शहरं
Join us  
Trending Stories
1
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
2
‘लाडकी बहीण’ योजनेत पुन्हा गैरप्रकार समोर; ६ लाडक्या भावांचे अर्ज, ‘असा’ लागला शोध
3
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
4
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
5
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
6
इटलीच्या PM मेलोनी यांना डेट करताहेत इलॉन मस्क? चर्चांना उधाण, स्पष्टीकरण देत म्हणाले...  
7
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली
8
“ब्रिजभूषण सिंहचा एन्काउंटर का केला नाही, RSSच्या लोकांना वाचवायला अक्षय शिंदेला संपवले”
9
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण
10
तिरुपती बालाजी मंदिर लाडू वादावर असदुद्दीन ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात मोठी कारवाई! टीटीडीकडून 'या' डेअरीच्या विरोधात तक्रार दाखल
12
सत्ता आल्यावर कसा निवडला जाणार मविआचा मुख्यमंत्री? पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला फॉर्म्युला 
13
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
14
Video - "मी ऑनलाइन गेममध्ये १५ लाख गमावले, मला ५००-५०० रुपयांची मदत करा"
15
Swiggyचा आयपीओ येण्यापूर्वी राहुल द्रविड पासून करन जोहर पर्यंत दिग्गजांच्या उड्या, पाहा डिटेल्स
16
मुंडेंच्या परळीत पवारांची मोर्चेबांधणी: राजेभाऊ फड यांच्या हाती तुतारी; तिकीट मिळणार?
17
'मला आशा आहे, तुम्ही उत्तर द्याल'; अरविंद केजरीवाल यांचे मोहन भागवतांना पत्र
18
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
19
रोहित पवार बैठकीत मोबाईल, बाटल्या, चाव्या फेकून मारतात; राम शिंदेंचा खळबळजनक आरोप
20
लख लख चंदेरी... आलिया भटचा पॅरिस फॅशन वीक मध्ये 'जलवा'; पाहा अभिनेत्रीचे Photos

तुमची बर्थडेट ‘या’ ३ पैकी आहे? जून महिन्यात ठरतील लकी, लाभेल सुख-समृद्धी, पद-पैसा वृद्धी!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 7:07 AM

Numerology: जून महिन्यात होणाऱ्या ग्रहांच्या गोचराचा सकारात्मक प्रभाव कोणत्या मूलांकांवर पडू शकेल? जाणून घ्या...

Numerology: ज्योतिषशास्त्राच्या अनेक शाखा आहेत. केवळ जन्मकुंडली नाही, तर हस्तरेषा, स्वप्नशास्त्र, अंकशास्त्र, समुद्रशास्त्र यातूनही भविष्यकथन करता येते. अंकशास्त्रात जन्मतारखेवर आधारित मूलांकावरून व्यक्तीचा स्वभाव, वैशिष्ट्य, भविष्यकथन केले जाते. जसा प्रत्येक राशीचा स्वामी असतो, तसेच प्रत्येक मूलांकालाही ग्रहांचे स्वामित्व बहाल केलेले आहे. 

एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्या व्यक्तीचा मूलांक काढला जातो. १ ते ९ या अंकांचे वर्णन अंकशास्त्रात उपलब्ध आहे. नियमित अंतराने ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करत असतात. ग्रहांच्या राशीपरिवर्तनाने अनेक योग, शुभ योग, राजयोग जुळून येत असतात. काही योग अतिशय शुभ तर काही योग प्रतिकूल मानले जातात. ग्रहांच्या गोचराचा राशींप्रमाणे मूलांकांवरही परिणाम, प्रभाव पडत असतो. जून महिन्यात नवग्रहांपैकी सहा ग्रहांचे गोचर होणार आहे. याचा सर्वाधिक फायदा तीन मूलांकांच्या व्यक्तींना होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. तुमचा मूलांक कोणता? कोणत्या मूलांकांना जूनचा महिना लकी, सुख-समृद्धीकारक ठरू शकतो, ते जाणून घेऊया....

वेतनवाढ आणि पदोन्नती मिळू शकते

ज्या व्यक्तींचा जन्म ३, १२, २१, ३० या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ३ आहे. या मूलांकाचा स्वामी गुरु आहे. आताच्या घडीला गुरु ग्रह वृषभ राशीत असून, जून महिन्यात गुरु ग्रहाचा उदय होणार आहे. या कालावधीत नोकरदारांना वेतनवाढ आणि पदोन्नती मिळू शकते. नवीन नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना या काळात चांगल्या संधी मिळू शकतात. एकूणच फायदेशीर ठरू शकतो. अनपेक्षित पैसे मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतील. गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे. 

नशिबाची साथ मिळू शकते

ज्या व्यक्तींचा जन्म ५, १४, २३ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ५ आहे. या मूलांकाचा स्वामी बुध आहे. मे महिन्याच्या अखेरीस बुध वृषभ राशीत प्रवेश करत असून, गुरु, सूर्य, शुक्र या ग्रहांसोबत बुधाची युती होऊन जून महिन्यात अनेक प्रकारचे शुभ योग निर्माण होत आहे. काही शुभ योग राजयोगाप्रमाणे फले देऊ शकतात. आगामी काळ अनुकूल सिद्ध होऊ शकतो. नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांसाठीही काळ चांगला राहू शकेल. मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता.

उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता

ज्या व्यक्तींचा जन्म ७, १६, २५ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ७ आहे. या मूलांकाचा स्वामी केतु आहे. आगामी काळ फायदेशीर सिद्ध होऊ शकतो. व्यापारी वर्गाला चांगला आर्थिक लाभ होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी नोकरदारांचा  कर्मचाऱ्यांशी ताळमेळ चांगला राहू शकेल. सर्व काम सहज पूर्ण करू शकाल. बॉस कामावर खूश असेल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतील.

- सदर माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, तुमच्या मूलांकाविषयी जाणून घेण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जाते.

टॅग्स :Astrologyफलज्योतिषnumerologyसंख्याशास्त्र