शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
महालक्ष्मी हत्याकांडाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ!
3
मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
4
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
5
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
6
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
7
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
8
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
9
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
10
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
11
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
12
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
13
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
14
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

चित्रकला शिक्षक, योग शिक्षक ते समाज शिक्षक, असा गुळवणी महाराजांचा जीवनप्रवास त्यांच्या जयंतीनिमित्त!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2024 7:00 AM

९ जानेवारी रोजी प. पु. गुळवणी महाराज यांची जयंती आहे, सामान्य ते असामान्यत्त्वाचा प्रवास त्यांनी अध्यात्माच्या वाटेवरून कसा केला ते जाणून घेऊ. 

सामान्य घरात जन्माला आलेले बालक आपल्या कलेने, गुणांनी, गुरुकृपेनी आणि सदाचरणाने गुरुपदाला कसे पोहोचते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे गुळवणी महाराजांचे चरित्र. त्यांना लाभलेला संत सहवास, दत्त गुरुंचे दर्शन, आत्मज्ञानाचा लागलेला शोध आणि अधिकारी पुरुषांचा सहवास हे सारेच विलक्षण आहे. गुळवणी महाराज यांच्याकडे दीक्षा घेण्यासाठी सरसंघचालक गोळवलकर गुरुजी येत असत. पंचांगकर्ते पं. धुंडिराजशास्त्री दाते हे गुळवणी महाराजांना खूप मानत अत. सर चुनीलाल मेहता हे प्रांताचे अर्थमंत्री होते. ते मुंबईहून पुण्याला गुळवणी महाराजांच्या दर्शनासाठी आपल्या पत्नीसह आले. पुढे ते दोघे गुळवणी महाराजांचे शिष्य होऊन त्यांनी त्यांच्याकडून दीक्षा घेतली. ९ जानेवारी रोजी तिथीने जयंती आहे, त्यानिमित्त त्यांच्या समग्र आयुष्याचा थोडक्यात आढावा. 

वामनराव गुळवणी यांचा जन्म कोल्हापूरजवळ कुडुत्री या गावी मार्गशीर्ष वद्य १३ रोजी गुरुवारी, शके १८०८, दिनांक १३ डिसेंबर १८८९ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव प.पू. दत्तात्रय व मातेचे नाव उमादेवी होते. दत्तात्रय यांचे दोन विवाह झाले होते. वामनरव हे द्वितीय मातेचे चिरंजीव.

गुळवणी हे एक सदाचारसंपन्न, वैराग्यशील कुटुंब होते. वामनरावांना उपनयन संस्कारानंतर त्यांच्या वडिलबंधूंकडून धार्मिक आचाराचे शिक्षण मिळाले. त्यांनी संस्कृत ग्रंथाचे अध्ययन केले. बालपणापासून त्यांचा देवधर्माकडे ओढा होता. चित्रकलेचे त्यांनी शिक्षण घेतले होते. ते उत्तम चित्रकार होते. कोल्हापुरात त्यांनी फोटोग्राफीचे दुकान काढले होते. 

१९०७ साली श्री. टेंबे स्वामी महाराज गुरुदर्शनाला वाडीला आले. वामनरावांचे वडील बंधू त्या वेळी वाडीला होते. त्यांनी वामनरावांना टेंबे स्वामी महाराजांचा फोटो त्यात एक श्लोक गुंफून आणण्यास सांगितला. त्याप्रमाणे वामनराव तयारीने आले. वामनराव, टेंबे स्वामी महाराजांच्या दर्शनाला गेले. त्यांनी वामनरावांना एक पेटी दिली. ती शेवटपर्यंत वामनरावांच्या हातात होती. त्या प्रसाद पेटीच्या प्रभावाने आपण श्री वासुदेव निवास बांधला. तेथे अमाप अन्नदान, द्रव्यदान करू शकलो अशी वामनरावांची श्रद्धा होती. 

