शहरं
Join us  
Trending Stories
1
CM म्हणून शिंदेंना मोठी पसंती, उद्धव ठाकरेंना किती मते; फडणवीस-राज ठाकरेंना किती टक्के कौल?
2
“नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होणार असे कुठेही म्हटले नाही”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
3
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
4
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
5
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
6
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
7
"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?
8
मनोज जरांगेंची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; ४८ टक्के मराठा समाजाने महायुतीला दिली पसंती
9
Exit Poll: २०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर...
10
“गुलाल आम्ही उधळणार, महायुतीची सत्ता ५ वर्ष टिकणार, एकनाथ शिंदेच CM होणार”: संतोष बांगर
11
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन
12
“अमित शाह यांनी CM भाजपाचा असेल असे कधी म्हटले नाही”; महायुतीतील नेत्याचे सूचक विधान
13
‘लाडकी बहीण’ योजनेचा फायदा महायुतीला मिळेल का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महिलांनी मतदान...”
14
“अदानींविरोधात अमेरिकेत काढलेले अटक वॉरंट म्हणजे देशासाठी शरमेची गोष्ट”: संजय राऊत
15
“लाच देऊन कंत्राटे मिळवल्याचे स्पष्ट, भ्रष्ट गौतम अदानींना अटक का करत नाही?”: नाना पटोले
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना अटक होणार? इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टानं जारी केलं 'अरेस्ट वॉरंट'
17
"सरकार तर स्थापन होऊ द्या"; मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरुन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने नाना पटोलेंना झापलं
18
IND vs AUS: ना विराट, ना रोहित, ना बुमराह; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 'हा' खेळाडू ठरेल 'हिरो'- पुजारा
19
गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार
20
IND vs AUS: "विराट म्हणजे क्रिकेटचा सुपरस्टार"; ऑस्ट्रेलियन खेळाडूची पत्नी 'किंग कोहली'वर फिदा

Navratri 2024: प्रतापगडावर दोन घट बसविण्याची परंपरा असलेले राज्यातील एकमेव मंदिर!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2024 1:11 PM

Navratri 2024: प्रतापगडावर साडेतीनशे वर्षांपासून दोन घट बसवण्याची परंपरा सुरू आहे; शिवाजी महाराजांचे सुपुत्र राजाराम यांनी ही परंपरा का सुरु केली ते वाचा. 

>> सचिन काकडे, लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : महाबळेश्वर तालुक्यातील किल्ले प्रतापगड अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. या किल्ल्यावर असलेले भवानी मातेचे मंदिर, देवीची मूर्ती अन् मंदिरात बसविले जाणारे दोन घट या मागेही रंजक इतिहास लपला आहे. नवरात्रोत्सवात आदिशक्तीचा जागर होत असताना हा इतिहासही उजेडात येणे महत्त्वाचे आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानाचा वध केल्यानंतर प्रतापगडावर भवानी मातेच्या मूर्तीची स्थापना करण्याचे ठरविले. त्यानुसार मंबाजी नाईक पानसरे हे हिमालयातील राजे लीलासेन यांच्या राज्यात गेले. त्यांच्या सहकार्याने त्यांनी हिमालयातील त्रिशूलगंडकी, श्वेतगंडकी व सरस्वती या नद्यांच्या संगमातून शाळीग्रामची उत्तम शिळा मिळवली. त्याच प्रांतातील कुशल शिल्पकारांकडून त्यांनी भवानी मातेची मूर्ती घडवून घेतली. भवानीमातेची ही मूर्ती अष्टभुजा महिषासूरमर्दिनी रूपातील आहे. ही मूर्ती प्रथम राजगडावर व तेथून प्रतापगडावर आणण्यात आली. १६६१ साली या मूर्तीची प्रतापगडावर प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.

मूर्ती प्रतिष्ठापनेनंतर किल्ल्यावर नवरात्रोत्सवात घटस्थापनेची परंपरा सुरू झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र राजाराम महाराज यांनी ‘हे हिंदवी स्वराज्य असेच अबाधित राहू दे’ असा नवस भवानी मातेला केला होता. त्यामुळे भवानी मातेच्या मंदिरात ३६२ वर्षांपासून दोन घट बसविले जात आहेत. एक घट देवीच्या नावाने तर दुसरा राजाराम महाराज यांनी केलेल्या नवसामुळे. मंदिरात दोन घट बसविणारे हे महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर आहे.

धार्मिक कार्यक्रमांची परंपरा कायम

प्रतापगडावरील भवानी माता ही साताऱ्याच्या राजघराण्याचे कुलदैवत आहे. नवरात्रोत्सवास मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतात. चौथ्या माळेला मशाल महोत्सव तर पाचव्या माळेला शिवमूर्तीची मिरवणूक काढली जाते. अष्टमीला घागरी फुंकण्याचा कार्यक्रम होतो तर नवमीला पालखी मिरवणुकीच्या उत्सवाची सांगता होते.

याबाबत प्रतापगडाचे किल्लेदार  अभय हवलदार सांगतात, 'प्रतापगडावरील घटस्थापनेला परंपरेची किनार असून, मंदिरात दरवर्षी दाेन घट बसविले जातात. साडेतीनशे वर्षांपासून या परंपरेचं जतन करणारं महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर आहे.'

टॅग्स :Navratri Mahotsav 2024शारदीय नवरात्रोत्सव २०२४Navratriनवरात्रीPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२४Pratapgad Fortप्रतापगड किल्लाSatara areaसातारा परिसरShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज