शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
3
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
4
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
5
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
6
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
7
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
8
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
9
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
10
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
11
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
12
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
13
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
14
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

Narad Jayanti 2024: आज नारद जयंतीनिमित्त देवर्षि नारदांच्या कार्याचा विस्तृत परिचय करून घेऊ!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 7:00 AM

Narad Jayanti 2024: देवर्षि नारद हे कळीचे नारद नसून समाजकल्याणासाठी कळकळीने बोलणारे देवर्षि होते; त्यांच्या कार्याचा आढावा घेऊया.

ब्रम्हदेवांचा मानसपुत्र, विष्णुंचा प्रियभक्त, त्रैलोक्यात संचार करणारे देवदानवांनंतरचे एकमेव मुनी. ऑल स्पेस परमीट. क्षणात इकडे तर क्षणात तिकडे. देव, दानव, मानव, पशू पक्षी सर्वांशी मैत्री. जगन्मित्र, अजातशत्रु.

व्यक्तिमत्त्व अगदी साधे, धोतर, उपरणे, एका हातात वीणा दुसर्‍या हातात चिपळया, मुखी भगवंताचे अखंड नामस्मरण. मानवासारखेच सर्व विकार व विचार असलेले मानवाचे मानवरूपी प्रतिनिधी. संकटकाळी देवाच्या आधी धावून जाणारे (जसे आपल्या खाजगी चानेलचे प्रतींनिधी शासनाच्याही आधी जाऊन पोहोचतात तसे) कोणतेही स्मरण कोणीही केलेले नसतांना धाऊन जाणारे संकटमोचक अशी त्यांची खरी ओळख आहे. 

डोक्यात भरपूर कल्पना असणारे, कल्पनाशक्तीचे विपुल भांडार. आधुनिक गुगल ऋषी. संगणक देवताच जणू! कधी हार न मानणारे व उदास न होणारे. प्रख्यात वकिलासारखा युक्तिवाद मांडून, प्रसंगी भांडून, कोणत्याही समस्येवर तोडगा काढून, शेवट गोड करणारे असे हे महर्षी नारद!

देवही संभ्रमीत होतील अशा कठीण प्रसंगी धीर न सोडता, आपल्या गोलमाल व गोडगोड बोलण्याने समोरच्यावर छान छाप पाडून, अगदी स्वतःला बुद्धिमान समजणार्‍या भल्या भल्या उन्मत्त राक्षसी वृत्तीच्या उच्चपदस्थांनाही सहज कह्यात घेणारे (उल्लू बनवणारे) नारद. अगा असा मुनी झालाची नाही.

त्यांच्यावर आरोप खूप झाले. कळीचा नारद, (खरे तर ह्यांना बघितलेच की अनेकांची कळी खुलायची, काहीतरी नवे घडणार, किंवा ऐकायला मिळणार!! म्हणून कळीचा नारद), आगलाव्या नारद, लावालाव्या करणारा, काड्या करणारा, भांडण लावून देऊन, दुरून मजा बघणारा. पण इतके आरोप होवूनही हे महाराज भक्तीत गुंग. त्यांनी कधीही हे सर्व आरोप मनावर घेतलेच नाही की रागाने फुगून बसले नाहीत.

बहुजनहित व नीतीची, धर्माची बाजू घेणे, न्यायाने तडजोड करणे, हेच त्यांचे ब्रीद होते. पृथ्वीतलावरच्या यच्चयावत समाज हितासाठी, विकासासाठी, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांसारीक, भौतिक, सांस्कृतिक क्षेत्रात दिवस रात्र संशोधन करून तन मन धनाने कार्यरत असणार्‍या प्रत्येक व्यक्तीची नोंद घेत, पालनकर्त्या विष्णूंना त्वरेने जाऊन ते जगातील नववे आश्चर्य म्हणून सांगून त्यांच्या कार्याचा उचित बहुमान घडविण्यासाठी त्यांना “जीवनगौरव” देऊन सत्कार करा सांगणारे आपले नारदच. त्यांच्यामुळेच कित्येक दुर्लक्षित संत, महंत, ऋषि, मुनि, शास्त्रज्ञ, विद्वान, कलावंत, भक्त, जपी, तपी, असे अज्ञाताच्या पडद्याआड असलेले गुणवंत धूलरत्न, जगासमोर आणले गेले. वाल्मिकी, ध्रुव, प्रह्लाद, अनसूया, गौतम ऋषि, भगीरथ, मार्कंडेय, संदीपक, असे अनेक जे प्रसिद्धी टाळत होते, त्यांना त्यांनी त्यांच्या कार्यासहित उजेडात आणले.

अगदी कोणाच्याही दालनात, कोणत्याही वेळेत त्यांना मुक्त प्रवेश होता. मग आता  सांगा, अशी व्यक्ति का नाही आवडणार आबालवृद्धांना? प्रत्येक कीर्तन, भजन, प्रवचनात यांची उपस्थिती गुप्त सुप्त रूपात किंवा कोणत्याही रूपात श्रवणभक्तिसाठी ते असतातच. कारण तेथे भगवंताचे अधिष्ठान असते.जिथे नारायण तिथे नारद!