शहरं
Join us  
Trending Stories
1
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
2
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
3
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
5
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
6
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
7
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
8
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
9
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
10
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
11
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
12
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
13
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

Parivartani Ekadashi 2023: चातुर्मासात झोपी गेलेले भगवान विष्णू भाद्रपद एकादशीला क्षीरसागरात बदलतात कूस; सविस्तर वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 7:00 AM

Parivartani Ekadashi 2023: मंगळवार २६ सप्टेंबर रोजी परिवर्तनी एकादशी आहे, भाद्रपद हा चातुर्मासाच मध्यांतर; अर्धी झोप पूर्ण करून भगवान विष्णू आज कूस बदलतात. 

आषाढ शुद्ध एकादशीच्या शुभमुहूर्तावर भगवान विष्णू चार महिन्यांसाठी झोपी जातात. त्याला भाद्रपद शुक्ल एकादशीला बरोबर दोन महिने पूर्ण होतात. म्हणून तो मुहूर्त साधून देवाचे भक्त देवाची झोपमोड होऊ न देता त्याची कूस बदलतात, ती भाद्रपद शुक्ल एकादशीला! तो विधीदेखील भक्तांसाठी एक उत्सवच असतो, त्याला कटिपरिवर्तनोत्सव असे नावही दिले आहे. यावेळी सगळे पूजाविधी हे प्रबोधिनी एकादशीसारखेच असतात. देवाला स्नान घालून रथयात्रा काढली जाते. संध्याकाळी महापूजा करून आरती केली जाते. रात्री देवाला उजव्या कुशीवर निजवले जाते. या रात्री भजन कीर्तनासह जागरण केले जाते. दुसऱ्या दिवशी द्बादशीला-

वासुदेव जगन्नाथ प्राप्तेयं द्वादशी तव,पार्श्वेन परिवर्तस्व सुखं स्वपीहि माधव।

अशी प्रार्थना करून मग एकादशीच्या उपासाचे पारणे करतात. हा सोहळा भक्ताच्या भोळ्या भावाचे आणि भगवंताप्रती असलेल्या प्रेमाचे दर्शन घडवतो. देव एकाच कुशीवर सलग चार महिने कसे झोपणार? या विचाराने भक्तांनी देवाच्या आवडत्या तिथीचे अर्थात  एकादशीचे निमित्त साधून देवाची कूस वळवली आहे. विश्रांती घेत असताना देवाचे अंग दुखू नये, हात दुखू नये म्हणून भक्तांनी काळजी घेतली आहे. `यथा देहे तथा देवे' म्हणजेच ज्या भावना, पीडा आपल्या देहाला होतात, तशाच देवालाही होत असतील या कल्पनेतून भक्तांनी समारंभपूर्वक देवाची कूस वळवण्याचा कार्यक्रम आखला आहे. यंदा अधिक श्रावण मास आल्याने कूस बदलण्याचा समारंभ थोडा पुढे सरकला, मात्र प्रतेप्रमाणे आजच्या दिवशी भगवान विष्णूंना दुसऱ्या कुशीवर वळवून परत झोपवले जाते. आजही अनेक विष्णूमंदिरांमध्ये कटाक्षाने सारे नियम पाळून ही प्रथा पाळली जाते. तो सोहळा प्रेक्षणीय असतो. 

भक्तांचा भोळा भाव पाहून देवालाही भक्तांप्रती आत्मियता वाटली नाही तरच नवल! देव भक्तांची काळजी वाहतो, भक्त देवाची काळजी वाहतात. असे हे परस्परांचे सुंदर नाते आहे आणि त्याच नात्याचे मनोहारी दर्शन घडवणारी प्रथा म्हणजे खरा परिवर्तनोत्सव!