शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Visarjan 2024 Live: 'लालबागचा राजा'चं विसर्जन; साश्रू नयनांनी भक्तांनी दिला निरोप
2
केंद्राने कच्च्या तेलावरील विंडफॉल टॅक्स शून्यावर आणला; पेट्रोल, डिझेलच्या किंमती कोसळणार?
3
राज्याला महिला मुख्यमंत्री हव्या पण रश्मी ठाकरेंचं नाव नको; किशोरी पेडणेकर असं का बोलल्या?
4
...तर २ टर्म मी केंद्रात मंत्री असतो; मुख्यमंत्रिपदावरून नाना पटोलेंचं थेट उत्तर
5
EPFO Calculation: दर महिन्याला केवळ 'इतकं' योगदान, नंतर तुमच्या पीएफ खात्यात जमा होती ३ ते ५ कोटी; पाहा कॅलक्युलेशन
6
Video: आर्या जाधवची अमरावतीत रॅली, सादर केलं रॅप; चाहत्यांचा तुफान प्रतिसाद
7
IND vs BAN : 'रन बरसेगा..' किंग कोहली 'रन बरसे!' रैनाची 'विराट' भविष्यवाणी
8
"बिग बॉस मराठीचे चार सीझन गाजले नाहीत", केदार शिंदेंच्या वक्तव्यावर नेटकऱ्यांची नाराजी, म्हणाले- "रितेशच्या जागी..."
9
"तुम्ही प्रश्न विचारू शकता, वाद घालू नका"; मणिपूरच्या प्रश्नावर अमित शाहांचा पत्रकाराला सल्ला
10
"दादांनी थांबवलं तरी भाजपाविरोधात निवडणूक लढणार"; अजित पवार गटातील नेत्याचा इशारा
11
नवाब मलिक यांच्या जावयाच्या कारचा भीषण अपघात; समीर खान गंभीर जखमी
12
NPS Vatsalya Scheme: मुलांचं पेन्शन अकाऊंट, वर्षाला करू शकता ₹१००० पासून गुंतवणूक; पाहा स्कीमच्या डिटेल्स
13
पेजर हॅक झाले की मोसादने कंपन्यांसोबत डील केली; लेबनॉन बॉम्बस्फोटानंतर प्रश्न उपस्थित
14
EPFO News : EPFO मध्ये मोठ्या बदलाचे सरकारचे संकेत, फायदा होणार की नुकसान? पाहा संपूर्ण डिटेल्स
15
सूरजला ओळखता येईना पाणगेंडा, अंकिताला विचारतो दिसतो कसा? टास्कदरम्यानचा व्हिडिओ पाहून आवरणार नाही हसू
16
आजचे राशीभविष्य, १८ सप्टेंबर २०२४; खूप मोठा आर्थिक लाभ होईल, यश व कीर्ती वाढेल
17
ममता बॅनर्जी यांना कोर्टाने फटकारले! महिला डॉक्टरांना नाईट शिफ्टपासून रोखू नका
18
देशभरातील बुलडोझर कारवाईवर बंदी, आमच्या आदेशाशिवाय बांधकामे पाडू नका: सर्वोच्च न्यायालय
19
राजधानीत 'आतिशी 'बाजी, केजरीवाल यांचा राजीनामा; आतिशी मार्लेना दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री होणार
20
मोहना सिंगची 'गगनचुंबी' झेप! बनली तेजस फायटर फ्लीटमधील पहिली महिला फायटर पायलट

Parivartani Ekadashi 2022: सर्व मनोरथांची पूर्तता करणारे परिवर्तनी एकादशीचे व्रत विशेष का आहे आणि कसे करावे? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2022 7:00 AM

Parivartani Ekadashi 2022: ७ सप्टेंबर रोजी हे व्रत करायचे असून या व्रतामागील कथा जाणून घ्या!

प्रत्येक एकादशीचे आगळे वेगळे महत्त्व आहे. हिंदू धर्मातील सर्व सण, वार, उत्सव, व्रत, वैकल्ये ही निसर्गाशी निगडित आहेत. ७ सप्टेंबर रोजी बुधवारी परिवर्तिनी एकादशी आहे. ही एकादशी पद्मा एकादशी या नावेही ओळखली जाते. या एकादशीमागे काय कथा आहे ती जाणून घेऊ आणि तिचे व्रतमहात्म्य समजून घेऊ.

या एकादशीची एक विशेष कथा आहे. ती अशी- 

फार पूर्वी सूर्यवंशीय राजा मांधाना याच्या राज्यावर अनावृष्टीचे संकट ओढावले. त्यावेळी त्याने अंगिरा ऋषींना यावर उपाय विचारला. त्या ऋषींच्या सांगण्यावरून राजाने मनोभावे पद्मा एकादशीचे व्रत श्रद्धापूर्वक केले. परिणामी पाऊस पडून दुष्काळाच्या संकटाचे निराकरण झाले. राजा आणि प्रजा सुखी झाली. 

असे परिवर्तिनी एकादशीचे महत्त्व आहे. हे व्रत करण्यासाठी व्रतकर्त्याने प्रात:काळी शुचिर्भूत होऊन भगवान श्रीविष्णूंची यथासांग पूजा करावी. पूर्ण दिवसाचा उपास करून रात्री नामसंकीर्तन करीत जागरण करावे. द्वादशीला इतर एकादशीप्रमाणे भोजन करून उपास सोडावा.

या दिवशी श्रवण नक्षत्र असल्यास या एकादशीला 'विजया एकादशी' असेही म्हणतात. या योगावर एकादशीचे व्रत केल्यास आपल्या सर्व मनोरथांची पूर्तता होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.  या विजया एकादशीच्या मुहूर्तावर वामनाची पूजा करण्याची प्रथा आहे. दुसऱ्या दिवशी अन्नदान करून या व्रताची पूर्तता केली जाते. 

विष्णुभक्तांसाठी एकादशी हे व्रत म्हणजे एक पर्वणीच असते. त्यामुळे जे नेमाने सर्व एकादशी करतात, ते ही एकादशीदेखील करतात. ज्यांना उपास करणे शक्य नसते त्यांनी भगवान विष्णूची पूजा करावी. तसेच साधा सात्त्विक आहार घ्यावा. 'ऊँ नमो भगवते वासुदेवाय नम:' या मंत्राचा जप करावा. अथवा विष्णुसहस्त्रनामाचे श्रवण-पठण करावे.