शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

Narmada Yatra: चातुर्मास संपला की यात्रेकरूंना वेध लागतात नर्मदा परिक्रमेचे; जाणून घ्या त्या प्रवासाविषयी!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 9:09 AM

Narmada Yatra: नर्मदा परिक्रमा अनेक प्रकारे केली जाते. चालत, वाहनाने, चार-सहा महिने मुक्काम करून, यापैकी तुम्ही तुमच्या सोयीचा पर्याय निवडू शकता!

नर्मदा परिक्रमा म्हणजे नर्मदा नदीला प्रदक्षिणा घालणे. या परिक्रमेची सुरुवात परंपरेनुसार दरवर्षी चातुर्मास संपल्यावर म्हणजेच प्रबोधिनी एकादशी झाल्यावर होते. रामायण,महाभारत तसेच पौराणिक ग्रंथांमधे नर्मदा नदीचे वर्णन आले आहे.या नदीच्या किनारी असलेल्या तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्याने मानवाला पुण्य लाभते, अशी श्रद्धा हिंदू धर्मात प्रचलित आहे. ही नदी कुमारिका स्वरूपात आहे अशी धारणा आहे.

नर्मदा मैय्याच्या दर्शनासाठी यात्रेकरू 'नर्मदे हर' म्हणत परिक्रमेला सुरुवात करतात. काही परिक्रमावासी जे चातुर्मासात एखाद्या आश्रमात थांबलेले असतील ते पुढे मार्गस्थ होतील. मैय्याच्या दोन्ही तटावर असलेले शेकडो आश्रम, शुभ्रवस्त्रधारी हजारो परिक्रमावासी, साडेतीन हजार किमी वसलेल्या तिच्या तटावर असलेली संस्कृती, ज्ञात - अज्ञात जीव, आणि सकारात्मक शक्ती या सगळ्यात पुन्हा चैतन्य येते.

.परिक्रमेत 'नर्मदे हर' हे सगळ्या प्रश्नांचं एकच उत्तर असते. तिथे प्रत्येकजण मैय्या किंवा माताराम आहे, भेटणारा प्रत्येक श्वान सुद्धा भैरवबाबा आहे, हर कांकर शंकर आहे, मुक्काम आसन आहे, नाश्ता बालाभोग आणि जेवण भोजन प्रसादी आहे, त्यातही ताट वाढून पुढे मिळालं तर बनीबनायी म्हणतात, आणि स्वतःला बनवावं लागलं तर सदाव्रत..नर्मदा मैय्या अमरकंटकहून निघते, आणि वेगवेगळ्या पर्वतातून, डोंगरातून, जंगलातून अनेक उपनद्या सामावून पुढे जात असते. या प्रवासात तिच्यात वेगवेगळे खनिज गुणधर्म, औषधी वनस्पती मिसळले जातात. त्या पाण्याचं पृथक्करण केल्यावर आईच्या दुधासाखे गुणधर्म त्यात दिसून आले. म्हणून ती नर्मदामैय्या. मैय्या दूध पिलाती है म्हणतात ते यामुळेच, असे लेखक तेजस कुलकर्णी लिहितात. .लेखात जोडलेल्या फोटो संदर्भात ते माहिती देतात, 'पहिला फोटो मध्य प्रदेशात खरगोंन जिल्ह्यात भट्यान क्षेत्री असलेले सियाराम बाबा. वय अंदाजे १०९. ते आलेल्या सगळ्या परिक्रमावासीना चहा प्रसाद देतात. सकाळी एकदाच अंदाजे चहा, साखर टाकून बनवलेला चहा दिवसभर संपत नाही. दक्षिणेच्या स्वरूपात फक्त १० रुपये घेतात, आणि त्या १० रुपयांचा हिशोब संध्याकाळी नर्मदा मैय्याला आपलं नाव आणि गोत्र यांसह वाचून देतात. परिक्रमेत असतांना अनेक संत महंत भेटतात, त्यातलं हे एक मोठं नाव. दुसरा फोटो परिक्रमा मार्ग..परिक्रमा नेमकी काय, कशी करावी, अनुभव काय हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर ३ पुस्तकं सुचवतो. डॉ.सुरुची नाईक अग्नीहोत्री ( Dr-Suruchi Agnihotri Naik ) यांचं "नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती" या पुस्तकाचे तीन खंड, डॉ. अभिजित टोनगावकर यांचं "दोन बुद्धीवाद्यांची नर्मदा परिक्रमा" आणि जगन्नाथ कुंटे यांचं "नर्मदे हर". (पहिली दोघं पुस्तकं ईसाहित्य वर विनामूल्य पीडीएफ आहेत. )

.तुम्हालाही कमी खर्चात नर्मदा परिक्रमा करायची असेल तर १७ ते ३१ डिसेंबर या कालावधीत अंबरनाथच्या आदित्य टूर्स तर्फे नर्मदा यात्रा आयोजित केली आहे.  त्यात ओंकारेश्वर, बडवानी, प्रकाश, कठपोद, विमलेश्वर सागर संगम, मिठीतलाई, अंकलेश्वर, नागेश्वर, तिलकवाडा, गरुडेश्वर, कोटेश्वर, महेश्वर, मंडलेश्वर, बडवाह, उज्जैन, नेमावर, बुधानी, बरेली, बरमान घाट(उत्तर-दक्षिण), जबलपूर, शहापुरा,, जोगी टिकारिया, अमरकंटक, दिंडोरी, महाराजपूर, नरसिंगपूर, पिपरीया, होशंगाबाद, हरदा, ओंकारेश्वर संकल्प परिपूर्ण, परिक्रमा समारोप अशा धार्मिक स्थळांना भेट दिली जाणार आहे. त्यासाठी संपर्क : ९०९६७६१०४७/ ९३२४०३३७८९

नर्मदे हर!!

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्स