शहरं
Join us  
Trending Stories
1
बाप-बेटी एकाचवेळी नशीब अजमावणार; निवडणूक शिवाजीनगरमधून लढणार?
2
मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि मेळावाच रद्द झाला; ठाणे जि.प. च्या माजी उपाध्यक्षांना मुरबाड देणार?
3
"बाबा सिद्दीकींपेक्षाही वाईट अवस्था करणार"; सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी, ५ कोटींचाही उल्लेख
4
दिवाळीपूर्वी शेअर बाजारातील तेजीला ब्रेक, घसरणीसह सेन्सेक्स-निफ्टीची उघडले; Midcap स्टॉक्स आपटले
5
मविआचा फॉर्म्युला १००-८०-८०...; दोन दिवसांत तोडगा काढून जागावाटप जाहीर करणार, 'या' एका गोष्टीवर एकमत नाही!
6
IPL 2025: काव्या मारनला धक्का! लिलावाआधी दिग्गज क्रिकेटपटूने सोडली SRH ची साथ
7
Success Story : एकेकाळी RBI मध्ये केलंय काम, आता अब्जाधीशांमध्ये आलंय नाव; कोण आहेत सौरभ गाडगीळ?
8
आजचे राशीभविष्य: ५ राशींना धनलाभ, प्रमोशन, पगारवाढ योग; चैतन्य, उत्साहाचा दिवस
9
आसाम नागरिकत्वाचे ‘कलम ६-अ’ वैधच; १९७१ पर्यंत आलेल्यांना नागरिकत्व - सर्वोच्च न्यायालय 
10
राहुचे नक्षत्र गोचर: ५ राशींना लॉटरी, धनलाभाचे योग; स्वप्नपूर्ती, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
11
राष्ट्रवादीच्या आमदारांसमोर पेच; तिकिटासाठी कोणता झेंडा हाती? आधी करतायत चाचपणी 
12
विषारी दारूकांडातील मृतांची संख्या २९वर; बिहारमध्ये अनेकांचे संसार उघड्यावर, काहींची दृष्टी गेली  
13
खासदारकी तर गेली, आता निदान आमदारकीची इच्छा तरी पूर्ण करा; विधानसभेसाठी पराभूत खासदारांची भाऊगर्दी 
14
कलम ३७० रद्दचा निर्णय कायम ठेवणारे न्या. संजीव खन्ना होणार सरन्यायाधीश; ५१वे सरन्यायाधीश म्हणून ६ महिने राहणार पदाव
15
मुलासमोर लैंगिक संबंध, नग्न होणे लैंगिक छळच; पोक्सो कायद्यानुसार गुन्हा - केरळ हायकोर्ट
16
१३ काेटी लाेक अत्यंत गरीब; १८१ रुपयांपेक्षाही कमी रोजची कमाई, दाेन वर्षांत गरिबीत घट
17
देशाला प्रथमस्थानी ठेवण्यासाठी मतदान करा; मी नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करते - हॅरिस 
18
न्या. संजीव खन्ना नवे सरन्यायाधीश! सरन्यायाधीश चंद्रचूड यांची शिफारस, ११ रोजी शपशविधी
19
भाजपाचा नेता ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश; सावंतवाडीत दीपक केसरकरांची चिंता वाढली?

मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 1:36 PM

Mohini Ekadashi 2024: कधी आहे मोहिनी एकादशी? कसे करावे व्रताचरण? व्रतपूजनाची सोपी पद्धत कोणती? जाणून घ्या...

Mohini Ekadashi 2024: मराठी वर्षातील प्रत्येक महिन्याच्या शुद्ध आणि वद्य पक्षात येणाऱ्या एकादशीला विशेष व्रतपूजन केले जाते. श्रीविष्णूंचे पूजन करून त्यांचा शुभाशिर्वाद प्राप्त करायचा असेल, तर एकादशी सर्वोत्तम मानली गेली आहे. वैशाख महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशीला मोहिनी स्मार्त एकादशी म्हणतात. एकादशीला पौराणिक महत्व प्राप्त आहे. मराठी वर्षात येणाऱ्या प्रत्येक एकादशीचे महत्त्व आणि महात्म्य वेगळे आहे. मोहिनी एकदाशीचा शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता, व्रतपूजनाची सोपी पद्धत, व्रतकथा जाणून घेऊया...

