शहरं
Join us  
Trending Stories
1
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
2
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
3
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
4
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
5
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
6
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?
7
Bigg Boss Marathi 5 : सूरज चव्हाण ठरला 'बिग बॉस मराठी ५'चा विजेता? 'त्या' पोस्टने खळबळ
8
Bigg Boss Marathi Season 5: रितेश देशमुखला मिळाल्या भाईजानकडून शुभेच्छा, म्हणाला, "सगळ्यांना वेड लावलं..."
9
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकून टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
10
IND vs PAK मॅचमध्ये Arundhati Reddy चा तोरा; ज्यानं प्रसादच्या अविस्मरणीय सीनला उजाळा (VIDEO)
11
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
12
Bigg Boss Marathi Season 5: दोन आठवडे 'भाऊचा धक्का' का झाला नाही? रितेशने प्रेक्षकांची माफी मागत सांगितलं कारण
13
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा
14
Bigg Boss Marathi 5 : अंकिता वालावलकर टॉप ३ मध्ये नाही? फिनालेआधीच मोठी अपडेट समोर, चाहते भडकले
15
INDW vs PAKW : रिचा घोषनं घेतला सुपर कॅच; पाक कॅप्टनचा खेळ खल्लास! (VIDEO)
16
"उत्तर गाझा खाली करा", IDF ची वॉर्निंग! इस्रायलकडून लेबनॉनमध्ये मृत्यूचं तांडव, हिजबुल्लाहचा पलटवार
17
Bigg Boss18 च्या प्रीमियरला आले अनिरुद्धाचार्य महाराज, सलमानला भेट दिली भगवद् गीता
18
अमेरिकेतील यशानंतर 'अमूल' आता युरोपमध्ये ठेवणार पाऊल!
19
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर म्हणतो- "हा सन्मान..."
20
"सरदार पटेलांचा पुतळा पूर्ण झाला पण..."; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं

Navratri 2023: प्रत्येक क्षेत्रात ९ या अंकाला अधिक महत्त्व का? 'नऊ' रात्री निमित्त करूया विशेष उजळणी!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 6:39 AM

Navratri Mahotsav 2023: नवरात्री, नवरंग, नवरस, नवग्रह अशा अनेक संकल्पनांमध्ये नऊ या अंकाला एवढे महत्त्व का? जाणून घेऊ!

>> सिद्धार्थ अकोलकर

मानवी शरीराला दोन डोळे, दोन कान, दोन नाकपुड्या, एक तोंड आणि उत्सर्जनाचे दोन असे एकूण नऊ दरवाजे असतात असं योगसाधनेत सांगितलं जातं. भारतीय संस्कृतीमध्ये नवमी या तिथीवर, श्रीराम नवमी, महानवमी, खांडेनवमी, श्री राघवेंद्र स्वामी जयंतीची फाल्गुन शुक्ल नवमी, स्वामीनारायण जयंती, असे महत्त्वाचे उत्सव प्रसंग येतात. या उपरोक्त गोष्टींसोबतच नवरात्र, नवग्रह, नवरत्नं आणि नवरस या संपूर्ण भारतीय असलेल्या प्रथा-परंपरा-विश्वासांचा विशेष उल्लेख इथे केलाच पाहिजे.

शारदीय नवरात्र हा शरद ऋतूच्या प्रारंभी येणारा शाक्तपंथीय उत्सव आहे. शक्तिशाली राक्षसांचा किंवा सैतानी शक्तींचा मुकाबला करून समस्त जगाला भयमुक्त करण्यासाठी देवीने नऊ दिवसांच युद्ध केलेलं होतं. श्री दुर्गा देवीच्या त्या नऊ अवतारांचं पूजन करणारी नऊ दिवसांची नवरात्री परंपरा गेल्या हजारो वर्षांपासून अस्तित्वात आहे. चांगल्याने वाईटावर मिळवलेला विजय साजरा करणारा हा सण हिंदू धर्मामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दुर्गामातेचं पूजन करताना प्रत्येक दिवशी निरनिराळ्या फुलांच्या माळा तिला अर्पण केल्या जातात.

