Numerology: ज्योतिषशास्त्रात कुंडली, कुंडलीतील ग्रहांची स्थिती, स्थानांवरील दृष्टी अशा अनेकविध गोष्टी पाहून एखाद्या व्यक्तीबद्दल, गुणांबद्दल तसेच भविष्यातील घटनांबद्दल अंदाज वर्तवले जातात. ज्योतिषशास्त्राचीच एक शाखा असलेल्या अंकशास्त्रात जन्म तारखेवर आधारित मूलांक किंवा भाग्यांक यांवरून भविष्य कथन केले जाऊ शकते. जन्म तारखेची संपूर्ण बेरीज करून मूलांक काढता येतो. ज्योतिषशास्त्रात प्रत्येक राशीचा स्वामी असतो, तसेच प्रत्येक मूलांकालाही ग्रहांचे स्वामित्व बहाल केलेले आहे.
ज्योतिषशास्त्रात नवग्रहांपैकी राहु आणि केतु हे क्रूर आणि मायावी ग्रह मानले गेले आहे. हे दोन्ही ग्रह कायम वक्री चलनाने एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करत असतात. तसेच राहु आणि केतु नेहमी एकमेकांपासून समसप्तक स्थानी असतात. राहु ग्रहाला अंकशास्त्रातील मूलांक ४ चे स्वामित्व बहाल केलेले आहे. त्यामुळे मूलांक ४ वर राहुची विशेष आणि अपार कृपा असते, असे मानले जाते.
राजकारणात यश, क्रांतिकारी विचार अन् थक्क करणारी वाटचाल
ज्या व्यक्तींचा जन्म ४, १३, २२, ३१ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ४ आहे. या तारखांना जन्म झालेल्या व्यक्ती क्रिएटिव्ह, दूरदर्शी असतात. या व्यक्तींना राजकारणात चांगले यश मिळते, असे म्हटले जाते. या व्यक्ती क्रांतिकारी विचार करणाऱ्या असतात. विशेष म्हणजे या लोकांना प्रत्येक विषयाचे चांगले ज्ञान असते. त्यांचा स्वभाव मनमिळावू असतो. हे लोक प्रत्येक काम वेळेवर पूर्ण करतात. या व्यक्ती शास्त्रज्ञ होऊ शकतात. या मूलांकाच्या व्यक्ती आयुष्यात एवढ्या मोठ्या गोष्टी करतात की सगळेच थक्क होतात, असे मानले जाते.
गूढ, हट्टी स्वभाव, कोणत्या क्षेत्रात यश अपार?
मूलांक ४ असलेल्या असलेल्या व्यक्तींकडे व्यावहारिक ज्ञानात थोडे कमी असते. कमी भावनिक असतात. या व्यक्तींचा स्वभाव काहीसा रहस्यमय असतो. त्यांना समजणे फार कठीण आहे. हे लोक स्वतःच्या अटींवर जीवन जगतात. या व्यक्ती गूढ विषयांमध्ये अतिशय पारंगत आहेत. हे लोक हट्टी असतात, कोणतेही काम करत असतील, तर ते पूर्ण करण्यावर सर्वाधिक भर देतात. त्यानंतर त्यांना समाधान मिळते. हे लोक चांगले नेते आहेत. हे लोक चांगले व्यापारी, संशोधक, वाहतूकदार, अभियंते, कंत्राटदार, वैज्ञानिक, उद्योगपती, नेते, डिझाइनर, डॉक्टर, वकील, मद्य व्यापारी अशा क्षेत्रात चांगले करिअर, व्यवसाय करू शकतात, असे म्हटले जाते.
- सदर माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, तुमच्या मूलांकाविषयी जाणून घेण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जाते.