अध्यात्म
गोरक्षनाथ महाराज शिंदेदत्त मंदिर प्रमुख,तळवडी (ता. कर्जत), जि. अहमदनगर.
जो मज अनन्य शरण। त्याचे निवारी मी जन्म मरण। या लागी शरणगता शरण्य मि चि एकू।।८८
ही नवव्या अध्यायातील ओवी आहे. ज्ञानेश्वरीचा नववा अध्याय म्हणजे भक्ती योग आहे. भक्तीचा महिमा सांगणारा हा अध्याय आहे. जो मला एक एकनिष्ठेने शरण येतो. त्याला जन्म मरणापासून मी मुक्त करतो म्हणून शरणगताचे रक्षण करणारा एकटा मीच आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरांनी नवव्या अध्यायामध्ये भक्तीयोग मांडला आहे. या ओवीमध्ये चार भाग पडतात. ते असे- १) शरण जाणारा कोण? २) शरण कोणाला जायचे? ३) शरण कशा प्रकारे जायचे? ४) शरण गेल्यानंतर फायदा काय होतो?
पहिल्या भागात शरण जाणारा कोण? यावर संत ज्ञानेश्वर महाराजांनी साधकाला उत्तर देताना सांगितले की, शरण जाणारा जीव आहे. जीव हा बध्द अवस्थेत असतो. त्याला जन्म-मरणाचे बंधन असते म्हणून शरण जाणारा जीव होय.
दुसºया भागात शरण कोणाला जायचे? तुकाराम महाराज कलयुगामध्ये ३३ कोटी देव आहेत. त्यापैकी कोणत्या देवाला शरण जायचे? याबाबत ज्ञानेवर महाराज सांगतात..अशा देवाला शरण जायचे त्याचे पाय सम आहेत. ज्याची दृष्टी विटेवर आहे. ज्याचे हात कमरेवर आहेत. अशा विठ्ठलाला शरण जायचे.
शरण कशा प्रकारे जायचे?-एके ठिकाणी चोखामेळा म्हणतात,
ऊस ढोगा परी रस नव्हे ढोगा।।काय भुललाशी वरिल्या रंगा।।नदी ढोगी परिजल नव्हे ढोगे।।चोखा ढोगा परि भाव नव्हे ढोगा।।
शरण कशा प्रकारे जायचे..यावर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अनन्य भावनेने शरण जायचे.
चवथ्या भागात शरण गेल्यावर काय फायदा होतो. यावर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात.., जगात सर्व गोष्टी फायद्यासाठी करतात. तर देवाला शरण गेल्यावर फायदा काय होतो. तर देव आपल्याला चौºयांशी लक्ष योनीमध्ये आपल्याला साक्षी असतो. या जन्म मरणापासून मुक्ती करतो.
याबाबत एक उदाहरण देता येईल.एक गजेंद्र असतो. तो पाण्यात जातो. त्याला नक्र पकडतो. त्यावेळी तो आपल्या पत्नीला हाक मारतो. मुलाला हाक मारतो तरीही ते येत नाहीत. शेवटी एक फळ घेतो. गजेंद्र हे फळ जगाच्या कर्त्याला अर्पण करतो. लगेच भगवान विष्णू येतात. गजेंद्राला नक्राच्या तावडीतून सोडवतात. याप्रमाणेच मानवी जन्म लक्ष ८४ योनी सुकल करतो. तो भवगनात आहे हा फायदा होतो.
याचा सार असा आहे की, या जगामध्ये संसार कुणाचाही पुरा होत नाही. या जगामध्ये कुणाचेही पोट भरत नाही. त्यामुळे सध्याच्या कलयुगामध्ये आई, वडील, गुरु, ग्रंथ आणि नामस्मरण हेच तारणहार आहे. त्यासाठी प्रत्येकाने संत ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांची जोपासना करणे आजच्या काळात गरजेचे बनले आहे.