नवरात्रीतील साड्यांचे रंग ही एक नवी सामाजिक संकल्पना नवरात्र उत्सवाशी अलीकडील काही वर्षात जोडली गेलेली आहे. नवरात्रातील प्रत्येक दिवशी येणाऱ्या वारानुसार त्या दिवसाचा रंग ठरलेला असतो. देवीला त्या त्या दिवशी त्या विशिष्ट रंगाची साडी नेसवली जाते. आदिमाया स्त्रीशक्तीच्या या उत्सवात स्त्रियासुद्धा नवरात्रीच्या नऊ दिवसांसाठी रोज एक या प्रकारे ठरलेल्या रंगसंगतीच्या साड्या नेसतात. मजा म्हणजे, ही ‘अलीकडची प्रथा’ असं वाटत असलं तरी इतिहासात, अगदी थेट पेशवाईमध्ये, नवरात्रीत देवीला वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसवायची पद्धत होती, असे उल्लेख आढळून आलेले आहेत.

प्राचीन भारतातील ऋषी-मुनींनी मानवी आयुष्यावर प्रभाव टाकणारे नऊ ग्रह अवकाश मंडळात आहेत असं मानलेलं/ शोधलेलं होतं. सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, बृहस्पति किंवा गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतू हे ते नवग्रह होत. जुन्या भारतीय संस्कृतीमध्ये माणसाचं वागणं-बोलणं आणि त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना यांचा निसर्गाशी आणि नवग्रहांशी काहीतरी संबंध असतो, असं मानलेलं आहे. हिंदू धर्मानुसार या नवग्रहांकडे मानवाला त्याच्या कर्मानुसार फळ देण्याचा अधिकार असतो आणि हे फळ जाणून घेण्यासाठी ‘ज्योतिष’ नावाच्या शास्त्राचा जन्म झालेला आहे. हे शास्त्र उपयोगी की निरुपयोगी वा खरं की खोटं हा वेगळा विषय आहे.

या नऊ ग्रहांचा मानवी जीवनावर पडणारा प्रभाव अधिक बळकट किंवा क्वचित कधी कमी करण्यासाठीही काही रत्नं धारण करावी, असं ज्योतिषशास्त्र म्हणतं. या नऊ रत्नांनाच नवरत्नं म्हणतात. प्रत्येक ग्रहासाठी ज्योतिषशास्त्रात एक रत्न दिलेलं आहे. सूर्य - माणिक, चंद्र - नैसर्गिकरीत्या तयार झालेला मोती, मंगळ - पोवळं, बुध - पाचू, बृहस्पति - पुष्कराज, शुक्र - नैसर्गिक हिरा, शनी - निलम, राहू - गोमेद, आणि केतू - लसण्या. आसपासच्या बऱ्याच व्यक्ती, खासकरून व्यापारी लोक, नवग्रहांची अंगठी घालताना दिसतात. हल्लीच्या काळात शुद्ध नैसर्गिक रत्नं मिळणं अवघड झालेलं आहे.

विक्षिप्त प्रवृत्तीच्या मुघल सम्राट अकबराने अनेक कलांना आणि कलाकारांना राजाश्रय दिलेला होता. स्वभाव विचित्र असला तरी माणसांची पारख करण्याची क्षमता त्याच्या ठायी होती. त्याच्या दरबारातील प्रमुख, कर्तृत्वसंपन्न, अशा नऊ व्यक्तींना अकबराचा ‘नवरत्न दरबार’ म्हटलं जायचं. अब्दुल रहीम 'खान-इ-खान’, अबुल फझल, अबुल फैजी, तानसेन, राजा तोरडमल, राजा बिरबल, राजा मानसिंग, मुल्ला दो प्याजा आणि हकीम हुमाम, ही त्या नऊ मानवी रत्नांची नावं आहेत.

