शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
2
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
3
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
4
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
5
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
6
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
7
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
8
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
9
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
10
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
11
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
12
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
13
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक
14
...तर ५० उमेदवार उभे केले असते, समाजाचे योगदान वाया जाऊ देणार नाही; मनोज जरांगेंचे सूचक भाष्य
15
शिवसेना ही बाळासाहेबांची मालमत्ता खरे आहे, पण..; दीपक केसरकरांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर 
16
Maharashtra Election 2024: सरकार आल्यास मविआ कोणासाठी काय करणार? ठाकरेंनी सांगून टाकलं
17
Eknath Shinde : "....मी एकदा नाही तर १० वेळा जेलमध्ये जायला तयार"; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना ठणकावलं
18
लोकसभा निवडणुकीत भुजबळांकडून राजाभाऊ वाजेंना मदत?; हेमंत गोडसेंनी शिवसैनिकांसमोर केला गंभीर आरोप!
19
सुशांतची आत्महत्या नाही तर हत्या! सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचा खळबळजनक दावा, म्हणते, डॉक्टरांनी बदलले पोस्टमोर्टम रिपोर्ट
20
“जयश्री पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार, यांनाच निवडून द्या”; विशाल पाटील यांचे आवाहन

मन हेची परमेश्वर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2020 1:06 PM

Spirituality मनाला एकाग्र करून कठिण साधना केलेल्या मनुष्याची पूजा ईश्वरासमान असते.

आपल्याला जर परमेश्वर हवा असेल तर त्यासाठी ज्ञान हवे नि भक्ती हवी. त्या करिता या मनाला शांत करण्याची गरज आहे. नुसते शांत नाही तर त्याची ओढ़ भक्ती मार्गाकडे कशी लागेल यासाठी प्रयत्न करावा लागेल. मनाची एकाग्रता वाढवावी लागेल. कारण एकाग्रता ही सर्व प्रकारच्या ज्ञानाचा पाया आहे.मन गोरख, मन गोविंद, मन ही औघड होयजो मन राखै जतन करि, आपै करता होय ।।मन हे योगी गोरखनाथ आहे. मन हेच ईश्वर आहे. अर्थात मनाला एकाग्र करून कठिण साधना केलेल्या मनुष्याची पूजा ईश्वरासमान असते. मन एकाग्र करून जो मनुष्य साधना करतो तो स्वत:च आपला करता (स्वामी) होतो.मनाबद्दल संत कबीर म्हणतात...मन मोटा, मन पातरा, मन पानी, मन लायमनके जैसी उपजै, तैसी ही हवै जाय ।।हा मनरूपी भवरा कधी खूपच बलवान बनतो तर कधी अत्यंत नाजुक बनतो. कधी पाण्याच्या समान शीतल तर, कधी अग्निसारखा क्रोधी बनतो. अर्थात जशी आपल्या मनाची इच्छा निर्माण होते, त्याप्रमाणे ते मन परिवर्तित होते. समर्थ रामदासांनी तर ‘मनाचे श्लोक’च लिहिले. आपले दुख आणि चिंता कमी करण्यासाठी स्वतपलीकडचा व्यापक विचार करण्याचा ते सल्ला देतात. म्हणून ते म्हणतात,मना मानसी दुख आणू नको रेमना सर्वथा शोक चिंता नको रे।।विवेके देहेबुद्धी सोडूनि द्यावीविदेहीपणे मुक्ति भोगीत जावी ।।भगवान श्रीकृष्ण म्हणतात की, प्रत्येक वस्तुचा एक स्वभाव असतो. जसे की वाºयाचे घोंगावणे, अग्नीचे पेट घेणे, पाण्याचे अवखळ वाहणे तसाच मनाचा देखील स्वभाव आहे जसे की इच्छा धरणे, चिंता करणे, स्वप्न पाहणे, एखादी गोष्ट घडली की उत्तेजित होणे किंवा अस्वस्थ होणे. मन हे कोबीच्या भाजीसारखे आहे. आपण जर कोबीचा एक एक पदर काढत गेलो तर शेवटी कोबी म्हणून काहीच राहत नाही. तसेच मानवी मनाचे आहे, आपण जर आपले सगळे विचार काढून टाकले तर मन नावाचे स्वतंत्र अस्तित्वच राहत नाही. परंतु असे कधीच होऊ शकत नाही, कारण विचार करणे हा मनाचा स्थायी भाव आहे. संत बहिणाबाईंनी आपल्या लिखानात मनाला उपमा दिली आहे.मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोरकिती हाकल हाकल तरी येत पिकावर ।।याही पलिकडे  जाऊन रामकृष्ण परमहंस असे म्हणतात की, मन म्हणजे माकडाचा खोडकरपणा आणि मस्तवाल हत्तीची चाल आहे. मनाचा स्वभाव हा कधी एकच नसतो. ते ज्या शरीरात असते त्याप्रमाणे आपला व्यवहार करीत असते. तीळामध्ये ज्याप्रमाणे तेल सामावलेले असते, त्याचप्रमाणे मन आपल्या शरीरामध्ये वास करीत असते. ज्यावेळी मन योग्य व अयोग्य गोष्टींचा विचार करून योग्य अशा निर्णयावर येऊन पोचते त्यास बुद्धी म्हणतात. मन जेव्हा एकरूप होऊन विचारांची मांडणी करते व ती साठवते त्यास चित्त असे म्हणतात. जेव्हा मन मदमस्त अवस्थेत येऊन मी मी करते तेव्हा त्याला अहंकार म्हणतात.

 समर्थांनी एका मनाच्या श्लोकात हा इलाज सांगून ठेवलाय. ‘नको रे मना क्रोध हा खेदकारी, नकोरे मना काम नाना विकारी, नको रे मना सर्वदा अंगिकारू, नकोरे मना मत्सरू दंभ भारू !!याउलट, बहिणाबाईंनी आईच्या मायेने सोप्या भाषेत मनाचे वर्णन करून सावधगिरीचा सल्ला दिला. त्या म्हणतात, मन मोकाट मोकाट त्याच्या ठायी ठायी वाटा, जशा वाºयानं चालल्या पाण्यावरल्या रे लाटा. त्या म्हणतात, ‘मन पाखरू पाखरू त्याचि काय सांगू मात, आता वहात भुईवर, गेलं गेलं आभायात.‘ स्वच्छंद मन क्षणात चंद्रावर जाते, तर बुद्धीला तेथे जाण्यासाठी ‘यान’ बनवावे लागते. मन आणि बुद्धीतला हा फरक चांगल्या जीवनाकडे नेतो. मनाला बुद्धीने हाताळले तर जीवन शांत आणि समृद्ध होते.

- शून्यानंद भारतीखामगाव

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक