शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

मुलांना चांगले वळण लावण्याआधी पालकांनी 'या' गोष्टींकडे लक्ष द्या! -आचार्य चाणक्य 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 4:54 PM

मुलांना वाईट गोष्टी कळण्याआधी जगात चांगले काय आहे, याची ओळख करून देणे ही पालकांची जबाबदारी आहे.

'अगर किसी बच्चे को खिलोना ना दिया जाए, तो वह कुछ देर तकी रोएगा, मगर संस्कार ना दिए जाए तो जिंदगीभर रोएगा।' मध्यंतरी हे सुंदर वाक्य वाचनात आले होते. भारतात संस्कार, मूल्य, परंपरा या गोष्टींना महत्त्व का आहे, याचे सार वरच्या एका वाक्यात एकवटले आहे. आपले आयुष्य, जडणघडण, वागणूक या सर्वांवर संस्कारांचा मोठा हातभार असतो. ओल्या मातीला योग्य वयात वळण दिले, तरच ती चांगला आकार देते. ही ओली माती म्हणजे बाल्य दशा. याच वयात मुलांना प्रेम, आपुलकी, राग, लोभ, आदर, नम्रता या गोष्टींचे वळण लावायचे असते. दुर्दैवाने आज घरोघरी या गोष्टींचा अभाव दिसत आहे. 'आमचा मुलगा आमचे ऐकत नाही', ही बाब आजचे पालक हसत हसत सांगतात. परंतु हेच हसू उद्या पाल्य आणि पालकांच्या डोळ्यातले आसू बनतात. यासाठी आचार्य चाणक्य म्हणतात, पुढच्या पिढीच्या हाती देशाचे भवितव्य आहे. त्यांना योग्य रीतीने घडवणे हे आपले कर्तव्य आहे. याची जाणीव ठेवून काही बाबतीत पथ्य जरूर पाळा. 

वाईट वळण, वाईट सवयी लागायला वेळ लागत नाही. मनुष्य स्वभाव वाईट गोष्टी पटकन आत्मसात करतो. लहान मुले त्याला अपवाद कशी असतील? म्हणून त्यांना वाईट गोष्टी कळण्याआधी जगात चांगले काय आहे, याची ओळख करून देणे ही पालकांची जबाबदारी आहे. माळी ज्याप्रमाणे ऊन, वारा, पाऊस यांपासून आपल्या बागेची राखण करतो, रक्षण करतो, तशी राखण पालकांना करायला हवी. आपल्या घरची बाग हसरी, खेळती राहावी वाटत असेल, तर स्वतः जातीने लक्ष घातले पाहिजे 

मुलांवर प्रेम करावे, माया करावी परंतु अति लाड करू नये. साखर गोड असते, परंतु त्याचे अति सेवन केले तर मधुमेह होतो आणि मधुमेहाने शरीर निकामी बनते. म्हणून नात्यात साखरेचा गोडवा असावा. परंतु अति लाडाने मुलांचेच नुकसान होते. त्यांचा स्वभाव हट्टी बनतो. राग राग करून, आक्रस्ताळेपणा करून, रडून, चिडून एखादी गोष्ट लगेच मिळवता येते हा चुकीचा संदेश मुलांना जातो. मुलांचे लाड जरूर पूरवा. परंतु गरज ओळखा आणि त्यांनी मागितलेली वस्तू त्यांना दोन दिवसांनी नाहीतर दोन महिन्यांनी द्या. त्यांचा संयम वाढेल आणि मिळणाऱ्या वस्तूची किंमत कळेल. 

मोठयांप्रमाणे लहान मुलांनाही मान अपमान कळतो. म्हणून त्यांच्याकडून चूक झाली असता चारचौघात त्याला ओरडण्यापेक्षा समजवून सांगा आणि चूक मोठी असेल, तर वेळीच एक फटका द्या. वेळेवर मारलेला एक फटका आयुष्यभराची शिकवण देऊन जातो. मुलांना अपमान वाटला तरी चालेल, परंतु मोठ्या अपराधाची शिक्षा वेळीच द्यायला हवी आणि नंतर त्यांची कानउघडणी देखील करायला हवी. मुलांना केवळ मारून मुटकून वळण लावता येत नाही. त्यांना त्यांच्या कलाने घेत समजवावे लागते. परंतु, पालकांकडे तेवढा संयम हवा. हा समतोल नीट राखला, तर मुलांकडून भविष्यात मोठे अपराध घडणार नाही. चुकीच्या गोष्टी करताना मन धजावणार नाही. आई वडिलांबद्दल आदरयुक्त भीती वाटेल आणि तेवढेच प्रेमही कायम राहील.