शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
3
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
5
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
6
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
7
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
8
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
9
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
10
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
11
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
12
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
13
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
14
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
15
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
16
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
17
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
18
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
19
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
20
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल

Nag Panchami 2023: नागाशी संबंधित आठ महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या आणि नागपंचमीला 'या' चुका टाळा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 11:47 AM

Nag Panchami 2023: नागपंचमीच्या निमित्ताने जाणून घ्या नागाशी संबंधित महत्त्वपूर्ण गोष्टी!

नागपंचमीला आपण नागाच्या प्रतिमेची पूजा करतो, त्याला दुधाचा नैवेद्य दाखवतो. काही ठिकाणी खऱ्या नागाची पूजादेखील केली जाते. मात्र नागाचे पूजन करण्याबरोबरच काही महत्त्वपूर्ण गोष्टी माहीत असणे गरजेचे असते. त्याबद्द्दल माहिती देत आहेत ॐकार सुहास काणे... 

>> नाग/ साप दूध पीत नाही, तो पूर्णतः मांसाहारी जीव आहे.

>> नागमणी, नागाच्या डोक्यावर केस इ. अंधश्रद्धा आहेत.

>> नाग डूख धरून, व्यक्ती लक्षात ठेवून पाठलाग करू शकत नाही.

>> साप अमर नसतात. सापाची कात विषारी नसते.

>> सामान्य नागरिकांनी साप बंदिस्त ठेवणे हा गुन्हा आहे. ती परवानगी संबंधित औषधनिर्माण क्षेत्रातील संशोधन संस्थांना असते.४ विषारी प्रजाती - नाग, मण्यार, घोणस, फुरसे सोडून महाराष्ट्रात अपवादानेच आग्या मण्यार इ. विषारी जात पूर्वेकडच्या जिल्ह्यांमधे आढळते. इतर सर्व जाती बिनविषारी किंवा निमविषारी असतात. त्यांच्या दंशाने माणसाचा मृत्यू होत नाही.

>> महाराष्ट्रातील सजग शेतकरी शक्यतो धामण, दिवड, नानेटी इ. सहज ओळखता येणारे बिनविषारी साप ओळखून मारत नाही.साप हाताळण्यामध्ये कुठलंही शौर्य नाही, आपण प्रमाणित सर्पमित्र नसल्यास साप हाताळू नयेत. दृष्टीस पडल्यास सर्पमित्रांना बोलवावे व सापाच्या हालचालीकडे फक्त लक्ष ठेवावे.

>> साप चावल्यानंतर त्या व्यक्तीला सरळ जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी घेऊन जावे, शक्य असल्यास त्या सापाचा फोटो किंवा स्वसंरक्षणार्थ त्याला मारला असल्यास तो साप काठी इ. उपकरणांनी हाताळून काळजीपूर्वक घेऊन जावा. कुठल्याही मंत्र तंत्राने विष उतरत नाही.साप शेतकऱ्यांचे मित्र आहेत. हजारो किलो धान्याची नासाडी करणाऱ्या उंदरांना ते फस्त करतात, म्हणूनच हिंदू संस्कृतीत नागपंचमी हा सण त्यांच्याप्रति कृतज्ञता म्हणून साजरा केला जातो.

>> सापांना शक्यतो न मारता सर्पमित्रांच्या ताब्यात देणे, सापांच्या नैसर्गिक अधिवासात अकारण ढवळाढवळ न करणे, उंदीर मारण्यासाठी चिकट पॅडचा वापर टाळणे, वापर केल्यास ते उघड्यावर न टाकणे, थंड वातावरणात साप उबेसाठी डांबरी रस्त्यांवर येतात तेव्हा वाहने जपून चालवणे इ. मार्गाने आपण त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करू शकतो.

टॅग्स :Nag Panchamiनागपंचमी