सन २०२२ हे इंग्रजी नववर्ष सुरू झाले आहे. प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य पक्षात येणाऱ्या चतुर्थीला गणपती बाप्पाचे संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाते. हजारो भाविक या दिवशी गणपती बाप्पाचे नामस्मरण, पूजन करतात. गणपती स्तोत्र, मंत्राचे पठण करतात. आपल्या आवडत्या बाप्पाची कृपादृष्टी राहावी म्हणून आपण दर महिन्याला संकष्टीचा उपास करतो. संकष्टीचे व्रत शीघ्र फलदायी आहे, असे म्हणतात. सन २०२२ मधील पहिली पौष महिन्यातील संकष्ट चतुर्थी शुक्रवारी येत आहे. यामुळे या दिवसाचे महत्त्व वेगळे असल्याचे सांगितले जाते. पौष संकष्ट चतुर्थीची व्रताचरणाची सोपी पद्धत, मुहूर्त आणि विविध शहरांमधील चंद्रोदय वेळ जाणून घ्या... (Paush Sankashti Chaturthi January 2022)
सन २०२२ मधील पहिली संकष्ट चतुर्थी: शुक्रवार, २१ जानेवारी २०२२
पौष संकष्ट चतुर्थी प्रारंभ: शुक्रवार, २१ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ०८ वाजून ५१ मिनिटे.
पौष संकष्ट चतुर्थी समाप्ती: शनिवार, २२ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ०९ वाजून १४ मिनिटे.
भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची परंपरा आहे. असे असले, तरी संकष्ट चतुर्थी व्रत प्रदोष काळी केले जाते. तसेच यामध्ये चंद्रोदय आणि चंद्रदर्शन महत्त्वाचे असल्यामुळे पौष महिन्यातील संकष्ट चतुर्थीचे व्रताचरण शुक्रवार, २१ जानेवारी २०२२ रोजी करावे, असे सांगितले जाते. पौष संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पाचे पूजन करायचा शुभ मुहूर्त हा सकाळी ०९ वाजून ४३ मिनिटे ते १० वाजून ३० मिनिटे आहे. सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत राहुकाळ आहे. या दिवशी नक्षत्र पूर्वाफाल्गुनी आहे. तर चंद्र सिंह राशीत विराजमान असेल. संकष्ट चतुर्थी शुक्रवारी येत असल्यामुळे गणपती बाप्पासोबत देवीचे पूजन करणे लाभदायक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
पाहा, संकष्ट चतुर्थी व्रताचरणाची सोपी पद्धत
संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादी कार्य उरकून घ्यावीत. दिवसभर उपवास करावा. गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतीला अभिषेक करावा. अभिषेक करते वेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा 'ॐ गं गणपतये नम:' या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. धूप, दीप, नेवैद्य अर्पण करून बाप्पाचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करावा आणि त्याचे वाटप करावे. यानंतर रात्री आपापल्या ठिकाणची स्थानिक चंद्रोदयाची वेळ पाहावी. धूप, दीप लावून बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दूर्वा वाहून उपवास सोडावा. या दिवशी गणपती बाप्पाची स्तोत्रे म्हणावीत. स्तोत्र पाठ नसतील तर 'नमो भगवते गजाननाय' या मंत्राचा जप करावा. संकष्ट चतुर्थीची कथा वाचावी, असे सांगितले जाते.
विविध शहरांतील चंद्रोदय वेळ
शहरांची नावे | चंद्रोदयाची वेळ |
मुंबई | रात्रौ ०९ वाजून २५ मिनिटे |
ठाणे | रात्रौ ०९ वाजून २४ मिनिटे |
पुणे | रात्रौ ०९ वाजून २१ मिनिटे |
रत्नागिरी | रात्रौ ०९ वाजून २५ मिनिटे |
कोल्हापूर | रात्रौ ०९ वाजून २१ मिनिट |
सातारा | रात्रौ ०९ वाजून २१ मिनिटे |
नाशिक | रात्रौ ०९ वाजून २० मिनिटे |
अहमदनगर | रात्रौ ०९ वाजून १७ मिनिटे |
धुळे | रात्रौ ०९ वाजून १५ मिनिटे |
जळगाव | रात्रौ ०९ वाजून १२ मिनिट |
वर्धा | रात्रौ ०८ वाजून ५९ मिनिटे |
यवतमाळ | रात्रौ ०९ वाजून ०२ मिनिटे |
बीड | रात्रौ ०९ वाजून १३ मिनिटे |
सांगली | रात्रौ ०९ वाजून २० मिनिटे |
सावंतवाडी | रात्रौ ०९ वाजून २४ मिनिटे |
सोलापूर | रात्रौ ०९ वाजून १३ मिनिटे |
नागपूर | रात्रौ ०८ वाजून ५७ मिनिटे |
अमरावती | रात्रौ ०९ वाजून ०३ मिनिटे |
अकोला | रात्रौ ०९ वाजून ०६ मिनिटे |
औरंगाबाद | रात्रौ ०९ वाजून १४ मिनिटे |
भुसावळ | रात्रौ ०९ वाजता ११ मिनिटे |
परभणी | रात्रौ ०९ वाजून ०८ मिनिटे |
नांदेड | रात्रौ ०९ वाजून ०६ मिनिटे |
उस्मानाबाद | रात्रौ ०९ वाजून १२ मिनिटे |
भंडारा | रात्रौ ०८ वाजून ५५ मिनिटे |
चंद्रपूर | रात्रौ ०८ वाजून ५७ मिनिटे |
बुलढाणा | रात्रौ ०९ वाजून १० मिनिटे |
मालवण | रात्रौ ०९ वाजून २५ मिनिटे |
पणजी | रात्रौ ०९ वाजून २४ मिनिटे |
बेळगाव | रात्रौ ०९ वाजून २१ मिनिटे |
इंदौर | रात्रौ ०९ वाजून ०९ मिनिटे |
ग्वाल्हेर | रात्रौ ०८ वाजून ५६ मिनिटे |