शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

Nirjala Ekadashi 2023: निर्जला एकादशीला बिनअन्नपाण्याचा उपास का? जाणून घ्या त्यामागील प्रयोजन!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 7:00 AM

Nirjala Ekadashi 2023: एकादशी अन दुप्पट खाशी असे आपण म्हणतो, पण निर्जला एकादशीला तर अन्नच काय तर पाणीही वर्ज्य; का? ते जाणून घ्या!

३१ मे रोजी निर्जला एकादशी आहे. वर्षभरात एकूण २४ एकादशी येतात. पण असे म्हणतात, की निर्जला एकादशी केली आणि उर्वरित २३ एकादशी केल्या नाहीतर तरी त्या २३ एकादशीचे पुण्य लाभते. म्हणून या एकादशीला महत्त्व असते. मात्र एवढे पुण्य एकत्र साठवायचे तर नियमही कठोर असणारच ना? निर्जला एकादशीला दोन्ही वेळी खायचे तर नाहीच, शिवाय पाणीदेखील प्यायचे नाही असा नियम आहे. त्यामागील कारण काय असावे, ते जाणून घेऊ. 

निर्जला एकादशीच्या निमित्ताने आपल्या पूर्वजांनी पाण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. हे व्रत ऐन पावसाळ्यात येत असल्याने, पावसाचे पाणी साठवा अन्यथा बिनापाण्याचे राहावे लागेल, असा संदेश जणू काही या व्रताच्या निमित्तानेशास्त्रकारांनी दिला आहे. म्हणून निर्जला एकादशीचे व्रत निर्जळी राहून अर्थात पाणी न पिता केले जाते. द्वादशीला कृष्णाला फुल वाहून या उपास सोडला जातो. 

एकादशीचा उपास म्हणजे महिन्यातून दोन दिवस तोंडाला आणि पोटाला पूर्णवेळ विश्रांती देण्याचा दिवस असेही मानले जाते. अर्थात जे लोक फराळ न करता एकादशी करतात हे विधान त्यांना लागू होते, एकादशी अन दुप्पट खाशी वाल्यांना नाही! देवाचे नाव घेत विषय, विकार, वासना यातून मन अलिप्त करावे यासाठी दर महिन्याला विष्णू उपासनेच्या स्वरूपात एकादशीचा उपास, व्रत करा असे सांगितले जाते!

आरोग्य, शरीरशुद्धी, अपचन, रोगनाश, इ. साठी मनुष्यच नाही, तर पशूपक्षीही उपवास करतात. पशु किंवा पक्षी यांना अपचन झाले असता किंवा एखादा विकार, रोग झाला असता, ते कडकडीत उपास करतात. कोणताही खाद्यपदार्थ त्यांच्यापुढे ठेवला तरी ते स्पर्शही करत नाहीत. काही कुत्रे, गायी तर जन्मापासून आयुष्यभर विशिष्ट दिवशी उपवास करतात. यावरून मानवाने उपवासाचा खरा अर्थ समजून घेतला पाहिजे. 

अतिरिक्त अनावश्यक अन्नेसेवनाच्या संदर्भाने वैदिक धर्मास उपवास, लंघन, अल्पाहार, लघुआहार, दुग्धाहार, फलाहार इ. कल्याणकारक योजना सांगितलेल्या आहेत. त्यांनाही आजच्या विज्ञान शाखांनी उपयुक्त, योग्य व शास्त्रीय अशी मान्यता दिली आहे. शरीरात दोन प्रकारची इंद्रिये/ अवयव आहेत. कधीही विश्रांती न घेता अखंड क्रियाशील असणारी आणि विश्रांती घेऊन कार्य करणारी.जन्मापासून मृत्यूच्या क्षणापर्यंत अहोरात्र, अखंड, अविश्रांत क्रियाशील असणाऱ्या इंद्रियांमध्ये हृदय, रक्तवाहिन्या, फुप्फुसे, अन्नाशय, जठर, जठराग्नि, अन्ननलिका इ. चा अंतर्भाव होतो.

विश्रांती घेत कार्य करणारी इंद्रिये म्हणजे हात, पाय, नाक, कान, डोळे, जीभ, मन इ यातील अन्नाशय, जठर, जठराग्नि अखंड अहोरात्र कार्यरत असतो. कधीही विश्रांती घेत नाही. उपवासाने त्या अंशत: तरी विश्रांती दिली जाते. विश्रांती देण्याने त्या इंद्रियाची कार्यशक्ती, कार्यक्षमता यात वाढ होते व ती शरीराला, आरोग्याला उपयुक्त ठरते.

उपवासाचा मुख्य लाभ आहे, की अन्नाशयात र्जात न पचलेली, अशुद्ध द्रव्ये, अन्नघटक, त्यातून उत्पन्न होणारी विषारी द्रव्ये, विषाणू, रोगबीजे, रोगाणु, रोगजंतु इ. सर्व उपवासाने जणून जातात, नष्ट होतात. त्यामुळे रोगांचाही आपोआप व सहजच नाश होतो. त्यामुळे आजाराची कारणे कमी होतात आणि दीर्घायुष्य लाभते. म्हणून आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा एकभुक्त किंवा दोन्ही वेळचा उपास अवश्य करा, असे म्हटले जाते. उपासनेला उपासाची जोड मिळाली असता, तनामनाची शुद्धी होते. म्हणूनही अनेक भाविक महिन्यातून दोनदा येणाऱ्या एकादशीचा वर्षभर उपास करतात. 

टॅग्स :Healthआरोग्य