शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्यापासून आचारसंहिता लागणार? महायुती सरकारची आज शेवटची मंत्रिमंडळ बैठक!
2
पाकिस्तान जिंकू रे देवा, पण...; टीम इंडियाचं सेमीफायनलचं तिकीट 'शेजाऱ्यांच्या' हाती, पाहा गणित
3
मुंबई-हावडा मेल टायमर बॉम्बने उडवण्याची धमकी; जळगाव स्थानकावर २ तास तपासणी!
4
Baba Siddique : जेलमध्ये सुपारी, ४ आठवडे रेकी, ३ शूटर, ६ गोळ्या...; सिद्दिकी हत्या प्रकरणातील धक्कादायक खुलासे
5
Video - "गोठ्यात झोपल्याने कॅन्सर बरा होतो, ब्लड प्रेशरही कंट्रोल"; भाजपा नेत्याचा अजब दावा
6
“भाजपातून ८० टक्के लोक आमच्याकडे”; शरद पवारांच्या विधानावर महायुतीतील मंत्र्यांचा पलटवार
7
गुजरातमध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणात सापडले ड्रग्ज; ५००० कोटी रुपयांचे कोकेन जप्त
8
एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी; न्यूयॉर्कला जाणारे विमान दिल्लीत उतरविले
9
काय आहे PM Internship Scheme? Reliance सह 'या' बड्या कंपन्यांमध्ये 'इंटर्न' होता येणार!
10
रामलीला ऐन रंगात आलेली! तेवढ्यात 'राम व रावण' खरोखरच एकमेकांना भिडले, लाथाबुक्क्या घालू लागले
11
परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी राष्ट्रपतींचा मोठा निर्णय; जम्मू काश्मीरच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा मार्ग मोकळा केला
12
सावधान! Amazon कडून 'हॅक' झालेला मोबाईल आला, महिलेचा डेटा हॅकर्सकडे गेला; पुढे काय घडलं?
13
भीषण! गाझामधील शाळेवर इस्रायलचा एअर स्ट्राईक; लहान मुलांसह २० जणांचा मृत्यू, अनेक जखमी
14
Babar Azam ला डच्चू! पाक क्रिकेटरनं काढली Virat Kohli ची आकडेवारी, अन्...
15
Pashankush Ekadashi 2024: आजच्याच दिवशी झाली होती राम-भरताची भेट; चित्रकूट पर्वतावर आहेत पुरावे!
16
Balu Mama Jayanti: निस्सीम ईश्वरभक्त बाळू मामा यांची जयंती; त्यांना संचारी संत का म्हणत? जाणून घ्या!
17
Noel Tata News : अमेरिकेतून शिक्षण, सांभाळली वडिलांची गादी... कोणत्या श्रीमंत कुटुंबातील आहेत नोएल टाटांच्या सून?
18
भौम प्रदोष: ‘असे करा’ व्रत, महादेव होतील प्रसन्न; मंगळ दोषातून दिलासा, हनुमंत करतील कृपा
19
गुरुचरित्र आपल्याला नेमके काय शिकवते? ११ गोष्टी कालातीत, आजही येते प्रचिती; पाहा, गुरुपदेश
20
जयशंकर पोहोचण्यापूर्वी इस्लामाबादमध्ये लष्कर तैनात; पाकिस्तानात दंगे भडकले

Narsimha Jayanti 2023: शनी पीडेपासून सुटका मिळवण्यासाठी नृसिंह जयंतीला म्हणा 'हे' स्तोत्र म्हणा आणि विविध लाभ जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2023 12:59 PM

Narsimha Jayanti 2023: नृसिंह जयंती अर्थात भगवान विष्णूंनी नरसिंहाचा अवतार घेतला तो दिवस, त्यानिमित्ताने उपासनेत दिलेल्या स्तोत्राचा समावेश करा!

नृसिंह अवतार कथा आपल्या सर्वांनाच माहीत आहे, परंतु भगवान नृसिंहाचे मंदिर कुठे बघायला मिळत नाही. सोळा हात (षोडषबाहू) असलेली श्री नरसिंहस्वामींची मूर्ती ही फक्त मंत्रालय इथेच मात्र आहे. ही मूर्ती बघण्याची संधी व भाग्य फक्त वर्षातून एकदाच मिळते. ते म्हणजे नृसिंह जयंतीला! तिथे  जाण्याचा योग आला तर अवश्य जा, तोवर आपल्या उपासनेत आद्य शंकराचार्यांनी लिहिलेल्या स्तोत्राचा समावेश करा. जेणेकरून त्या वर्णनातून नृसिंह अवताराचे स्वरूप आपल्या डोळ्यासमोर उभे राहील आणि आपल्या संकटकाळी भगवंत अशाच प्रकारे धावून येईल हा विश्वास निर्माण होईल. 

आद्य शंकराचार्य रचित नृसिंह लक्ष्मी स्तोत्र: 

लक्ष्मी नृसिंह देवाची आराधना करणाऱ्यांना शनिदेव त्रास देत नाही असे वरदानआहे. नरसिंह देवाचा अवतार हा संध्याकाळी झाला असल्याने लक्ष्मीनृसिंह स्तोत्र तिन्हीसांजेस म्हटल्यास त्याचे विशेष फल मिळते. इथे करावलंब स्तोत्र देत आहे, ते खूप प्रभावी स्तोत्र आहे. रोज शनिवारी सायंकाळी म्हणून बघा, तुमचे कष्ट दूर होतील. या स्तोत्रामागे पूर्वपीठिका आहे. श्री लक्ष्मीनृसिंह करावलंब स्तोत्र, श्री शंकराच्या अनेक स्तोत्रांपैकी एक आहे. 

