बरेच जण मनगटावर काळा धागा बांधतात. काही जण लॉकेटमध्येही काळ्या रंगाचा वापर करतात. काळ्या रंगाच्या धाग्यामुळे नजर लागत नाही असं म्हणतात. अनेकांचा यावर विश्वास असतो. मात्र काळ्या रंगाचा धागा प्रत्येकासाठी शुभ नसतो. ज्योतिषशास्त्रात याबद्दलची अधिक माहिती उपलब्ध आहे.
मेष- मंगळ देव या राशीचे स्वामी आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाला काळा रंग चालत नाही. काळ्य रंगाशी त्याचं शत्रुत्व आहे. मेष राशीच्या व्यक्तींनी काळ्या रंगाचा धाग्याचा वापर केल्यास अनिष्ट घटना घडू शकतात.
वृश्चिक- मंगळ देव वृश्चिक राशीचे अधिपती आहेत. मंगळ देवाला काळा रंग चालत नाही. त्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांसाठी काळा रंग अशुभ असतो. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना काळ्या रंगाचा धागा वापरू नये. त्यांनी काळ्या रंगाचा वापर केल्यास मंगळाचा शुभ प्रभाव संपून जातो. त्यामुळे समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
कोणत्या राशींच्या व्यक्तींसाठी काळा रंग शुभ असतो?ज्योतिषशास्त्रानुसार, तूळ, मकर आणि कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी काळा धागा शुभ असतो. तूळ शनी देवाची उच्च रास आहे. तर मकर आणि कुंभ राशीचे स्वामी शनी देव आहेत. त्यामुळे या राशींसाठी काळा धागा वरदान ठरतो. या राशीच्या व्यक्तींची रोजगारात प्रगती होते.