मोहिनी एकादशीला भगवान विष्णूचे मोहिनी रूप मानले जाते. समुद्र मंथनानंतर बाहेर पडलेला अमृत कलश मिळवण्यासाठी देवता आणि राक्षसांमध्ये वाद झाला. हा वाद पाहून देवतांनी भगवान विष्णूची मदत मागितली. मग राक्षसाचे लक्ष कलशांच्या अमृतापासून दूर करण्यासाठी भगवान विष्णूने मोहिनीचे रूप धारण केले. भगवान विष्णूचे सुंदर स्त्रीरूप  पाहून राक्षस आकर्षित झाले. त्यावेळेस देवांनी अमृत प्राशन केले. ही घटना वैशाख महिन्याच्या शुद्ध एकादशीला घडली, अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या एकादशीला मोहिनी एकादशी म्हणतात. 

मोहिनी एकादशीला अनेक शुभ योग

सन २०२४ मध्ये रविवार, १९ मे रोजी मोहिनी एकादशी आहे. या दिवशी दुपारी ०१ वाजून ४९ मिनिटांनी एकादशीची सांगता होणार आहे. त्यामुळे सकाळी सूर्योदयाला मोहिनी एकादशीचे व्रतपूजन करावे, असे सांगितले जात आहे. मोहिनी एकादशीला द्विपुष्कर योग, अमृत सिद्धी योग, सर्वार्थ सिद्धी योग यांसह अनेक शुभ आणि फलदायी योग तयार होत आहेत. 

व्रतपूजनाची सोपी पद्धत जाणून घ्या

मोहिनी एकादशी व्रत आणि श्रीविष्णू पूजनाचा संकल्प करावा. श्रीविष्णूंची चौरंगावर स्थापना करावी. श्रीविष्णूंचे आवाहन करावे. यानंतर पंचामृत अभिषेक अर्पण करून त्याचाच नैवेद्य दाखवावा. मुख्य अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर वस्त्र, गंध, अक्षता, तुळशीची पाने, ऋतुकालोद्भव फुले, फळे श्रीविष्णूंना अर्पण करावीत. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून श्रीविष्णूंची आरती करावी. यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचे पठण किंवा श्रवण करावे. यथाशक्ती दान करावे. ॐ नमो भगवते वासुदेवाय, हा १०८  वेळा जप करावा. 

मोहिनी एकादशीच्या व्रताची सांगता कशी करावी?

एकादशीचे व्रत आचरणाऱ्यांना मनात कोणत्याही प्रकारचा संशय ठेऊ नये. व्रतदिनी केवळ फलाहार घ्यावा. ज्यांना केवळ फलाहार करणे शक्य नाही, त्यांनी सात्विक आहार घ्यावा. शक्यतो कांदा, लसूणयुक्त उग्र पदार्थ खाणे टाळावे. एकादशी दिनी केलेल्या व्रतानंतर दुसऱ्या दिवशी उठून स्नानदिक कार्ये आटोपल्यानंतर की, एकादशी व्रत सांगतेचा संकल्प करून तो पूर्ण करावा. यावेळी श्रीविष्णूंची मनोभावे पूजा करावी. व्रताच्या यशस्वीतेसाठी श्रीविष्णूंचे आभार मानावेत. व्रत आचरण काळात कोणाबाबतही अपशब्द बोलू नयेत. पूजा करताना कोणाच्याही बाबतीत मनात ईर्ष्या उत्पन्न करू नये. तसेच व्रताचरण करताना अनावधानाने झालेल्या चुकांबाबत श्रीविष्णूंकडे क्षमायाचना करावी. प्रभू श्रीरामांनी मोहिनी एकादशीचे व्रत केले होते, अशी मान्यता आहे. 

 

टॅग्स :Puja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३spiritualअध्यात्मिक