सद्यस्थितीत धनु, मकर आणि कुंभ राशीची साडेसाती सुरू आहे. धनु राशीची साडेसाती अंतिम टप्प्यात, मकर राशीची मध्यम टप्प्यात आणि कुंभ राशीची प्राथमिक टप्प्यात आहे. अशा स्थितीत शनी देवाची आणि मारुती रायाची उपासना अधिक फलदायी ठरते. त्यामुळे साडेसातीचा त्रास कमी होतो आणि शनी देवाची कृपादृष्टी राहते. विशेषतः या काळात मकर आणि कुंभ राशीला शनी देवाच्या उपासनेची अधिक गरज आहे. त्यामागील मुख्य १० कारणे जाणून घेऊया.
>> कुंभ आणि मकर राशीचा स्वामी शनि देव आहे.
>> २९ एप्रिल २०२२ पर्यंत शनी मकर राशीत मुक्कामी आहेत त्यानंतर ते कुंभ राशीच्या दिशेने प्रयाण करतील.
>> शनी साडेसातीचा प्रभाव मिथुन आणि कन्या राशीवर देखील पडत आहे. त्यांनी देखील शनी उपासना करणे इष्ट ठरेल.
>> २९ एप्रिल २०२२ नंतर कुंभ आणि मीन राशीवर शनीचा प्रभाव पडेल.
>> असे म्हटले जाते की शनीच्या साडेसातीच्या पहिल्या टप्प्यात व्यक्तीच्या आर्थिक स्थितीवर, दुसऱ्या टप्प्यात कौटुंबिक जीवनावर आणि तिसऱ्या टप्प्यात आरोग्यावर सर्वात जास्त प्रभाव पडतो. अडीच वर्षांच्या या तीन टप्प्यांपैकी दुसरा टप्पा सर्वात जड जातो. सध्या मकर आणि कुंभ राशीचे लोक या स्थितीतून जात असल्यामुळे त्यांनी शनी उपासनेला प्राधान्य द्यावे.
>> २०२१-२२ हे वर्ष कुंभ राशीच्या लोकांसाठी अनेक संमिश्र घटनांनी भरलेले वर्ष असेल. या वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला आरोग्य आणि कामाच्या ठिकाणी संबंधित अनेक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्या, डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि कामाच्या ठिकाणी जबाबदारीने आणि गंभीरपणे काम करा.
>> शनिदेव मकर राशीत विराजमान आहेत. हे वर्ष गेल्या वर्षीपेक्षा अधिक महत्त्वाचे असणार आहे. जर तुम्ही तुमचे लक्ष तुमच्या ध्येयावर ठेवले, तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. परिणामी, तुम्ही सामाजिक क्षेत्र, खाजगी क्षेत्र किंवा कामाच्या ठिकाणी, सर्वत्र अत्यंत बुद्धिमत्ता आणि कुशलतेने पुढे जाण्यास सक्षम व्हाल.
>> मकर राशीवाल्यांनी शनिदेवाची कृपा संपादन केली तर येत्या काळात ते आपले ध्येय सहज गाठू शकतात. ही कृपा संपादन करण्यासाठी शनीची उपासना, दानधर्म, सत्कर्म, समाजसेवा या गोष्टींना प्राधान्य द्यावे, तसेच हातून गैरवर्तन होणार नाही, याची काळजी घ्यावी.
>> कुंभ राशीसाठी साडेसातीची सुरुवात शनिदेवाच्या उपासनेमुळे लाभदायक ठरू शकते. व्यवसायात नफा, नोकरीत प्रगती, बढती, आर्थिक उत्पन्नात वाढ होऊ शकते.
>> कुंभ राशीच्या लोकांना २३ फेब्रुवारी २०२८ पर्यंत साडेसाती असणार आहे. तोवर त्यांनी मारुती आणि शनीच्या उपासनेत खंड पडू देऊ नये.