शहरं
Join us  
Trending Stories
1
माहिममध्ये शिंदे गट अमित ठाकरेंना पाठिंबा देणार? मुख्यमंत्री शिंदे-सरवणकरांमध्ये चर्चा, केसरकर म्हणाले....
2
"रशिया-युक्रेन युद्ध मोदी थांबवू शकतात"; युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी व्यक्त केला विश्वास
3
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
4
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२४: नशीबाची साथ मिळेल, मित्रांशी भेटी होतील, प्रवास घडेल.
5
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
6
दिवाळीपूर्वी Infosys च्या शेअरधारकांसाठी खूशखबर; शेअरवर मिळणार 'इतका' डिविडेंड, आज अखेरची संधी
7
दिवाळी सप्ताह: ४ राशींना सर्वोत्तम वरदान, लाभच लाभ; पद-पैसा वाढ, लक्ष्मी-कुबेर शुभच करतील!
8
Stock Market Opening: दिवाळीच्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २४,२५० वर; सेन्सेक्सही वधारला
9
"तो माझ्या जवळ येऊन...", भाग्यश्रीने 'मैंने प्यार किया'दरम्यानचा सलमान खानचा सांगितला 'तो' किस्सा
10
Mutual Fund Investment : SIP की एकरकमी... कशात मिळेल जास्त रिटर्न? म्युच्युअल फंडात गुंतवणूकीची योग्य पद्धत कोणती?
11
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
12
'नागिन' फेम अभिनेत्री ३६व्या वर्षी अडकली विवाहबंधनात, उत्तराखंडमध्ये बांधली लग्नगाठ
13
मुंडेंच्या विरोधात मराठा उमेदवार, शरद पवारांनी भाकरी फिरवली; मराठा-ओबीसी लढत रंगणार
14
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
15
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
16
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
17
अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते 
18
विमानात बॉम्ब ठेवला असल्याच्या खोट्या धमक्या कुठून येतात?
19
३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
20
मन ही मन लड्डू फुटे, हाथों मे फुलझडियां!

New year 2023: नवीन वर्षाचे नवनवीन संकल्प पूर्ण होत नाहीत? मग संकल्पसिद्धी मिळवायची कशी? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 2:06 PM

New Year 2023: येत्या वर्षात संकल्प केवळ स्वतःपुरते न करता संकल्पाची चौकट थोडी मोठी करूया. 

>> अस्मिता दीक्षित 

नवीन वर्षाचे नवीन संकल्प केले जातात, पण चार दिवसात संकल्पात खंड पडतो. यासाठीच ठरवायचे काहीच नाही पुढे जात राहायचे . एखादी गोष्ट कृतीत उतरवणे महत्वाचे. आज आयुष्यत खूप काही करण्यासारखे आहे. रोज एकाला तरी हसवा , कुणाच्या दुक्खावर किंवा व्यंगावर हसण्यापेक्षा हे बरे. ज्योतिष शास्त्राच्या अभ्यासकांनी निदान एक तरी घटस्फोट वाचवा , एकाचे तरी match making मस्त करून द्या. खरे ज्ञान द्या . घटस्फोट  झालेली माणसे वाईट नसतात फक्त दोन वेगळा विचार करणारी माणसे एकत्र आलेली असतात . मार्केटिंग अजिबात नको फसवणूक नको. लोक हुशार आहेत त्यांना ते समजते आणि आपली पत जाते त्यापेक्षा खरे आपला ठसा उमटवून जाते तोही कायमचा . आज मार्केटिंग चा जमाना आहे. जो दिखता है वह बिकता है . पण लोकांकडून किती पैसे उकळायचे आणि किती टोप्या घालायच्या? असो.  सतत कुढत बसणे, जीवनात घडलेल्या वाईट आठवणी , प्रसंग माणसे ह्यांच्याभोवती रुंजी घालत बसणे म्हणजे स्वतःच्याच हाताने आयुष्याची माती करणे. इथे कुणाला कुणाचीही पडलेली नाही . 

१२ राशींची माणसे ह्या जगात आहेत ,काही मनाला लावून घेणारी आहेत तर काही आपल्याच स्वप्नांना पंख लावणारी आहेत. चला तर मग २०२३ नवनवीन स्वप्ने बघुया ती पूर्ण करण्यासाठी धडपड करुया , अविश्रांत कष्टाने यशश्री खेचून आणूया आणि स्वतःच्या असण्याला एक नवीन अर्थ प्राप्त करून देवूया.

आज सोशल मिडीया प्रगत आहे त्याने खूप सुप्त लेखकाना जन्म दिला आहे. तुम्हीही आपले विचार शब्दबद्ध करा , लिहिते व्हा आणि विचारांना दिशा द्या. इतरांना प्रेरणा द्या . एखाद्या खळखळणार्या धबधब्या सारखे आयुष्य जगा, डबके होऊन जगण्यात मजा नाही . जिवंतपणे कत्येक मरणे जगणाऱ्या लोकांना जीवन जगायची प्रेरणा द्या. 

दुसऱ्याचा द्वेष करून, हेवे दावे ,मत्सर करून ह्या जगात कुणीही सुखी झाले नाही आणि होणारच नाही. उलट आपणच मानसिक रुग्ण होतो अश्याने . मनात महाराजांनाच आणून बसवले तर इतर टुकार विचारांना तिथे जागाच राहणार नाही. प्रयत्नपूर्वक हा प्रयत्न करून बघा. आज आर्थिक समस्या , विवाह , वास्तू , मुलांची शिक्षणे , व्यसने ,संतती न होणे अश्या अनेक विचारांनी मनुष्य त्रस्त आहे. आपल्या जराश्या स्मित हास्याने , दोन गोड शब्दांनी एखाद्याला जगायला स्फूर्ती मिळाली तर तो आनंद खरच अनमोल असेल.पटतंय का? मग लगेच कृती करूनच टाका.

2023 तुम्हा आम्हा सर्वांसाठी “ अनमोल “ असुदे , स्वप्नपूर्तीचे , आकाशाला गवसणी घालणारे ,आरोग्यदायी , दुसर्याला आनंद देणारे , अध्यात्माची गोडी चाखत महाराजांच्या चरणाशी आयुष्य समर्पित करणारे असुदे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना . सकारात्मक जीवन जगायची गुरुकिल्ली आपल्याच कडे आहे आता फक्त ती वापरायची आहे. 

संपर्क : 8104639230

टॅग्स :New Yearनववर्ष