Numerology: ज्योतिषशास्त्राच्या अनेकविध शाखा आहेत. यापैकी एक शास्त्र म्हणजे अंकशास्त्र. अंकशास्त्रात जन्मतारखेवर आधारित मूलांक किंवा भाग्यांकावरून व्यक्तीचा स्वभाव, गुण-वैशिष्ट्ये, भविष्यकथन केले जाऊ शकते. ज्योतिषशास्त्रात प्रत्येक राशीचा स्वामी असतो, तसेच प्रत्येक मूलांकालाही ग्रहांचे स्वामित्व बहाल केलेले आहे. नवग्रहांचा गुरु मानला गेलेला बृहस्पति हा एक महत्त्वाचा ग्रह मानला जातो. ज्योतिषशास्त्रातही गुरुला वरचे स्थान आहे.
अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांचा जन्म ३, १२, २१ किंवा ३० या तारखेला झाला आहे. त्यांचा मूलांक ३ आहे. गुरु हा मूलांक ३ चा स्वामी आहे. अलीकडेच गुरु मेष राशीत मार्गी झाला आहे. सन २०२४ च्या मे महिन्यापर्यंत गुरु मेष राशीत विराजमान असेल. अंकशास्त्रानुसार गुरु स्वामित्व असलेले या मूलांकांच्या व्यक्ती धैर्यवान आणि निर्भय असतात. ऊर्जेचा संचार या व्यक्तींमध्ये असतो. प्रत्येक संकटाला ते धैर्याने सामोरे जातात.
व्यापार अन् करिअरमध्ये मिळते यश, होते चांगली प्रगती
मूलांक ३ असलेल्या व्यक्ती व्यवसायात खूप पुढे जातात, असे म्हटले जाते. मूलांक ३ असलेले लोक कलात्मक विचार आणि ज्ञानाने व्यवसायाला एक नवीन आयाम देतात. व्यापारातील समर्पण आणि मेहनतीमुळे त्यांना चांगले पैसे मिळतात. ज्ञान आणि विवेकबुद्धीच्या जोरावर या व्यक्ती नोकरीत उच्च पदांपर्यंत जाऊन पोहोचतात. गुरुकृपेमुळे करिअरमध्ये अपार यश आणि प्रगती साध्य करू शकतात.
बुद्धिमान, धैर्यवान आणि निर्भय असतात
मूलांक ३ असलेल्या व्यक्ती साहसी असतात. या व्यक्तींमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता असते. मूलांक ३ असलेल्या व्यक्ती मोकळ्या मनाच्या आणि स्वभावाच्या असतात. जीवन स्वातंत्र्याने जगणे आवडते. स्वभावाने या व्यक्ती शांतताप्रिय, मृदुभाषी आणि सत्यवादी असतात. मूलांक ३ असलेल्या व्यक्ती बुद्धिमान, धैर्यवान आणि निर्भय आहेत. कोणाचीही कामात अनावश्यक ढवळाढवळ त्यांना अजिबात आवडत नाही.
उच्च महत्त्वाकांक्षेमुळे अपार यश, प्रगती
मूलांक ३ असलेल्या व्यक्ती अतिशय बुद्धिमान आणि महत्त्वाकांक्षी असतात. तसेच प्रतिभावान असतात. या व्यक्ती कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार असतात. या व्यक्ती कोणत्याही कामाला विचार न करता हात लावत नाहीत. जे काही काम सुरू करतो ते पूर्ण करूनच थांबतात. त्यांचे परिश्रम आणि कोणत्याही कामाची आवड त्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यास मदत करते. त्यांच्या उच्च महत्त्वाकांक्षेमुळे ते नेहमीच यश, प्रगती साध्य करू शकतात.
- सदर माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, तुमच्या मूलांकाविषयी जाणून घेण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जाते.