवनाचा वस्तुपाठ घालून दिला पाहिजे. तर मग यंदा महालक्ष्मीच्या पूजेनिमित्त पुरणा-वरणाचा स्वयंपाक जेवायला कोणत्या सखीला आमंत्रित करताय?

टॅग्स :Puja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३