१९०९ साली वामनराव मुंबईला येऊन नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करत होते. पण कोठेच जमले नाही. नंतर ते गाणगापुरीला आले. त्यांनी गुरुचरित्राची सहा पारायणे केली. पुडे कुरुगुडी या गावी टेंबे स्वामी महाराज व वामनराव यांची भेट झाली. प्रथम दर्शनातच वामनरावांना गुरुप्रसाद मिळाला. ते सदासर्वकाळ गुरुसेवा करू लागले. गीता, विष्णू सहस्रनामाची संथा व आसन प्राणायाम व अजाण जपाची स्वामी महाराजांनी दीक्षा दिली. 

औदुंबर मुक्कामी त्यांनी श्रीमाला मंत्राचे पुनश्चरण केले. श्री क्षेत्र गरुडेश्वरी स्वामी महाराजांकडून ते ब्रह्मसूत्रे, दशोपनिषदे शिकले. श्री दत्तात्रेयाचे एकमुखी चित्र त्यांनी स्वामी महाराजांसाठी काढण्यास सुरुवात करताच वामनरावांना साक्षात दत्तात्रेयाचे दर्शन झाले. त्यांच्या चित्रकलेचे सार्थक झाले. 

वामनरावांनी १९१७ ते १९२६ पर्यंत बार्शी म्युनिसिपल शाळेत चित्रकला शिक्षकाची नोकरी केली. १९२६ ते १९४२ पर्यंत नूतन मराठी विद्यालय पुणे येथे महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांच्या योगे चित्रकला शिक्षकाची नोकरी केली. आसेतू हिमाचल तीर्थयात्रा केल्या. 

नंतर बंगालमधील एक संन्यासी प.पू. श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज व वामनराव यांचा हुशंगाबादला असताना परिचय झाला. त्याच स्वामी महाराजांनी वामनराव यांना योगदीक्षा देऊन शक्तिपात करण्याचे तंत्र शिकवले. वामनरावांनी स्वामी महाराजांच्या समवेत हटयोगातील श्रेष्ठ दर्जाच्या क्रिया, प्राणायाम व इतर कष्टसाध्य क्रिया आत्मसात करून घेतल्या. त्यामुळे वामनरावांचा अधिकार फार मोठा झाला. स्वामी महाराजांच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी अनेक शिष्योत्तमांना शक्तिपात करून सन्मार्गाला लावले. लोक वामनरावांना सद्गुरु गुळवणी महाराज म्हणून लागले. 

गुळवणी महाराजांना प्राप्त झालेल्या या अलौकिक विद्येने लोकांचीही कुंडलिनी जागृत करण्याची साधना प्राप्त झाली. श्री गुळवणी महाराजांनी १९२४ पासून ही दीक्षा देण्यास प्रारंभ केला. अखेरपर्यंत हा कार्यक्रम सुरू ठेवला. 

१९६५ साली गुळवणी महाराजांनी वासुदेव निवासाची स्थापना केली व आपले जीवन लोककल्याणासाठी आणि लोकांवर परोपकार करण्यासाठी घालवले.  सतत परमेश्वराचे नामस्मरण करावे, सत्संग धरावा, संसारातील आपत्ती व अरिष्टांनी खचून न जाता श्रद्धेने व विश्वासाने परमेश्वराची करुणा भाकावी, समर्पण वृत्तीने शरणागत होऊन साधना करावी. असा सद्गुरु गुळवणी महाराजांचा उपदेश आहे. 

भक्तीतून योग आणि योगातून परमज्ञान प्राप्त होते. हे सारे शिक्षण देणारे गुळवणी महाराज उत्तरायण लागल्यानंतर भीष्माचार्यांप्रमाणे थांबून भौतिक देह सोडून ब्रह्मलीन झाले. त्यांच्या पवित्र स्मृतीला आणि कार्याला त्रिवार वंदन!!!