शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराह 'नंबर १'! कसोटी क्रमवारीत विराट, यशस्वीची मोठी झेप; रोहित, पंत, गिलची घसरण
2
"मुलगी जर दिसायला चांगली असेल..."; अजितदादा समर्थक आमदाराचे महिलांबाबत वादग्रस्त विधान
3
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासह बड्या नेत्यांचा खात्मा करणार, इराणने प्रसिद्ध केली मोस्ट वाँटेडची यादी
4
“आरक्षण वाचवायचे असेल तर वंचित बहुजन आघाडीला सत्तेत निवडून द्या”; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन
5
कमी तिथे आम्ही नव्हे, तर भारत म्हणजे 'हमी'! पुतिन यांच्यानंतर अजित डोवाल फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना भेटले; कारण काय?
6
"...मग मनोज जरांगेंनी आधी तिथला उमेदवार जाहीर करावा", लक्ष्मण हाकेंचे चॅलेंज काय?
7
बांगलादेशवर मोठा विजय मिळवत 'कॅप्टन' रोहित शर्माचा विक्रम, विराट कोहलीला टाकलं मागे
8
लीड रोड करुनही झाली नाही लोकप्रिय; १० मिनिटांच्या 'त्या' भूमिकेने केलं स्टार, आता म्हणते...
9
'या' चुका तुम्हाला करतील कर्जबाजारी; 5 गोष्टी समजून घ्या
10
Palak Sindhwani: गुडबाय! 'तारक मेहता...' मधील सोनूचा मालिकेला रामराम; शेअर केली भावूक पोस्ट
11
मनोज जरांगेंनी कंबर कसली; दसरा मेळाव्याची सुरु केली तयारी, विविध ठिकाणी देणार भेटी
12
Irani Cup live : कडक सॅल्युट! सर्फराज खानचे अप्रतिम 'द्विशतक', मुंबईचा 'संकटमोचक' लै भारी लढला
13
धक्कादायक! झारखंडमध्ये रेल्वे ट्रॅकला बॉम्बने उडवले; भीषण स्फोटाने परिसर हादरला
14
ऑनलाईन गेमच्या नादात सेल्समन बनला चोर; शोरुममधील ७ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला
15
गोविंदाप्रमाणेच बॉलिवूड अभिनेत्रीच्या पतीलाही स्वत:च्याच बंदुकीतून लागली होती गोळी, लग्नानंतर ११ दिवसांतच उद्ध्वस्त झालेला संसार
16
"काँग्रेसनं लबाडीच्या राजकारणामुळं स्वतःला संपवलं", मनोज तिवारींचा जोरदार हल्लाबोल
17
“मोदी सातत्याने महात्मा गांधींचे नाव घेतात, पण अहिंसेचे पालन करत नाहीत”; काँग्रेसची टीका
18
इस्रायलसोबत युद्ध सुरू असतानाच इराणचं मोठं विधान; म्हणाला- नेतन्याहू या शतकातील 'नवा हिटलर, तर भारत..."
19
“भाजपाने आधीच हार मानली, २०२४ च्या विधानसभेला मविआचेच सरकार येणार”; नाना पटोलेंचा दावा
20
Gold Price Review: सोन्यापेक्षा चांदी अधिक महागली, महिन्याभरात ७१०२ रुपयांनी वाढली किंमत; कारण काय?

पुढच्या वर्षी मकर संक्रांत १४ जानेवारीला, दा. कृ. सोमण यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 7:45 AM

सन २००० मध्ये निरयन मकर संक्रांत २२ डिसेंबरला येत होती. सन १८९९ मध्ये मकर संक्रांत   १३ जानेवारीला आली होती.

ठाणे : पुढच्या वर्षी मकर संक्रांत १४ जानेवारीला असेल. निरयन मकर संक्रांतीचा दिवस हा पुढे पुढे जात असतो. यामुळे सन २०२५, २०२६, २०२९, २०३०, २०३३, २०३४, २०३७, २०४१, २०४२, २०४५, २०४६ आणि २०४९ या वर्षांमध्ये मकर संक्रांतीचा सण हा १४ जानेवारी रोजी येणार, अशी माहिती पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.

सन २००० मध्ये निरयन मकर संक्रांत २२ डिसेंबरला येत होती. सन १८९९ मध्ये मकर संक्रांत   १३ जानेवारीला आली होती. सन १९७२ पर्यंत निरयन मकर संक्रांत १४ जानेवारीलाच येत असे.  सन १९७२ पासून सन २०८५ पर्यंत निरयन मकर संक्रांत कधी १४ जानेवारीला, तर कधी १५ जानेवारीला येईल. सन २१०० पासून निरयन मकर संक्रांती १६ जानेवारीला येईल.

अशा रीतीने निरयन मकर संक्रांतीचा दिवस पुढे जात जात सन ३२४६ मध्ये निरयन मकर संक्रांत १ फेब्रुवारीला येणार आहे. गेल्या वर्षी १५ जानेवारीला मकर संक्रांत होती. सूर्याने एकदा मकर राशीत प्रवेश केल्यापासून पुन्हा तो मकर राशीत प्रवेश करीपर्यंत ३६५ दिवस, ६ तास, ९ मिनिटे १० सेकंद एवढा कालावधी लागतो.

उलट काळेच कपडे घालामकर संक्रांतीने काळे वस्त्र परिधान केल्यामुळे त्या दिवशी काळे वस्त्र घालू नका. काळे वस्त्र परिधान करणे अशुभ आहे, अशी अफवा काही लोक पसरवत आहेत, त्यात काहीही तथ्य नाही. काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायला काहीही हरकत नाही. उलट थंडीत काळ्या रंगाची वस्त्रे ही शरीर उबदार ठेवतात. म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसण्याची प्रथा असल्याचेही सोमण यांनी सांगितले.

 ग्रेगरीयन कॅलेंडरच्या नियमाप्रमाणे शतकपूर्तीच्या अंकास चारशेनी भाग जात नसेल तर ते लीप वर्ष धरले जात नाही. त्यामुळे दर चारशे वर्षांनी मकर संक्रांतीचा दिवस ३ दिवसांनी पुढे जातो,  तसेच दरवर्षीचा ९ मिनिटे १० सेकंद हा काल साठत जाऊन दर १५७ वर्षांनी मकर संक्रांतीचा दिवस आणखी एक दिवसाने पुढे जातो. 

टॅग्स :Makar Sankrantiमकर संक्रांती