श्रावण शुद्ध पंचमीचा दिवस नागपंचमी (Nag Panchami 2023)म्हणून साजरा केला जातो. शास्त्रानुसार या दिवशी नागांची पूजा केल्याने व्यक्तीला कालसर्प दोषापासून (Kal Sarpa Dosha) मुक्ती मिळते. तसेच आध्यात्मिक शक्ती, संपत्ती प्राप्त होऊन अन्य इच्छा पूर्ण होतात. या दिवशी काही विशेष उपाय देखील फायदेशीर ठरतात. नागपंचमीच्या दिवशी, कालसर्प दोषाने पीडित लोक भगवान शंकराची विधिवत पूजा करतात आणि विशेष मंत्रांचा जप करतात. या पूजेचे फलित म्हणजे कालसर्प दोषातून सदर व्यक्तीची सुटका होते. परंतु कालसर्प पूजेसाठी तीर्थक्षेत्री जाणे, पूजा करणे सर्वांना शक्य होईलच असे नाही. तसेच परवडेलच असे नाही. यासाठी ज्योतिष शास्त्राने काही मंत्र दिले आहेत, त्यांचा जप विशेषतः नागपंचमीला करावा असे सुचवले आहे.
काल सर्प दोष किंवा राहूच्या शांतीसाठी उपासना करण्यासाठी 'ओम नवकुले विद्यामहे विषदन्तै धीमहि तन्नो सर्प: प्रचोदयात' या नाग गायत्री मंत्राचा जप कालसर्प दोष (Kal Sarpa Dosha) दूर करण्यात प्रभावी ठरतो. याशिवाय नागपंचमीला 'ओम नमः शिवाय' आणि 'ओम नागदेवताय नमः' या मंत्राचा जप देखील उपयुक्त ठरतो. या मंत्राचा जप दिवसातून १०८ वेळा करावा.
कालसर्प आणि नागपंचमी यांचा परस्पर संबंध :
श्रावण शुद्ध पंचमीला साजरी होणारी नागपंचमी ही नागांना समर्पित असून या दिवशी नागांची पूजा श्रद्धेने करावी. वेद आणि पुराणात नागांची उत्पत्ती कश्यप ऋषींपासून झाल्याचे मानले जाते. शास्त्रानुसार ब्रह्मा, विष्णू महेश यांचा नागावर लोभ दिसून येतो. पुराणात भगवान सूर्याच्या रथात बारा नागांचा उल्लेख आहे. भगवान श्रीकृष्णाचे शेषनागावरील प्रेम कुणापासून लपलेले नाही. ब्रह्मदेवांनी नागांना वरदान दिले आणि नागपंचमीला त्यांची पूजा केली जाईल असे सांगितले. त्यामुळे नागपंचमीचा हा सण खूप महत्त्वाचा आहे. या सर्व देवतांचा नागाप्रती असलेला लोभ पाहता कुंडलीतील सर्प दोष दूर करण्यासाठी नागपंचमी (Nag Panchami 2023)या तिथीची निवड केली जाते. व त्या दिवशी वरील उपाय केले जातात.
नागपूजेबरोबरच पुढील नियम पाळावेत :
या दिवशी मातीपासून फुले, फळे, धूप, दिवे आणि इतर विविध रूपांनी साप बनवून त्यांची पूजा केली जाते. नागपंचमीच्या दिवशी विशेषत: संतानप्राप्तीसाठी, कालसर्प दोष, कुष्ठरोग, क्षयरोग दूर करण्यासाठी तसेच लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि कोणत्याही प्रकारच्या भयंकर दुःखापासून मुक्ती मिळावी यासाठी पूजा केली जाते.
नागपंचमीला हे उपाय करा
>>असे मानले जाते की ज्या लोकांच्या कुंडलीत कालसर्प योग आहे, त्यांनी श्रावण महिन्यात विशेषतः नागपंचमीच्या दिवशी रुद्राभिषेक करावा. त्यानंतर गरजू ब्राह्मणाला किंवा गरजू व्यक्तीला दान धर्म करावा.
>>ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीत कालसर्प दोष असल्यास नाशिकचे पवित्र ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन नागपंचमीच्या दिवशी पूजा केल्यास काल सर्प दोषापासून मुक्ती मिळते.
>>जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत काल सर्प दोष असेल तर त्या व्यक्तीने गळ्यात ८, ९ आणि १० मुखी रुद्राक्ष धारण करावे. तसेच महामृत्युंजय मंत्राचा जप नियमितपणे करावा.
>>ज्यांना कालसर्प दोष शांती करणे परवडणार नाही, अशा लोकांनी काल सर्प दोष निवारण स्तोत्र नागपंचमीला म्हणावे, असे ज्योतिष शास्त्र सांगते.
>>ज्योतिषशास्त्रानुसार, श्रावण महिन्यात राहु-केतूच्या मंत्रांचा नियमित जप केल्याने काल सर्प दोषाचा प्रभावही कमी होऊ शकतो.