शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालानंतर सत्तेची समीकरणं बदलणार?; ; अजित पवार गटाच्या आणखी एका नेत्याचा दावा
2
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला
3
Maharashtra: "अजित पवार जोपर्यंत भाजपसोबत, तोपर्यंत एकत्र येणे..."; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
4
“जो शब्द दिला तो पाळतात, अजित पवार मर्द माणूस”; नवाब मलिकांनी केले तोंडभरून कौतुक
5
Vidhan Sabha 2024: उमरेडमध्ये 'पारवें'चे डबल इंजिन धावणार की, काँग्रेसचे 'दलित कार्ड' चालणार?
6
भारताविरूद्धच्या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; दुखापतग्रस्त खेळाडूने मैदान सोडले!
7
शेअर बाजारात २ दिवसांत कमावलं, ते काही तासांत गमावलं! या सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण
8
काँग्रेसचा प्रचार धडाका! राहुल गांधी, प्रियंका गांधी, खरगेंसह प्रमुख नेते महाराष्ट्रात
9
"जिवंत राहिले तर...!"; सुजलेल्या चेहऱ्यासह फोटो शेअर करत साध्वी प्रज्ञा सिंह यांचा काँग्रेसवर आरोप
10
सौरव गांगुलीचा सल्ला अन् भारताच्या स्टार खेळाडूनं 'निवृत्ती'चा निर्णय बदलला, म्हणाला...
11
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येबाबत मोठी अपडेट, आरोपींनी आधीच शस्त्रे लपवली होती, पुण्यातून आणखी दोन जणांना अटक
12
कोण आहेत भारतीय वंशाचे कश्यप 'काश' पटेल? डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू, जे बनू शकतात CIA चीफ!
13
Gold Rates Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी 'गुड न्यूज', जोरदार आपटलाय भाव! पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
14
३५४ मतदार... झोपडीतील मतदान केंद्र...; २० किमी पायपीट करून निरीक्षकांनी केली पाहणी
15
आज दहशतवादी गांधी कुटुंबाची मदत मागताहेत; 'त्या' पत्रावरुन स्मृती इराणींचा हल्लाबोल
16
Shah Rukh Khan : "माझा फोन २ नोव्हेंबरला चोरीला गेला"; शाहरुखला धमकावल्याचा आरोप असलेल्या फैजानचा दावा
17
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विचारला घटनात्मक प्रश्न; AI Lawyer दिले ‘असे’ उत्तर, Video व्हायरल
18
"मी एक हिंदू आहे त्यामुळे..."; एकता कपूर असं काय म्हणाली की नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
19
अली फजल अन् रिचा चड्डाच्या लेकीचं नाव आलं समोर, अर्थही आहे खूपच खास
20
Truecaller कंपनीवर आयकर विभागाचा छापा, कार्यालयाची घेतली झाडाझडती

Paush Maas 2022: आज पौष शुद्ध षष्ठी, मुलांच्या दिर्घआयुष्यासाठी करा 'हे' सुगंधी व्रत; सविस्तर वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 11:21 AM

Paush Maas 2022: हिंदू धर्मात प्रत्येक सण, उत्सव ऋतुमानाशी सांगड घालणारा असतो. पौष षष्ठीचे हे व्रत देखील त्याचाच एक भाग!

स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता असते, असे म्हणतात. कारण वात्सल्य हा स्त्रीचा स्थायी भाव असतो. ती आपले सबंध आयुष्य आपल्या नातेवाईकांच्या संगोपनात घालवते. यातही आपल्या पाल्याप्रती तिचा ओढा जास्त असतो. शेवटच्या श्वासापर्यंत ती केवळ मुलांच्या हिताचा विचार करते. याच विचाराला आपल्या हिंदू संस्कृतीने व्रताची जोड दिली आहे आणि सांगड घातली आहे, निसर्गाशी! पौष शुक्ल षष्ठीला म्हणजे आज २८ डिसेम्बर रोजी, मुलांच्या दीर्घायुष्यासाठी एक व्रत सुचवले आहे. काय आहे त्या व्रताचे वैशिष्ट्य, चला जाणून घेऊया. 

या व्रताचे नावच 'सुगंधी' व्रत असे आहे.  पौष शुक्ल षष्ठीला हे व्रत केले जाते, म्हणून त्याला खसषष्ठी असेही म्हणतात. खस म्हणजे वाळा! अतिशय प्रसन्न करणारा सुवास असलेले हे एक प्रकारचे गवतच असते. शीतलता हा त्याचा गुणधर्म मानला जातो. वाळ्यापासून अत्तर, सरबत, पडदे, उदबत्या, पंखे अशा अनेक वस्तू बनवल्या जातात.

व्रतकर्त्या स्त्रीने या दिवशी उपास करावा. नंतर षष्ठीदेवीचे प्रतीक मानलेल्या वाळ्याची म्हणजे खस नामक गवताची श्रद्धापूर्वक पूजा करावी. एवढा साधा सोपा विधी या व्रतासाठी सांगितलेला आहे. या व्रतालादेखील एका कहाणीची जोड दिलेली आहे.

त्यानुसार एका बाईची सून देवाचा नैवेद्य चोरून खायची. परिणामी देवाच्या अवकृपेने तिची मुले लहान वयातच दगावत असत. त्यावेळी सासूने तिला पौष शक्ल षष्ठीला उपास घडवायचे ठरवले. त्यासाठी तिने सुनेला भरपूर कपडे धुण्यासाठी नदीवर पाठवले. एवढे सारे कपडे धुण्यात तिचा पूर्ण दिवस गेला. त्यामुळे आपोआप सुनेला उपास घडला. त्यावेळी सासूने षष्ठीदेवीच्या पूजेची सारी तयारी करून ठेवली होती. सासूने आपल्या भल्यासाठी एवढे सारे केले हे कळल्यावर सून आनंदली. मग तिने सासूच्या मार्गदर्शनाखाली षष्ठीदेवीची अतिशय श्रद्धापूर्वक पूजा केली. त्यामुळे देवी तिच्यावर प्रसन्न झाली. कालांतराने तिला पुढे जी अपत्यप्राप्ती झाली, ती सारी सुदृढ आणि दीर्घायुषी झाली.

यात देवाच्या अवकृपेचा भाग वगळता उर्वरित कथा ही निसर्गाशी जोडणारी, निसर्गाला देव मानून पूजा करा असे सांगणारी आहे. अनेकदा कथांमध्ये सांगोपांगी बदल होतात, अपभ्रंश होतात, त्यामुळे मूळ कथांचे अर्थ बदलतात. त्यामुळे पौराणिक कथांकडे आपण रूपक कथा म्हणून पाहणे योग्य ठरते. 

महाराष्ट्रात 'जरा जिवंतिका'सारखी व्रते अपत्यांच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रचलित आहेत. तसेच हे विशेष व्रत बंगालमध्ये रूढ आहे. ते सर्वांना कळावे, म्हणून त्याचा इथे अंतर्भाव केला आहे. इतर वनस्पतीप्रमाने खस या बहुगगुणी, बहुउपयोगी सुगंधी गवताचे संवर्धन व्हावे. हा त्यामागचा उद्देश असावा. दुर्वांप्रमाणे कस म्हणजेच वाळ्यालाही पूजेत समाविष्ट करून पर्यावरणाचा किती सुक्ष्म विचार आपल्या पूर्वजांनी केला होता, हे कळल्यावर आपण आश्चर्यचकित होतो.