एकदा श्रीशंकर श्रीशैलम इथे राहत होते, कापालिक नावाचा एक संन्यासी शंकराकडे येऊन स्वत: करत असलेल्या पूजेसाठी एका संन्यासाचा बली द्यायचा आहे, असे शंकराला सांगतो. कारुण्यमूर्ती श्री शंकर त्याला लगेच संमती देतात. गूरुंचा परम शिष्य पद्मराज, नरसिंह देवाची प्रार्थना करुन, नरसिंह देवाला आपल्या शरीरात प्रवेश करण्याचे आवाहन करतो व क्रोधपूर्ण आवेशात त्या कापालिकाचा बली देतो. श्री पद्मराजाच्या अंगी झालेला नरसिंहाचा अविर्भाव शांत करण्यासाठी श्री शंकर त्याक्षणी  १७ चरणांचे हे स्तोत्र रचतात ते स्तोत्र म्हणजे श्री लक्ष्मीनृसिंह करावलंब स्तोत्र. नावाप्रमाणेच, त्या परमात्म्याचा कर अवलंबून ( हात धरुन) आपण हा भवसागर तरुन जाण्यासाठी आमचे रक्षण कर असे साकडे घालणारे हे स्तोत्र आहे. या श्लोकाच्या पठणाने भूलोकी असलेले सकल कष्ट, दु:ख, अनारोग्य, सर्व पापेही नष्ट होऊन मोक्ष प्राप्ती होण्याची करुणा होते. हे स्तोत्र प्रात:काळी तसेच संध्याकाळी पठण केल्यास उत्तम. पुढील स्तोत्राची रचना आदी शंकराचार्य यांनी केली आहे. 

श्री लक्ष्मीनृसिंह करावलंब स्तोत्र। श्री मत्पयोनिधिनेकेतन चक्रपाणी । भोगिंद्रभोगमणेराजित पूण्यमूर्ती ।

योगिश शाश्वत शरण्य भवाब्धिपोत लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। १ ।।ब्रम्हेंद्ररुद्रमरुदर्ककिरिटकोटि संघ-  टितांघ्रिकमलामलकांतिकांत। लक्ष्मीलसत्कूचसरोरुहराजहंस लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। २ ।।संसारदावदहनाकरभिकरोरुज्वा- लावळीभिरतीदग्धतनुरुहस्य ।त्वत्पादपद्मसरसिरुहमागतस्य लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। ३ ।।संसारजालपतिततस्य जगन्निवास सर्वेंद्रियार्थ बडिशाग्र झशोपमस्य ।प्रोत्कंपित प्रचुरतालुकमस्तकस्य लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। ४ ।।संसारकुपतिघोरमगाधमुलं संप्रास्य दु:खशतसर्पसमाकुलस्य ।दीनस्य देव कृपणापदमागतस्य । लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। ५ ।।संसारभिकरकरींद्रहराभिघात निष्पिड्यमानवपूष: सकलार्तिनाश । प्राणप्रयाणभवभीतीसमाकुलस्य लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। ६ ।।संसारसर्पविषदिग्धमहोग्रतीव्र दंष्ट्राग्रकोटिपरिदष्टविनष्टमूर्ते: । नागारिवाहन सुधाब्धिनिवास शौरे लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। ७ ।।संसारवृक्षबिजमनंतकर्मा- शाखा यातं करणपत्रमनंगपुष्पम ।आरुह्य दु:खफलित: चकित: दयालो लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। ८ ।।संसारसागरविशालकराळकाळ नक्रग्रहग्रसितनिग्रहविग्रहस्य । व्यग्रस्य रागनिचयोर्मिनिपिडितस्य लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। ९ ।।संसारसागरनिमज्जनमुह्यमानं दीनं विलोकय विभो करुणानिधे माम ।प्रल्हादखेदपरिहारपरावतार लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। १० ।।संसारघोरगहने चरतो मुरारे मारोग्रभीकरमृगप्रचुरार्दितस्य । आर्तस्य मत्सरनिदाघ्रसुदु:खितस्य लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। ११ ।।बध्पदागले यमभटा बहु तर्जनीयंत कर्षंती यत्र भवपाशशक्तैर्यातं माम  । ऐकाकीनं परवशं चकितं दयालो लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। १२ ।।लक्ष्मीपते कमलनाभ सुरेश विष्णो  यज्ञेश यज्ञ मधुसुदन विश्वरुप । ब्रम्हण्य केशव जनार्दन वासुदेव लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। १३ ।।एकेन चक्रमपरेण करेण शंख- मन्येन सिंधुतनयामवलंब्य तिष्ठन । वामेतरेण वरदाभयपद्म चिन्हं लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। १४ ।।अंधस्य मे हृतविवेकमहाधनस्य चोरैर्माहाबलिभिरिंद्रियनामधेय्यो: । मोहांधकारकुहरे विनिपातितस्य लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। १५ ।।प्रल्हादनारदपराशरपुंडरिकव्यासा-दिभागवतपुंगवहृन्मिवास ।भक्तानुरक्तपरिपालनपारिजात लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। १६ ।।लक्ष्मीनृसिंह चरणाब्जमधुव्रतेन स्तोत्रं कृतं शुभकरं भूवि शंकरेण ।  यो तत्पठंति मनुजा हरिभक्तियुक्ता-स्तेयांति तत्पदसरोजमखंडरुपम ।। १७ ।।