शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

'पैसा आणि पुण्य' ३६ की ६३ | Shri Pralhad Wamanrao Pai and Urmila Nimbalkar | Lokmat Bhakti

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 12:27 IST

 'पैसा आणि पुण्य ६३ की ३६' प्रत्येक माणसाला समृध्द जीवन जगावं असच वाटते. त्यासाठी तो धडपड करत असतो. म्हणजेच ...

 'पैसा आणि पुण्य ६३ की ३६'प्रत्येक माणसाला समृध्द जीवन जगावं असच वाटते. त्यासाठी तो धडपड करत असतो. म्हणजेच काय तर जीवनात काहीही कमी पडू नये यासाठी जमेल त्या मार्गाने पैसा कमविण्याचा प्रयत्न करतो. परंतु हाच पैसा कमवत असताना कधी कधी नैतिक मूल्ये हरवून बसतो. परिणामी त्याला जीवनात अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागते. यू ट्यूब वरील लोकमत भक्ती ह्या चॅनेल वर ' पैसा आणि पुण्य ६३ की ३६' या भागामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला निंबाळकर यांनी विचारलेल्या प्रश्नांना  जीवनविद्या मिशन चे आजीव विश्वस्त, तत्वचिंतक श्री प्रल्हाददादा सांगतात की जीवन जगण्यासाठी पैसा कमविणे आवश्यक आहेच. परंतु पैशाबरोबर पुण्याईचे महत्व समजून घेतले पाहिजे.कारण जीवनविद्या मिशन चे प्रणेते, थोर समाजसुधारक सद्गुरू श्री वामनराव पै सांगतात की  प्रपंच सुखाचा करणे म्हणजेच परमार्थ . आपण जीवन जगताना प्रपंच आणि परमार्थ यात सुवर्णमध्य साधता आला पाहिजे .म्हणजेच काय तर पैसा कमवताना पुण्याईचे महत्व पण समजून घ्यायला हवे. पैशाने आपल्याला सुखसोयी विकत घेता येतात, जसे गाडी,आलिशान घर, विविध चैनीच्या वस्तू. घेण्यासाठी पैसा हवा पण मनस्वास्थ्य फक्त पुण्याईनेच मिळते . पैशाने शरीराची सोय होईल. पण मानसिक सुख,आत्मिक सुख पैशाने विकत घेता येणार नाही. त्यामुळे पैसा आणि पुण्य दोन्ही जीवनात हवेच किंबहुना जीवनविद्या असे सांगते की पुण्याईची कमाई पैशा पेक्षा काकणभर जास्तच हवी. याचा अर्थ पैसा आणि पुण्य याचा ६३ चा आकडा म्हणजे एकमेकांशी सुसंगत असायला हवे.पैसा कमवताना वाईट मार्गाने कमवला तर पाप निर्माण होते असे काही लोकांना वाटते, तर काही लोक म्हणतात की पाप पुण्य सर्व झूट आहे. मुळात पाप आणि पुण्य म्हणजे नेमकं काय हे समजून घ्यायचा हवे. जीवनविद्या असे सांगते की आपण जीवन जगताना जी कर्म करतो त्यातून पाप किंवा पुण्य निर्माण होते. आजकाल लोक कशालाही पाप किंवा पुण्य समजतात. त्यासाठी खालील गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे.१) आपण केलेल्या सत्कर्मातून पुण्य व आपण केलेल्या दुष्कर्मातून पाप निर्माण होते. २) जे पुण्य निर्माण होते ते आपल्या जीवनात सुख समृद्धी,यश,,पैसा सर्व काही मिळवून होते.३)याउलट दुष्कर्मातून निर्माण झालेले पाप मात्र जीवनात दुःख, ताप निर्माण करते.जर तो पैसा प्रामाणिक पणे, कर्तव्य बुध्दीने काम करून, विधायक कामातून मिळविला असेल आणि चांगल्या कामासाठी खर्च केला असेल तरच त्यातून पुण्य निर्माण होते.४) त्याविरुद्ध जर पैसा बेकायदेशीर मार्गाने मिळविला असेल तर तो सुख देऊच शकत नाही.काही लोक खूप कष्ट करतात पण हवे तसे यश त्यांना मिळत नाही कारण त्यांच्या गाठीशी पुण्य नसते. बरे तर पुण्याईचे कोणते पासबुक नाही की ज्यातून कळेल की इतके पुण्य जमा आहे. लोक म्हणतात की नशिबात असेल तर यश मिळेल. जीवनविद्या इथे मार्गदर्शन करते की नशीब सुद्धा आपल्या कर्मातूनच येते. आपण केलेल्या चांगल्या कर्माचे फळ म्हणजे  जीवनात मिळालेले यश. दोन माणसे सारखेच प्रयत्न करतात पण यश मात्र ज्याच्या गाठीशी पुण्य आहे त्यालाच मिळते. हे पुण्य आधीचे जमा असल्याने सुख मिळते. जेव्हा आपण सर्व चांगल्या गोष्टी जीवनात उपभोगतो तेंव्हा हे पुण्य खर्ची पडते. आणि दुःखाचे अनुभव येतात. अशा वेळेस पाप पुण्याचा संबंध आपल्या कर्माशी आहे  .म्हणजेच काय तर सत्कर्माचे महत्व समजून सतत आपल्या हातून ते घडले पाहिजे.तरच मानवी जीवनात क्रांती होईल. चांगले आईवडिल, पती पत्नी, गुणी मुले  यश, समृद्धी आणि मनशांती  योग्य मार्गदर्शन करणारे सदगुरू हे सर्व पुण्याईने मिळते. त्यामुळे आज आपण सुखी आहोत याचा अर्थ आपली पुण्याई खर्च झाली आहे.ती भरून काढायला हवी त्यासाठी विचार, उच्चार आणि आचार या तीनही स्थरावरून सत्कर्म केले पाहिजे. आपण काय बोलतो , काय चिंतन करतो इथे सावध राहून पुण्याई भरून काढायला हवी. 

पुण्य कमविण्याचे सोपे उपाय१)सतत इतरांचे भले व्हावे, चांगले व्हावे अशी इच्छा, असे चिंतन केले पाहिजे. २) जीवनविद्या विश्वप्रार्थना शिकवते. अत्यंत कृतज्ञतेने मनापासून ही प्रार्थना म्हटली तर अगणित पुण्य सहज निर्माण होते. ३)आपण आपल्या कुवतीप्रमणे दान करु शकतो. अन्न दान, श्रम दान, अवयव दान, सर्वात महत्वाचे ज्ञान दान हे होय. थोडक्यात जीवनविद्येचा मंत्र स्मरणात कायम असू दे. शुभ चिंतावे, शुभ ईच्छावे, वचनी शुभ बोलावे, शुभ कर्माच्या सामर्थ्याने सोने करावे जीवनाचे.सदर विषयावर विस्तृतपणे जाणून घेण्यासाठी लोकमत भक्ती  ह्या यू ट्यूब चॅनेल वरील ' पैसा आणि पुण्य ३६ की ६३' या विषयावर श्री प्रल्हाददादा वामनराव पै यांचा व्हिडिओ अवश्य पहा ही, वाचकांना नम्र विनंती. www.youtube.com/watch?v=1VoeJ4tylGY 

टॅग्स :Wamanrao Paiवामनराव पै