शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

National Youth Day 2023: राष्ट्रीय युवा दिनानिमित्त स्वामी विवेकानंद यांच्या शब्दात जाणून घ्या ध्येयपूर्तीचा प्रवास!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2023 5:48 PM

National Youth Day 2023: १२ जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद यांची जयंती, हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो, आपणही स्वामीजींच्या विचारमार्गावरून चालू. 

एकोणिसाव्या शतकातील जगविख्यात संन्यासी, स्वामी विवेकानंद यांच्या ज्वलंत विचारांचा पगडा आजच्या तरुणांवरही दिसून येता़े  विचार करायला लावतील, अशा प्रेरक विचारांची पेरणी करणारे स्वामी विवेकानंद यांची १२ जानेवारी रोजी जयंती आहे. 

स्वामी विवेकानंद हे स्वत: आपल्या ध्येयप्राप्तीसाठी सजग होते. आपल्या कृतीतून त्यांनी युवकांना बोध दिला, उठा, जागे व्हा. या पहिल्या दोन शब्दात ते काय सांगतात? तर आपण रोजच उठतो, परंतु ध्येयाप्रती जागे होत नाही. त्यामुळे उठूनही झोपल्यासारखे सुस्त असतो. आळशीपणा झटकून, अज्ञान, अंधश्रद्धा दूर सारून आपण ध्येयावर लक्ष्य केंद्रित केले पाहिजे. 

ध्येय कोणते? पहिले ध्येय म्हणजे आपल्या मुलभूत गरजा आणि सांसारिक जबाबदाऱ्या भागतील, यासाठी कष्ट करणे आणि दुसरे पण महत्त्वाचे ध्येय म्हणजे स्वत:ची ओळख करून घेणे. लोक पहिल्या ध्येयात एवढे गुंतून जातात, की दुसरे ध्येय गाठायचे त्यांच्या लक्षातच राहत नाही. ते तिथेच थांबून जातात आणि हीच आपल्या आयुष्याची इतिश्री समजतात. म्हणून वरील दोन शब्दांना तीसरी जोड देत स्वामीजी म्हणतात, उठा, जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका! 

आपल्या जिवनाचे उद्दीष्ट आपल्याला कळले पाहिजे. ते कळण्यासाठी स्वत:ची ओळख झाली पाहिजे. ज्याने स्वत:ला ओळखले, त्याने परमात्म्याला ओळखले. कारण, तो आपल्या आतच आहे. ही ओळख पटलेल्या व्यक्तीसाठी जगात भेदभाव उरतच नाही. म्हणून तर स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथील सर्वधर्म परिषदेत उपस्थित सर्वांना उद्देशून 'प्रिय बंधू आणि भगिनिंनो' असे उच्चारताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. कारण 'आपण सगळे एक आहोत' हीच प्रत्येक धर्माची मूळ शिकवण आहे. ती स्वामीजींनी एका वाक्यात दर्शवून दिली.

स्वामीजी शिकागोला जाणार, त्याआधी त्यांनी आपल्या गुरुपत्नी माता शारदा यांची भेट घेतली व आपण धर्मप्रचारासाठी जात आहोत असे सांगून आशीर्वाद घेतला. शारदा मातेने आशीर्वाद दिला आणि ओट्यावर ठेवलेली सुरी द्यायला सांगितली. स्वामीजींनी ती दिली. ती हाती घेतल्यावर त्या म्हणाल्या, `धर्माची शिकवण देण्यासाठी तू परिपूर्ण झाला आहेस, यशस्वी हो.' या एका कृतीतून शारदा मातेने केलेले भाकित ऐकून स्वामीजी विचारात पडले. त्याची उकल करताना शारदा माता म्हणाल्या, `सुरी देताना, तिची धारदार बाजू स्वत:कडे धरून आपल्या हाताला लागेल की नाही याचा विचार न करता, ती तू स्वत: कडे धरलीस आणि सूरीची मूठ माझ्याकडे सोपवलीस. याचाच अर्थ धर्माची धार आणि समाजाचे आघात पेलण्यासाठी तू सक्षम आहेस आणि लोकांच्या हाती धर्माची मूठ पकडवून देण्यासाठी तू परिपूर्ण झाला आहेस.

छोट्या छोट्या कृतीतून स्वामींच्या मोठ्या कार्याचा परिचय होतो. स्वामींनी केलेले धार्मिक कार्य, युवाशक्तीला मार्गदर्शन, भारतीय संस्कृतीचा परदेशात वाजवलेला डंका, यासगळ्याच गोष्टी अद्वितीय आहेत. याचे कारण, त्यांनी स्वत: मधील परमात्म्याला ओळखले होते. ते म्हणत, भगवंत त्यालाच मदत करतो, जो प्रयत्न करतो. प्रयत्नांती परमेश्वर! तुम्ही जर प्रयत्नच केले नाहीत आणि असेल माझा हरी म्हणत बसून राहिलात, तर ती तुमची भगवंतावरी श्रद्धा नाही, तर ती अंधश्रद्धा आणि आळस आहे. तुम्ही जर प्रयत्न केलेत आणि ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत, त्या परमेश्वरावर सोडल्यात, तर भगवंत तुमच्या प्रयत्नांना अवश्य यश देतो. कारण तुम्ही केवळ देवावरच नाही, तर स्वत:वर देखील विश्वास दाखवलेला असतो. हाच विश्वास तुम्हाला स्वत:ची ओळख करून देतो. ही ओळख पटेपर्यंत थांबू नका, झोपू नका, कार्यमग्न व्हा, हीच स्वामी विवेकानंद यांच्या विचारांची फलश्रुती, असे म्हणता येईल.

टॅग्स :National Youth Dayराष्ट्रीय युवा दिनSwami Vivekanandaस्वामी विवेकानंद