'जोडोनिया धन उत्तम व्यवहारे' असे तुकाराम महाराज सांगतात. अध्यात्म मार्गाचा अवलंब करणारे संतदेखील प्रपंच चालवण्यापुरते धन कमवा असा सल्ला देतात, याचाच अर्थ पैसा आणि पुण्य यांची सांगड घालण्याचे जणू प्रशिक्षणच देतात. परंतु आजतागायत आपल्याला दोहोंचा मध्य गाठणे जमलेले नाही. यासाठी संतांचा विचार सोप्या शब्दात आपल्याला समजावून सांगणार आहेत श्री. प्रल्हाद वामनराव पै. त्यांच्याशी संवाद साधणार आहेत उर्मिला निंबाळकर. १८ मार्च रोजी रात्री ८ वाजता लोकमत भक्ती या युट्युब चॅनेलवर हा मार्मिक संवाद आपल्याला ऐकता येणार आहे.
श्री. प्रल्हाद पै हे आपल्याला ज्येष्ठ निरुपणकार म्हणून परिचित आहेत. ते सद्गुरू श्री वामनराव पै यांचे चिरंजीव आहेत. जीवनविद्या तत्वज्ञानाचे ही सद्गुरू वामराव पै यांनी सुरु करून दिलेल्या संस्थेचे सर्वेसर्वा आहेत. वडिलांप्रमाणे प्रल्हाद पै यांनाही तत्वज्ञानाची आवड आहे. कारण तत्वज्ञान हे वैज्ञानिक, व्यावहारिक आणि प्रत्येक जीवनात प्रत्येक व्यक्तीसाठी उपयुक्त ठरते. जीवनविद्या तत्वज्ञान हे मानसशास्त्र, परजीवी विज्ञान आणि मेटाफिजिक्सचे उत्कृष्ट संयोजन आहे. त्यांनी अनेक वर्षांपासून समुपदेशन सत्रे घेतली आहेत आणि जीवनविद्या तत्वज्ञानाची तत्त्वे लागू करून सामान्य माणसाचे जीवन उन्नतीत आणण्यास मदत केली आहे.
अशाच जीवन विद्येचे आपणही रस ग्रहण करूया आणि आज रात्री होणाऱ्या चर्चा सत्रात सहभागी होऊया.