प्रबोधिनी एकादशी झाली की लगोलग तुळशीचे लग्न लागते आणि लग्नाळू मुलामुलींनी वेध लागतात विवाहाचे. चातुर्मासात विवाह कार्य निषिद्ध असल्याने दिवाळी नंतर येणाऱ्या सुमुहुर्ताची सगळेच जण आतुरतेने वाट पाहत असतात. त्यात गेली दोन वर्षे विवाह सोहळ्यावर जणू ग्रहणच लागले होते. सप्तपदी आधी कोरोना नियमांची तप्तपदी चालत जोडप्यांनी लग्न गाठ बांधली. परंतु आता परिस्थिती पूर्ववत होत आहे आणि लग्न मुहुर्ताचाही सुकाळ येऊ घातला आहे, मग आता करा की हो लगीनघाई....
दाते पंचांगात नोव्हेंबर ते मार्च पर्यंत विवाहाचे अनेक मुहूर्त दिले आहेत. त्यानंतर पौष मास लागत असल्याने पुन्हा तो संपेपर्यंत वाट पहावी लागेल. नंतरचे शुभ मुहूर्त नवीन पंचांगात मिळतीलच. तोवर आपण आगामी शुभ मुहूर्तांवर प्रकाश टाकूया. त्यामुळे अधिक वेळ न दवडता लग्नाळू मुलामुलींनी आणि घरच्यांनी लगीन घाई सुरू करा...
आगामी विवाह मुहूर्त नोव्हेंबर - २०, २१, २९, ३०डिसेंबर - १, ७, ८, ९, १३, १९, २४, २६, २७, २८, २९जानेवारी - २०, २२, २३, २७, २९, फेब्रुवारी - ५, ६, ७, १०, १७, १९मार्च - २५, २६, २७, २८