भारतात प्राचीन काळापासून अनेक पुराणे, ग्रंथ, शास्त्रे यांना फार महत्त्व आणि मान्यता आहे. ज्योतिषशास्त्रही प्राचीन काळापासून मान्यता पावलेले शास्त्र आहे. खगोलाच्या आधारे जन्मकुंडलीचा अभ्यास करून व्यक्तीविषयी भूत, भविष्यातील घटनांचे अंदाज ज्योतिषशास्त्रात बांधले जातात. नक्षत्र, राशी, ग्रह यांच्या माध्यमातून तर्क लावले जातात. ज्योतिषशास्त्राच्या विविध शाखा असून, त्या माध्यमातूनही काही गोष्टी सांगितल्या जातात.
ज्योतिषशास्त्रात एखाद्या व्यक्तीचे नाव कोणत्या अक्षराने सुरू होते, यालाही महत्त्व देण्यात आले आहे. त्यानुसार, त्या व्यक्तीचा स्वभाव, वैशिष्ट्य, व्यक्तिमत्त्व, यश, प्रगती, धन-वैभव याचा अंदाज बांधला जाऊ शकतो. काही अक्षराने नाव सुरू होणाऱ्या व्यक्ती धन-वैभवाच्या बाबतीत खूपच लकी असतात, असे मानले जाते. त्यांना यशही भरपूर मिळते, असे सांगितले जाते. जाणून घेऊया...
A अक्षराने नाव सुरू होणाऱ्या व्यक्ती
- ज्या व्यक्तींच्या नावाचे पहिले अक्षर A असते, अशा व्यक्ती अत्यंत मेहनती आणि प्रामाणिक मानल्या जातात. या व्यक्तींना अपेक्षेनुसार उशिरा यश आणि प्रगती प्राप्त होते. मात्र, तोपर्यंत ते प्रयत्न करणे सोडत नाहीत, ही या व्यक्तींची खासियत मानली जाते. या व्यक्तींच्या आयुष्यात अनेक चढ-उताराचे प्रसंग येतात. पण, ती आव्हाने ते पेलून त्यावर मात करण्यास सक्षम ठरतात. तसेच काही वेळा काही गोष्टींमध्ये आशाही सोडून दिलेल्या असतात. मात्र, अचानक भाग्याची दारे उघडली जातात आणि या व्यक्तींना मोठा धनलाभ होतो, असे सांगितले जाते.
R अक्षराने नाव सुरू होणाऱ्या व्यक्ती
- ज्या व्यक्तींच्या नावाचे पहिले अक्षर R असते, अशा व्यक्ती अत्यंत बुद्धिमान मानल्या जातात. तसेच मेहनत करण्यात या व्यक्ती कसूर करत नाहीत. या व्यक्तींमध्ये भरपूर आत्मविश्वास असतो. या आत्मविश्वासाच्या बळावरच त्या यश आणि प्रगती साध्य करतात. तसेच धन-दौलतीचे मालकही होतात. अशा व्यक्तींना अचानक भाग्यासह नशिबाची साथ मिळते आणि ते यशस्वी ठरतात, असे मानले जाते.
S अक्षराने नाव सुरू होणाऱ्या व्यक्ती
- ज्या व्यक्तींच्या नावाचे पहिले अक्षर S असते, अशा व्यक्ती कोणत्याही आव्हानांचा नेटाने सामना करतात, असे मानले जाते. या व्यक्तींच्या जीवनात अनेक चढ-उताराचे प्रसंग येतात. पण, त्यावर मात करण्यास सक्षम ठरतात. मेहनतीच्या बळावर आयुष्यात मोठे नाव कमावतात. या व्यक्तींना अनेकदा उशिराने मेहनतीचे फळ मिळते. मात्र, एकदा यश मिळाले की, या व्यक्ती मागे वळून पाहत नाहीत. नवनवीन यशोशिखरे पादाक्रांत करून नाव, प्रसिद्धी पैसा कमावतात, असे सांगितले जाते.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, तुमच्या जन्मकुंडलीनुसार तुमच्यावरील प्रभाव, परिणाम यासंदर्भात ज्योतिषीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत उपयुक्त ठरू शकेल.