रस या शब्दाचा शब्दशः अर्थ, चव/ रूची किंवा फळांचा द्रवरूपी अंश असा असला तरी ‘कलेतील रस’ हा एक वेगळा प्रकार आहे. अंतःकरणाच्या वृत्तीचं काही कारणांनी उद्दीपन होतं आणि त्या उद्दीपित झालेल्या वृत्तीच्या अनुभवाने किंवा अवलोकनाने अनुरूप विचार प्रकट करण्याची प्रेरणा होते तिला रस म्हणतात. हे नऊ प्रकारचे रस पुढीलप्रमाणे आहेत - शृंगार, वीर, करुण, अद्भुत, हास्य, भयानक, बीभत्स, रौद्र आणि शांत. हे रस योग्य प्रमाणात वापरले गेले तर उत्कृष्ट साहित्य निर्मिती साधता येते, नवरसांच्या मिलाफाने नृत्य अनोखं होऊन जातं, गाण्यामधले भाव वेगळीच उंची गाठू शकतात, अभिनय अत्युच्च स्वरूपाचा आणि खराखुरा वाटून जातो.

श्री शंभू महादेवांना आदिनाथ मानून स्थापन झालेला नाथ संप्रदाय हा भारतातील हजार ते बाराशे वर्षं जुना पंथ आहे. या पंथाच्या उच्चतम गुरुस्थानी नऊ नाथ, म्हणजे नवनाथ आहेत. महाराष्ट्रातील एका प्रसिद्ध सांप्रदायिक श्लोकानुसार गोरक्ष, जालंधर, चरपट, अडबंग, कानिफ, मच्छिंद्र, चौरंगी, रेवण, भर्तृहरी अशी या नवनाथांची नावं आहेत. ‘नवनाथ भक्तिसार’ या सांप्रदायिक मराठी ग्रंथात, नवनाथ हे नव-नारायणांचे अवतार मानलेले आहेत. या ग्रंथाप्रमाणे मत्स्येंद्रनाथांना कविनारायण, गोरक्षनाथांना हरिनारायण, जालंधरनाथांना अंतरिक्षनारायण, कानिफनाथांना प्रबुद्धनारायण, चर्पटीनाथांना पिप्पलायन, नागनाथांना अविर्होत्र, भर्तृहरींना द्रुमिलनारायण, रेवणनाथांना चमसनारायण व गहिनीनाथांना करभाजन नारायणाचा अवतार मानले गेलेले आहे.

संख्याशास्त्राप्रमाणे ९ हा मंगळाच्या अधिपत्याखाली येणारा, म्हणजेच मंगळाचे गुणधर्म दर्शवणारा आकडा आहे. जिद्द, अफाट उर्जा, शक्ती, उग्रपणा, वर्चस्व हे सर्व या नऊचे गुण आहेत. राजकारणात असलेल्यांच्या अंगी हे गुण हमखास दिसतात. त्यामुळेच कदाचित त्यांना ९ हा आकडा प्रिय असावा. सन २०१९च्या लोकसभा मतदानाच्या तृतीय टप्प्यात अनेक नेत्यांनी सकाळी ठीक नऊ वाजता मतदान केलेलं होतं. महाराष्ट्रातले बरेच राजकारणी, गाडीची नंबरप्लेटही नऊ आकड्याची/ शेवट नऊने होणारी किंवा तशी बेरीज असणारी घेतात. मात्र या गुणांबरोबरच संख्याशास्त्रात ९ आकड्याचे काही दुर्गुणही सांगितलेले आहेत. हा आकडा अपघातप्रवण आहे असं संख्याशास्त्र म्हणतं. राजकारणातील फंदफितुरी, घातपात, अपघात, दगाफटका हा या ९ आकड्यामध्ये असलेल्या दुर्गणांचा प्रभावही असू शकतो. अभिनेता सलमान खानच्या गाडीच्या क्रमांकांची बेरीजही ९ आहे. आता हे चांगलं म्हणावं की वाईट, हे आपल्यालाच ठरवायचं आहे!

टॅग्स :Navratri Mahotsav 2023शारदीय नवरात्रोत्सव 2023