शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
3
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
4
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
5
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
6
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
7
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
8
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
9
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
10
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
11
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
12
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
13
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
14
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
15
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
17
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार
18
"त्याचा लहान भाऊ म्हणून...", छोटा पुढारीने सूरज चव्हाणबाबतीत दिला मोठा शब्द
19
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते विधानसभेच्या रिंगणात, आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढणार!
20
महाराष्ट्रातील क्रीडारत्नांचा सन्मान! अविनाश साबळेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, प्रदीप गंधेंना 'जीवन गौरव'

Mokshada Ekadashi 2023: मोक्षदा एकादशीनिमित्त जाणून घ्या मोक्ष मिळवण्याचे पाच सोपे मार्ग!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 11:44 AM

Mokshada Ekadashi 2023: जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकू नये असे प्रत्येक जीवाला वाटते, याच इच्छेची पूर्तता करणारी एकादशी म्हणजे मोक्षदा एकादशी २३ डिसेंबर रोजी आहे!

मोक्ष म्हणजे काय, तर सुटका! मग ती अनेक गोष्टींमधून असू शकते. नावडते ठिकाण, नावडती व्यक्ती, नावडते विषय, नावडते काम अशा नावडत्या गोष्टीतून स्वत:ची सुटका झाली, की तो क्षण आपल्याला मोक्षप्राप्तीचा आनंद देणारा ठरतो. मात्र, यापलीकडे अध्यात्म मार्गात जो 'मोक्ष' आहे, तो देखील सुटका करणाराच आहे, फक्त ती सुटका विषयांमधून, संसारातूनच नाही, तर जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून असते. २३ डिसेंबर रोजी मोक्षदा एकादशी, त्यानिमित्त मोक्ष ही संकल्पना सविस्तर समजवून घेऊ. 

आपण म्हणू, पुनर्जन्म कोणी पाहिलाय? जर पुनर्जन्माला कोणताही शास्त्रीय आधार नाही, तर मोक्षाची कल्पनाच बाद ठरेल. तर, याबाबत शास्त्र सांगते, आपल्या दृष्टीला दिसणारे, न दिसणारे असे असंख्य जीव-जिवाणू धरून एकूण ८४ लक्ष योनी आहेत. त्या देहातून प्रवास करत आत्मा मनुष्य देहात येतो. मनुष्य देहातून आत्म्याची सुटका झाली, तर आत्मा मुक्त होतो, म्हणजेच त्याला मोक्ष मिळतो. मात्र, तसे झाले नाही, तर तो पुन्हा ८४ लक्ष योनीच्या दुर्धर प्रवासात अडकतो. एका जन्मात एवढी सुख-दु:खं, हाल-अपेष्टा, न्याय-अन्याय सोसल्यानंतर कोणत्या जिवाला पुनश्च जन्म घ्यावासा वाटेल? ती कल्पनादेखील असह्य होईल. म्हणून नरदेह हा मोक्षाचा मार्ग ठरवला आहे. 

भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे,

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः । न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ।

आत्मा अमर आहे. त्याला कोणतेही शस्त्र भेदू शकत नाही, मारू शकत नाही, जाळू शकत नाही, पुरू शकत नाही. आत्म्याला परमात्म्याशी संधान साधायचे असते. मात्र, आपण एवढी पापे करून ठेवतो, की आत्माल्या नाईलाजाने पुन्हा पुन्हा वेगवेगळा देह धारण करून क्लेषदायी प्रवास करावा लागतो. 

मोक्ष मिळवण्याचा सोपा मार्ग कोणता?

याबाबत सुप्रसिद्ध निवेदिका धनश्री लेले वर्णन करतात, `मोहाच्या क्षणी दिलेला नकार, म्हणजे मोक्ष!' अतिशय सोप्या व्याख्येत त्यांनी मोक्ष शब्दाची व्याप्ती आणि उकल सांगितली आहे. मनुष्य अडकतो, कारण तो मोहाला बळी पडतो. मात्र, योग्य वेळी दिलेला एक ठाम नकार, आयुष्याला कलाटणी देतो. तोच मोक्ष! 

मोक्ष मिळवण्यासाठी ५ गोष्टींचे पालन करावे.

>>हिंसा न करणे.>>चोरी न करणे.>>व्यभिचार न करणे.>>खोटे न बोलणे.>>मादक पदार्थांचे सेवन न करणे. 

हे नियम वाचत असताना, नकळत आपल्या मनात या नियमांशी आपले आचरण जुळते का, हा विचार डोकावला असेल. कदाचित जाणते-अजाणतेपणी आपल्या हातून अनेक चुका घडल्या असतीलही. परंतु, वेळ गेलेली नाही. या क्षणापासून वरील नियम आचरणात आणायचे, असा ध्यास घेतला, तरी मृत्यूच्या आधीच मोक्षप्राप्तीचा अर्थात वाईट गोष्टीत न गुंतल्याचा मनस्वी आनंद मिळू शकेल. आपल्या आचरणाची यादी स्वच्छ असेल, तर मृत्यूपश्चात आत्मादेखील मुक्त होईल आणि त्याला मोक्ष मिळेल. 

मोक्ष मिळेल न मिळेल, याचा विचार न करता, आपल्याला आपले वर्तन नेहमीच शुद्ध ठेवले पाहिजे. आपण रोज झोपतो आणि झोपून उठतो, हाही आपला पूनर्जन्मच आहे. कालच्या दिवसात आपल्या हातून काही पाप घडले असेल, तर त्याचे ओझे आजच्या दिवशी आपल्या डोक्यावर राहील. त्याचे निवारण करण्यात आजचा दिवस वाया जाईल. म्हणून, उद्याचा विचार न करता आपले वर्तमान शुद्ध ठेवा. कोणत्याही क्षणी आपल्याला इहलोकीची यात्रा संपवावी लागली, तरी आपल्या नावावर कोणतेही गैरवर्तन नसेल. त्यामुळे आपसुकच मोक्षाचा मार्ग खुला होईल.