शहरं
Join us  
Trending Stories
1
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
2
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
3
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा
4
INDW vs PAKW : रिचा घोषनं घेतला सुपर कॅच; पाक कॅप्टनचा खेळ खल्लास! (VIDEO)
5
"उत्तर गाझा खाली करा", IDF ची वॉर्निंग! इस्रायलकडून लेबनॉनमध्ये मृत्यूचं तांडव, हिजबुल्लाहचा पलटवार
6
Bigg Boss18 च्या प्रीमियरला आले अनिरुद्धाचार्य महाराज, सलमानला भेट दिली भगवद् गीता
7
अमेरिकेतील यशानंतर 'अमूल' आता युरोपमध्ये ठेवणार पाऊल!
8
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर म्हणतो- "हा सन्मान..."
9
"सरदार पटेलांचा पुतळा पूर्ण झाला पण..."; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं
10
'इस्रायलने इराणवर हल्ले करावे, पण...', जो बायडेन यांचा बेंजामन नेतन्याहूंना सल्ला
11
धोनी, विराट की रोहित... भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण? 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेलने दिलं उत्तर
12
तिरुपती मंदिराबाबत नवा वाद, प्रसादात सापडले किडे; मंदीर प्रशासनाने दिले स्पष्टीकरण
13
"छत्रपतींच्या स्मारकालाच अडचणी का येतात?", रोहित पवार काय म्हणाले?
14
Gold Investment: दागिने घेण्याऐवजी सोन्यामध्ये 'या' 5 प्रकारे करा गुंतवणूक; मिळेल भरपूर रिटर्न
15
INDW vs PAKW : रेणुकाचा कमालीचा इन-स्विंग चेंडू; पाक बॅटर फक्त बघतच राहिली अन्..
16
संजय राऊतांना पवित्र करण्यासाठी अयोध्याला पाठवू; अब्दुल सत्तारांची बोचरी टीका
17
पाक विरुद्ध हरमनप्रीत कौरनं खेळली 'ही' चाल; या खेळाडूची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री
18
"स्मारकाच्या कामात स्थगिती आणणाऱ्या काँग्रेसच्या वकिलांचाही..."; संभाजीराजे छत्रपतींना फडणवीसांचा सल्ला
19
तिलक वर्मा की नितीश रेड्डी? मयंक यादव की रवी बिश्नोई? आकाश चोप्राने निवडली टीम इंडियाची Playing XI
20
तरुणाच्या आत्महत्येला मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री जबाबदार; मनोज जरांगेंनी काय दिला इशारा?

Navratri Mahotsav 2023: पाचवी माळ: ध्यान एकाग्रता वाढवण्यासाठी स्कंदमातेची करा उपासना!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 7:00 AM

Navratri Mahotsav 2023: नवरात्रीचा पाचवा दिवस स्कंदमातेला समर्पित आहे, मातृरूपात असलेल्या देवीची उपासना कशी करायची ते जाणून घेऊ. 

देवीचे नवरात्रीतील पाचवे रूप स्कंदमाता या नावे ओळखले जाते. भगवान स्कंद, ज्यांना आपण कार्तिकेय स्वामी या नावे ओळखतो. ते देवासूरांच्या युद्धात देवतांचे सेनापती असत. त्यांच्या ठायी असलेल्या दिव्य शक्तीमुळे त्यांना शक्तीधर असेही म्हटले जाते. त्यांनी मयुरावर स्वार होत अनेक युद्धांमध्ये विजयश्री मिळवली. त्यांची माता, म्हणून देवी दुर्गेला  स्कंदमाता म्हणून ओळखले जाऊ लागले. पुत्रामुळे आईला ओळख मिळणे, हे कोणत्याही मातेसाठी भूषावह असते. स्कंदमातेला देखील आपल्या पुत्राच्या यशाचे कौतुक आहे, म्हणून ती गौरवाने स्वत:ला  स्कंदमाता म्हणून मिरवते.

नवरात्रीच्या पाचव्या दिवशी वात्सल्यरूपी स्कंदमातेचे पूजन केले जाते. या रूपात देवीच्या मांडीवर भगवान कार्तिकेय बाल्यरूपात विराजमान झालेले दिसतात. एका हाताने पुत्राला सांभाळत देवीने दुसरा हात आशीर्वादासाठी मोकळा ठेवला आहे आणि अन्य दोन हातात कमळ आहे. तिने शुभ्र वस्त्र परिधान केले आहे. देवी कमलासनात पद्मासन घालून बसलेली आहे. म्हणून तिला पद्मासना असेही म्हणतात. तसेच, देवीचे वाह सिंह असल्यामुळे, ती सिंहावर आरूढ झालेलीदेखील दिसून येते.

नवरात्रीचा पाचवा दिवस, अर्थात ललितापंचमीचा. अतिशय महत्त्वाचा. देवीची लालित्यपूर्ण वर्णने वाचून साधकाला बाह्य जगताचा विसर पडून तो आंतरिक जगतात रममाण होतो. तल्लीन होतो. लौकिक, सांसारिक, मायिक बंधनातून मुक्त होऊन त्याचे मन विशुद्ध होते. पद्मासनात ध्यानधारणा करून स्कंदमातेचे स्मरण करणाऱ्या साधकाला ध्यान-एकाग्र वृत्ती वाढवत पारमार्थिक मार्गावर वाटचाल करण्याची प्रेरणा मिळते.

असे म्हणतात, की स्कंदमातेची मनोभावे पूजा करणाऱ्या भक्ताची सर्व मनोकामना पूर्ण होते. एवढेच नाही, तर भवसागर तरून पैलतीर गाठण्याचे, अर्थात मोक्षाचे दार खुले होते. स्कंद मातेच्या उपासनेत आपोआप स्कंद भगवानची देखील उपासना होते.

देवी तेज:पुंज आहे. ती सूर्यमंडलाची अधिष्ठात्री आहे. तिला प्राप्त करून घेणाऱ्या भक्ताला देवीप्राणे तेज, बल, शौर्य, धैर्य, वात्सल्य, प्रेम प्राप्त होते. देवीचे प्रतिकात्म रूप म्हणून आजच्या दिवशी कुमारिका पूजन केले जाते. कुमारिकेला आवडत्या वस्तू देऊन, फुल, हळदकुंकू दिले जाते. तिची पाद्यपुजा करून गोडधोड खाऊ खातले जाते. तिच्या रूपाने येऊन देवी जेऊन गेली, हा भोळा भाव या मानसपूजेमागे असतो. आपली सेवा देवीच्या चरणी रुजू व्हावी अणि तिने आपल्या करुणामयी नजरेने आपल्यावर कृपादृष्टी टाकावी, हीच स्कंदमातेच्या चरणी प्रार्थना.

स्कंदमाता कीsss जय!

टॅग्स :Navratri Mahotsav 2023शारदीय नवरात्रोत्सव 2023Navratriनवरात्रीPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३