शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

Paush Maas 2022: शुभ कार्यासाठी वर्ज्य ठरवलेला पौष मास अध्यात्मिक दृष्ट्या म्हत्त्वाचा का? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 7:00 AM

Paush Maas 2022: पौष मासात मुख्यत्त्वे लग्न कार्य थांबवली जातात, पण या महिन्यात अनेक सणांची रेलचेल असल्याने हा महिना आनंददायी ठरतो!

यंदा २४ डिसेंबर रोजी पौष मास सुरु होत आहे. तिळगुळाचा गोडवा आनि स्नेहाचा संदेश घेऊन येणारा पौष मास हा आसेतुहिमाचल अखिल भारतवर्षाला हवाहवासा वाटतो. तो विशेषत्वाने त्यात येणाऱ्या मकरसंक्रांतीच्या सणामुळे! या मासाची अधिक माहिती आणि महती जाणून घेऊया ज्योतिर्भास्कर जयंत साळगावर यांच्या लेखणीतून. 

हा एक महत्त्वाचा सण वगळता अन्य सणवार या महिन्यात येत नसल्यामुळे या मासाला पूर्वापार `भाकडमास' म्हटले जाते. या मासातील पौर्णिमेच्या आधी अथवा नंतर पुष्प नक्षत्र असते, म्हणून या मासाला 'पौष' हे नाव मिळाले. पुष्य नक्षत्राचा स्वामी गुरु आहे. त्यामुळे हे नक्षत्र विरक्ती वाढवणारे आहे. `गुरु-पुष्य' योग म्हणजे गुरुवारी पुष्य नक्षत्र असणे. या योगावर सोने खरेदी करणे शुभ मानले जाते, असे असले तरी पुष्य नक्षत्र विवाहासाठी योग्य नसल्याचे मुहुर्तशास्त्राने मत व्यक्त केले आहे.त्याही पलीकडे भारतात बहुतेक ठिकाणी पौष महिना केवळ विवाहसाठीच नव्हे, तर इतर शुभकार्यासाठी व्यर्ज मानला गेला आहे. असे असले तरीही जसा सिंह सर्व पशूंमध्ये बलवान, तसे पुष्य नक्षत्र हे सर्व नक्षत्रांमध्ये बलवान आहे, असे ज्योतिषशास्त्र सांगते. 

पौष पौर्णिमेला 'राका' हे विशेष नाव आहे. कविवर्य यशवंत यांनी 'संक्रांतीचा दिवस आठवतो का तुला? 'त्वा जेधवा फुलविलीस मम भाग्य राका' असा या पौर्णिमेचा उल्लेख करून तिला रमणीय केले आहे. 'तैष' आणि `सहस्य' अशी याची आणखी दोन नावे आहेत. ऋतुंमधील हेमंत ऋतुचा हा दुसरा मास! या महिन्यात उत्तरायण असते. याव्यतिरिक्त माघस्नान आणि शाकंभरी पौर्णिमा या दोन्ही महत्त्वाच्या तिथीविशेषांमुळे पौष मास आपले महत्त्व राखून ठेवतो. यातही मकरसंक्रांतीचा काल हा दानधर्म, व्रते, श्राद्धकर्मे, तीर्थस्नान आदी धर्मकार्यासाठी प्रशस्त असल्याचे मानले जाते. अक्षय्य तृतीयेसारखेच मकरसंक्रांतीला केल्या जाणाऱ्या धर्मकृत्यांना त्यातही दानकर्मांना विशेष महत्त्व दिले गेले आहे.  

मकरसंक्रांतीच्या दिवशी बंगाल प्रांतात एक लोकोत्सव केला जातो. या दिवशी स्त्रिया आपापल्या घरच्या धान्याच्या कणग्यांना गवताची पेंढी बांधतात. ही पेंढी बांधत असताना त्या बावन्नपौटी हा शब्द सतत उच्चारत असतात. पौटी म्हणजे पटीने. कणगीतील धान्य बावन्न पटीने वाढो, असा त्याचा अर्थ! पुढील वर्षाच्या धनधान्यसमृद्धीसाठी हा विधी केला जातो. तर आंध्र प्रदेशातील 'गमल्ल' जातीमध्ये संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक घरी पूर्वजांची पूजा केली जाते. 

असे असले, तरी पौष महिन्यात मकरसंक्रांतीच्या सणामुळे इतर व्रते महत्त्वाची नसल्यामुळे अनेकांना ती माहितदेखील नाहीत. गुजरातमध्ये पौष पौर्णिमेला लहान बहिणी आपल्या भावासाठी दिवसभराचा उपास करतात. रात्री चंद्रपूजा करून तो उपास सोडतात, म्हणून या पौर्णिमेला `भगिनी पौर्णिमा' म्हणातात. तर आदिवासींच्या मुंडा जमातीत पौष पौर्णिमेला खळ्यातून धान्य आणून ते घरच्या कोटारात भरतात. त्या धान्योत्सवाला `मगे परब' असे म्हणतात. परब म्हणजे पूर्व! तसेच परब म्हणजे पर्व. पौर्णिमेच्या आदल्या दिवशी घरातील कर्तापुरुष उपवास करतो. पौर्णिमेला स्नान करून तो प्रथम पितरांची पूजा करतो. नंतर संपूर्ण कुटुंबाच्या सुखासाटी त्यांच्याकडे आशीर्वाद मागतो. एवढे झाल्यावर घरातील सर्व मंडळी नवीन तांदळाचे पोहे, गूळ, भात, भाकरी अशा पदार्थांचे सहभोजन करतात. 

याशिवायही तुमच्याकडे पौष मासासंबंधी काही महत्त्वाची माहिती असेल तर जरूर शेअर करा!