>>दिप्ती जोशी, (मास्टर टॅरो अंकशास्त्र रेकी क्रिस्टल कुंडली मार्गदर्शक)
सप्तशतीतले अनेक मंत्र प्रासादिक आहेत. ती मंत्रसिद्धी मिळावी यासाठी नियमही पाळायला हवेत. जर तुम्ही रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी, इतरांशी वादविवाद थांबवण्यासाठी, नात्यात माधुर्य आणण्यासाठी हे मंत्रोच्चार करणार असाल तर जाणून घ्या नियम.
- सप्तशती पाठ सुरू करण्याआधी गुरुदेव, कुलदेवी, कुलदैवत नी गणपती बाप्पा ह्यांचे मंत्र जप म्हणून त्यांचे आशीर्वाद घेऊन, त्यांना सांगा, 'मी सप्तशती पाठ करत आहे, ते पूर्णत्वास न्यावे.'
- माता भगवतीची आराधना करावी नी महादेव मंत्राची एक माळ जप करावा.
- सुरुवातीला पोथी मध्ये सगळ लिहिलेलं आहे त्यामुळे न्यास , कवच स्तोत्रं विधिवत म्हणावीत.
- नवार्ण मंत्र जपाची तीन माळ पाठ सुरू करण्याआधी नी पाठ संपल्यावर म्हणावे.
- तेच महादेव ह्यांच्या मंत्राच आहे.
- सगळं म्हणून झाल्यावर क्षमा याचना श्लोक म्हणावा.
- ते पूर्ण झाल्यावर, उठण्याआधी आसनावरून चारही दिशांना पाणी शिंपडावे, नी आसनाच्या खाली एक पळी पाणी सोडावे. त्यांनतर डोळ्यांना पाणी लावावे. माथ्यावर कपाळावर पाणी लावावे नी इंद्र देवतांची प्रार्थना करावी. 'हे इंद्र देवता मी जे काही मंत्र जप, पूजा पाठ केला आहे त्यातून जी ऊर्जा मला मिळाली आहे नी पुण्य साठले आहे ते माझे मला मिळू दे.'
- तीन वेळा माथ्यावर हात ठेवून 'शक शकाय नमः' म्हणावे.
- आपले आसन, जप माळ ही नेहमी वेगळी असावी. एकमेकांचे वापरू नये.
- पाठ म्हणताना किंवा जप करताना पुरुषांनी रुमाल /टोपी घालावी.
- स्त्रियांनी साडीचा पदर किंवा ओढणी डोक्यावरून घ्यावी.
- आरती करावी, प्रसाद देवीचा सगळ्यांना द्यावा.
- मांसाहार मद्यपान कांदा लसूण खाऊ नये. शक्य असल्यास फल आहारावर रहावे. अथवा एक वेळ जेवावे.
- जमल्यास रोज एका चांदीच्या तांब्यात किंवा काचेच्या गलासात पाणी भरून ठेवावे. सगळं पूर्ण झाल्यावर ते पाणी प्यावे. वॉटर चार्जचा अनुभव ह्या सकारात्मक शक्तींनी येईल.
- आताशी सुरुवात केली असेल म्हणजे पहिल्यांदाच तर घाबरून जाऊ नका. सप्त शती, नवनाथ पारायण, किंवा कोणत्याही मंत्र जप अनुष्ठान करून सुरुवात केल्यावर प्रत्येक जातकाला हा अनुभव येतोच, पण कोणत्याही स्थितीत संकल्प तुटू देऊ नका. निगेटिव्ह शक्ती बाधा आणतात. पूर्ण पाठ करा. कितीही कलह झाला तरी खंड पडून देऊ नका.
- जस जसे तुमचे पारायण महिन्यातून एकदा दोनदा व्हायला लागेल, नेहमी होत राहील, तस तसा तुम्हाला फरक जाणवेल. ९-११ पारायण झालं की ही नकारात्मकता कमी होऊन वास्तूत चैतन्य निर्माण होईल.
- फक्तं पारायण पूर्ण झालं की कुमारी भोजन, त्यांना यथा शक्ती वाण,ब्राह्मण भोजन ई होऊ दे, म्हणजे संकल्प लवकर पूर्ण होतो. कुमारिका पूजनाने देवी प्रसन्न होते. यथासांग सगळ केलं की.नी मनातील ईच्छा फलित होतात.
- सगळ्यात महत्वाचं, कोणतीही साधना जप तप ह्यावेळी आपल्या धर्म शास्त्रात मौनाला खूप महत्व दिले आहे त्यामुळे जितकं मौन व्रत पाळता येईल तेवढे पाळावे. भगवती किंवा कुलदेवी मंत्र जप त्या काळात सतत सुरू ठेवावा. मौन व्रत ह्यासाठी सांगितले आहे जेणेकरून निर्माण झालेली ऊर्जा बोलण्याने क्षय होऊ नये.
उपयुक्त मंत्र पुढीलप्रमाणे :
- संकट नाशासाठी-
शरणागतदीनार्तपरित्राणपरायणेसर्वस्यार्तिहरे देवी नारायणी नमोऽस्तुते।
भयनाशासाठी-सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्तीसमन्विते,भयेभ्यस्त्राहि नो देवी दुर्गे देवी नमोऽस्तुते।
रोगनाशासाठी-रोगानशेषानपहंसि तुष्टा, रुष्टा तु काान् सकलानभीष्ठान् त्वामाश्रितानां न विपन्नराणां, त्वामाश्रिता ह्याश्रयतां प्रयान्ति।
आरोग्य व सौभाग्य प्राप्तीसाठी-देहि सौभाग्यमारोग्यं देहि मे परमं सुखम्रूपम् देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि।
उत्तम पत्नीच्या प्राप्तीसाठी-पत्नी मनोरमां देहि मनोवृत्तानुसारिणीम्तारिणीं दुर्गसंसारसागरस्य कुलोद्भवाम्
उत्तम पतीच्या प्राप्तीसाठी-पतिं मनोरमं देहि मनोवृत्तानुसारिणम्तारिणं दुर्गसंसारसागरस्य कुलोद्भवाम्
बाधा शांतीसाठी-सर्वबादाप्रशमनं त्रैलोक्यस्याखिलेश्वरि,एकमेव त्वया कार्यमस्मद्वैरिविनाशनम्
दारिद्रय व दु:ख नाशासाठी-दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तो, स्वस्थै: स्मृता मतिमतीव शुभां ददासि,दारिद्रयदु:खभयहारिणी का त्वदन्या, सर्वेपकारकरणाय सदाऽऽद्र्रचित्ता।
सर्व प्रकारच्या कल्याणासाठी-सर्वमंगलमांगल्ये शिवेसर्वार्थसाधिके,शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोऽऽस्तुते।
बाधा मुक्ती व धनपुत्रादिसाठी-सर्वाबाधाविनिर्मुक्तो धनधान्य सुतान्वित:मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यति न संशय:।