शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
3
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
4
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
5
प्रयागराजमधील महाकुंभदरम्यान मांस आणि मद्यविक्रीवर बंदी, मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय
6
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
7
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
8
Bigg Boss Marathi Season 5: टॉप ३ च्या शर्यतीतून 'हा' सदस्य बाहेर, कुटुंबाच्या उपस्थितीत झालं एलिमिनेशन
9
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
10
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
11
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
12
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
13
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
14
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
15
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
16
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?
17
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकून टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
18
IND vs PAK मॅचमध्ये Arundhati Reddy चा तोरा; ज्यानं प्रसादच्या अविस्मरणीय सीनला उजाळा (VIDEO)
19
Bigg Boss Marathi Season 5: दोन आठवडे 'भाऊचा धक्का' का झाला नाही? रितेशने प्रेक्षकांची माफी मागत सांगितलं कारण
20
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा

Navratri Mahotsav 2023: देवीला 'अशी' आर्त साद घालाल, तर नवरात्र फलद्रूप झालीच म्हणून समजा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 12:00 PM

Navratri 2023: १५ ऑक्टोबरपासून देवीची नवरात्र सुरू होतेय, तेव्हा शक्तीचा जागर करताना, उपासना करताना दिलेली साद घालायला विसरू नका!

>> ज्योत्स्ना गाडगीळ 

'दुर्गे दुर्गट भारी तुजवीण संसारी' ही आरती आपण आजवर कितीतरी वेळा म्हटली असेन. संगीतकार अजय-अतुल यांनी आरतीचे गाणे केले आणि त्याची मोहिनी अधिकच वाढली. उद्यापासून शारदीय नवरात्र सुरू होईल. घरोघरी देवीचे पूजन, स्तवन, कीर्तन होईल,त्यावेळेसही ही आरती म्हटली जाईल. देवीच्या अद्वितीय पराक्रमाचा आरतीरूपाने जयघोष होईल. ही पूजा केवळ आदिमायेची नाही, तर अखिल विश्वाला नवजीवन देणाऱ्या स्त्रित्वाची आहे. तिलाच समर्पित ही आरती...

दुर्गे दुर्घट भारी, तुजविण संसारी, अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी,वारी वारी जन्ममरणाते वारी,हारी पडलो आता संकट निवारी।।

महिषासुर, शुंभ-निशुंभ, मधु-कैटभ अशा असंख्य दैत्यांचे पारिपत्य करणारी देवी जगदंबा, तुझा जयजयकार असो. तू दानवांचा नाश करून देवाला, मानवाला, अखिल विश्वाला तारून नेलेस, तशीच करूणा आमच्यावरही कर. जन्म-मरणाच्या फेऱ्यातून आम्हाला सोडव. आमच्या आयुष्याचे ध्येय गाठण्याची आम्हाला शक्ती दे आणि आमच्या मार्गात येणाऱ्या संकटांचे निवारण कर.

त्रिभुवन भुवनी पाहता, तूज ऐसी नाही, चारी श्रमले परंतु, न बोलवे काही,साही विवाद करिता पडिले प्रवाही,ते तू भक्तालागी पावसी लवलाही।।

हे त्रिपुरसुंदरी, तुझ्या अलौकीक तेजावर भाळून खुद्द असूराला  तुझ्याशी विवाह करण्याचा मोह आवरता आला नाही. मात्र, तू केवळ स्तुतीवर भाळणारी नाहीस, तू शौर्याला, पराक्रमाला मानणारी आहेस. तू दैत्यांना युद्धात पराजित करण्याचे आव्हान दिलेस. त्यांनी तुझ्या स्त्रीत्वाला कमी लेखण्याची चूक केली आणि आपलाच सर्वनाश ओढावून घेतलास. तुझ्या कर्तबगारीची वर्णने आम्ही सप्तशतीत वाचली आहेत. ती वर्णन वाचताना आमची परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी वाणी थकली. आमच्या ठायी असलेले षडरिपूदेखील तुझ्यासमोर नतमस्तक झालेत, आता फक्त तू आम्हाला आपलेसे करून घे आणि तुझा वरदहस्त आमच्या शीरावर ठेव.

प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा,क्लेशापासून सोडी, तोडी भवपाशा,अंबे तुजवाचून कोण पुरविल आशा,नरहर तल्लीन जाहला पदपंकजलेशा।।

कोणतही मोठे संकट असो, परंतु त्यातून निघण्याचा मार्ग आईकडे असतोच. तू तर, समस्त विश्वाची जननी आहेस. तुझ्या नुसत्या सुदर्शनाने भक्तांना केवढातरी दिलासा मिळतो. तु सोबत आहेस, ही खात्री असली, की संकट, दु:खं, क्लेश यांना आयुष्यात थारा राहतच नाही. मन शांत झाले की भवपाशातून सोडवणूक करणेही सोपे जाते. आणि तरीसुद्धा आम्ही जर या मायाजाळात अडकून राहिलो, तर त्यातून सोडवायला तू जवळ आहेसच. `अंबे तुजवाचून कोण पुरविल आशा?' अतिशय तळमळीने, व्याकुळतेने, कृपाभिलाषी होऊन आम्ही तुझ्याकडे पाहत आहोत. ज्याप्रमाणे, लहान मुलाला क्षणभरही आपली आई नजरेआड झालेली चालत नाही, तशीच भक्तांनाही तू नजरेआड गेलेली चालत नाही. एवढी तल्लीनता तुझ्या ठायी आलेली आहे.

तुझी प्रत्यक्ष भेट कधी होईल माहित नाही, तोवर मी माझ्या सभोवताली असलेल्या स्त्रिरूपातील तुझ्या अंशाचा नितांत आदर करेन. दुसऱ्यांना आदर करायला शिकवेन. माझी आई, बहीण ,बायको, मैत्रीण आनंदी असेल, सुरक्षित असेल, तर माझ्या हातून तुझीच पूजा झाली असे समजेन आणि केवळ नवरात्रीतच नव्हे, तर आमरण तुझ्या कार्याचा जागर करत राहीन.

टॅग्स :Navratri Mahotsav 2023शारदीय नवरात्रोत्सव 2023Puja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३Navratriनवरात्री