शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
2
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
3
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
4
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
5
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
6
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
7
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
8
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
9
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
10
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
11
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
12
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
13
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
14
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
15
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
16
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
17
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात
18
आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा
19
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू
20
"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत

Parivartani Ekadashi 2024: परिवर्तनी एकादशीला विष्णुंची बदलली जाते कूस; वाचा सुंदर प्रथा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 7:00 AM

Parivartani Ekadashi 2024: १४ सप्टेंबर रोजी परिवर्तनी एकादशी आहे, त्यादिवशी वैष्णव कटिपरिवर्तनोत्सव साजरा करतात, जाणून घेऊया त्याबद्दल!

आषाढ शुद्ध एकादशीच्या शुभमुहूर्तावर भगवान विष्णू चार महिन्यांसाठी झोपी जातात. त्याला भाद्रपद शुक्ल एकादशीला बरोबर दोन महिने पूर्ण होतात. यंदा १४ सप्टेंबर रोजी तो दिवस येणार आहे, अर्थात परिवर्तनी एकादशीचा (Parivartani Ekadashi 2024)!  म्हणून तो मुहूर्त साधून देवाचे भक्त देवाची झोपमोड होऊ न देता त्याची कूस बदलतात, ती भाद्रपद शुक्ल एकादशीला! तो विधीदेखील भक्तांसाठी एक उत्सवच असतो, त्याला कटिपरिवर्तनोत्सव असे नावही दिले आहे. यावेळी सगळे पूजाविधी हे प्रबोधिनी एकादशीसारखेच असतात. देवाला स्नान घालून रथयात्रा काढली जाते. संध्याकाळी महापूजा करून आरती केली जाते. रात्री देवाला उजव्या कुशीवर निजवले जाते. या रात्री भजन कीर्तनासह जागरण केले जाते. दुसऱ्या दिवशी द्बादशीला-

वासुदेव जगन्नाथ प्राप्तेयं द्वादशी तव,पार्श्वेन परिवर्तस्व सुखं स्वपीहि माधव।

अशी प्रार्थना करून मग एकादशीच्या उपासाचे पारणे करतात. हा सोहळा भक्ताच्या भोळ्या भावाचे आणि भगवंताप्रती असलेल्या प्रेमाचे दर्शन घडवतो. देव एकाच कुशीवर सलग चार महिने कसे झोपणार? या विचाराने भक्तांनी देवाच्या आवडत्या तिथीचे अर्थात  एकादशीचे निमित्त साधून देवाची कूस वळवली आहे. विश्रांती घेत असताना देवाचे अंग दुखू नये, हात दुखू नये म्हणून भक्तांनी काळजी घेतली आहे. `यथा देहे तथा देवे' म्हणजेच ज्या भावना, पीडा आपल्या देहाला होतात, तशाच देवालाही होत असतील या कल्पनेतून भक्तांनी समारंभपूर्वक देवाची कूस वळवण्याचा कार्यक्रम आखला आहे. यंदा अधिक श्रावण मास आल्याने कूस बदलण्याचा समारंभ थोडा पुढे सरकला, मात्र प्रतेप्रमाणे आजच्या दिवशी भगवान विष्णूंना दुसऱ्या कुशीवर वळवून परत झोपवले जाते. आजही अनेक विष्णूमंदिरांमध्ये कटाक्षाने सारे नियम पाळून ही प्रथा पाळली जाते. तो सोहळा प्रेक्षणीय असतो. 

भक्तांचा भोळा भाव पाहून देवालाही भक्तांप्रती आत्मियता वाटली नाही तरच नवल! देव भक्तांची काळजी वाहतो, भक्त देवाची काळजी वाहतात. असे हे परस्परांचे सुंदर नाते आहे आणि त्याच नात्याचे मनोहारी दर्शन घडवणारी प्रथा म्हणजे खरा परिवर्तनोत्सव!

टॅग्स :chaturmasचातुर्मास