शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Paush Maas 2024: पौष मासात लग्नसराईला अर्धविराम, मात्र सण-उत्सवाची रेलचेल; सविस्तर वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 12:47 IST

Paush Maas 2024: इंग्रजी वर्ष २०२४ चा शेवटचा दिवस तर पौष मासाचा पहिला दिवस; या महिन्यातचे महत्त्व सविस्तरपणे जाणून घेऊ. 

यंदा ३१ डिसेंबर रोजी पौष मास सुरु होत आहे. तिळगुळाचा गोडवा आनि स्नेहाचा संदेश घेऊन येणारा पौष मास हा आसेतुहिमाचल अखिल भारतवर्षाला हवाहवासा वाटतो. तो विशेषत्वाने त्यात येणाऱ्या मकरसंक्रांतीच्या सणामुळे! या मासाची अधिक माहिती आणि महती जाणून घेऊया ज्योतिर्भास्कर जयंत साळगावर यांच्या लेखणीतून. 

हा एक महत्त्वाचा सण वगळता अन्य सणवार या महिन्यात येत नसल्यामुळे या मासाला पूर्वापार `भाकडमास' म्हटले जाते. या मासातील पौर्णिमेच्या आधी अथवा नंतर पुष्प नक्षत्र असते, म्हणून या मासाला 'पौष' हे नाव मिळाले. पुष्य नक्षत्राचा स्वामी गुरु आहे. त्यामुळे हे नक्षत्र विरक्ती वाढवणारे आहे. `गुरु-पुष्य' योग म्हणजे गुरुवारी पुष्य नक्षत्र असणे. या योगावर सोने खरेदी करणे शुभ मानले जाते, असे असले तरी पुष्य नक्षत्र विवाहासाठी योग्य नसल्याचे मुहुर्तशास्त्राने मत व्यक्त केले आहे.त्याही पलीकडे भारतात बहुतेक ठिकाणी पौष महिना केवळ विवाहसाठीच नव्हे, तर इतर शुभकार्यासाठी व्यर्ज मानला गेला आहे. असे असले तरीही जसा सिंह सर्व पशूंमध्ये बलवान, तसे पुष्य नक्षत्र हे सर्व नक्षत्रांमध्ये बलवान आहे, असे ज्योतिषशास्त्र सांगते. 

पौष पौर्णिमेला 'राका' हे विशेष नाव आहे. कविवर्य यशवंत यांनी 'संक्रांतीचा दिवस आठवतो का तुला? 'त्वा जेधवा फुलविलीस मम भाग्य राका' असा या पौर्णिमेचा उल्लेख करून तिला रमणीय केले आहे. 'तैष' आणि `सहस्य' अशी याची आणखी दोन नावे आहेत. ऋतुंमधील हेमंत ऋतुचा हा दुसरा मास! या महिन्यात उत्तरायण असते. याव्यतिरिक्त माघस्नान आणि शाकंभरी पौर्णिमा या दोन्ही महत्त्वाच्या तिथीविशेषांमुळे पौष मास आपले महत्त्व राखून ठेवतो. यातही मकरसंक्रांतीचा काल हा दानधर्म, व्रते, श्राद्धकर्मे, तीर्थस्नान आदी धर्मकार्यासाठी प्रशस्त असल्याचे मानले जाते. अक्षय्य तृतीयेसारखेच मकरसंक्रांतीला केल्या जाणाऱ्या धर्मकृत्यांना त्यातही दानकर्मांना विशेष महत्त्व दिले गेले आहे.  या मासात शाकंभरी नवरात्रही येते, त्यात सर्व प्रकारच्या भाज्यांनी देवीला सजवले जाते, नैवेद्य केला जातो आणि चैत्र तसेच शारदीय नवरात्रि प्रमाणे या नवरात्रीतही अनेक व्रत केली जातात, त्याबद्दल नंतर माहिती घेणारच आहोत. 

मकरसंक्रांतीच्या दिवशी बंगाल प्रांतात एक लोकोत्सव केला जातो. या दिवशी स्त्रिया आपापल्या घरच्या धान्याच्या कणग्यांना गवताची पेंढी बांधतात. ही पेंढी बांधत असताना त्या बावन्नपौटी हा शब्द सतत उच्चारत असतात. पौटी म्हणजे पटीने. कणगीतील धान्य बावन्न पटीने वाढो, असा त्याचा अर्थ! पुढील वर्षाच्या धनधान्यसमृद्धीसाठी हा विधी केला जातो. तर आंध्र प्रदेशातील 'गमल्ल' जातीमध्ये संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक घरी पूर्वजांची पूजा केली जाते. 

असे असले, तरी पौष महिन्यात मकरसंक्रांतीच्या सणामुळे इतर व्रते महत्त्वाची नसल्यामुळे अनेकांना ती माहितदेखील नाहीत. गुजरातमध्ये पौष पौर्णिमेला लहान बहिणी आपल्या भावासाठी दिवसभराचा उपास करतात. रात्री चंद्रपूजा करून तो उपास सोडतात, म्हणून या पौर्णिमेला `भगिनी पौर्णिमा' म्हणातात. तर आदिवासींच्या मुंडा जमातीत पौष पौर्णिमेला खळ्यातून धान्य आणून ते घरच्या कोटारात भरतात. त्या धान्योत्सवाला `मगे परब' असे म्हणतात. परब म्हणजे पूर्व! तसेच परब म्हणजे पर्व. पौर्णिमेच्या आदल्या दिवशी घरातील कर्तापुरुष उपवास करतो. पौर्णिमेला स्नान करून तो प्रथम पितरांची पूजा करतो. नंतर संपूर्ण कुटुंबाच्या सुखासाटी त्यांच्याकडे आशीर्वाद मागतो. एवढे झाल्यावर घरातील सर्व मंडळी नवीन तांदळाचे पोहे, गूळ, भात, भाकरी अशा पदार्थांचे सहभोजन करतात. 

याशिवायही तुमच्याकडे पौष मासासंबंधी काही महत्त्वाची माहिती असेल तर जरूर शेअर करा!

टॅग्स :Makar Sankrantiमकर संक्रांतीNavratriनवरात्री